1Ik ben een Roos van Saron, een Lelie der dalen.
1मी शारोनाचे कुंकुमपुष्य (गुलाबपुष्प) आहे. दरीतले कमलपुष्प आहे.
2Gelijk een lelie onder de doornen, alzo is Mijn vriendin onder de dochteren.
2प्रिये इतर स्त्रियांमध्ये तू काट्यांतल्या कमलीपुष्पासाखी आहेस.
3Als een appelboom onder de bomen des wouds, zo is mijn Liefste onder de zonen; ik heb groten lust in Zijn schaduw, en zit er onder, en Zijn vrucht is mijn gehemelte zoet.
3प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस. मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते.
4Hij voert mij in het wijnhuis, en de liefde is Zijn banier over mij.
4माझ्या सख्याने मला द्राक्षारसाच्या घरात आणले. माझ्यावर प्रेम करायची त्याची इच्छा होती.
5Ondersteunt gijlieden mij met de flessen, versterkt mij met de appelen, want ik ben krank van liefde.
5मनुका देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
6Zijn linkerhand zij onder mijn hoofd, en Zijn rechterhand omhelze mij.
6माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे.
7Ik bezweer u, gij, dochteren van Jeruzalem! die bij de reeen, of bij de hinden des velds zijt, dat gij die liefde niet opwekt, noch wakker maakt, totdat het dezelve luste!
7यरुशलेमच्या स्त्रियांनो मला वचन द्या. तुम्हाला वनातील हरिणींची आणि रानमृगांची शपथ घालून विनवते की माझी तयारी होईयर्पंत प्रेम जागृत करु नका.
8Dat is de stem mijns Liefsten, ziet Hem, Hij komt, springende op de bergen, huppelende op de heuvelen!
8मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते. तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
9Mijn Liefste is gelijk een ree, of een welp der herten; ziet, Hij staat achter onzen muur, kijkende uit de vensteren, blinkende uit de tralien.
9माझा प्रियकर मृगासारखा, हरिणाच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
10Mijn Liefste antwoordt, en zegt tot mij: Sta op, Mijn vriendin, Mijn schone, en kom!
10माझा प्रियकर माझ्याशी बोलतो, “प्रिये, हे सुंदरी ऊठ आपण दूर जाऊ या!”
11Want zie, de winter is voorbij, de plasregen is over, hij is overgegaan;
11बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.
12De bloemen worden gezien in het land, de zangtijd genaakt, en de stem der tortelduif wordt gehoord in ons land.
12शेतात फुले उमलली आहेत, आता गाण्याचे दिवस आले आहेत. ऐक कबूतरे परतली आहेत.
13De vijgeboom brengt zijn jonge vijgjes voort, en de wijnstokken geven reuk met hun jonge druifjes. Sta op, Mijn vriendin! Mijn schone, en kom!
13अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत. बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे. प्रिये, सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.”
14Mijn duive, zijnde in de kloven der steenrotsen, in het verborgene ener steile plaats, toon Mij uw gedaante, doe Mij uw stem horen; want uw stem is zoet, en uw gedaante is liefelijk.
14माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस.
15Vangt gijlieden ons de vossen, de kleine vossen, die de wijngaarden verderven, want onze wijngaarden hebben jonge druifjes.
15आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या मळ्यांचा नाश केला आहे. आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत.
16Mijn Liefste is mijn, en ik ben Zijn, Die weidt onder de lelien,
16माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची. माझा सखा कमलपुष्पांवर जगतो.
17Totdat de dag aankomt, en de schaduwen vlieden; keer om, mijn Liefste! wordt Gij gelijk een ree, of een welp der herten, op de bergen van Bether.
17जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो आणि सावल्या लांब पळून जातात प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्या हरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.