Greek: Modern

Marathi

Psalms

109

1[] <<Εις τον πρωτον μουσικον. Ψαλμος του Δαβιδ.>> Θεε της αινεσεως μου, μη σιωπησης·
1देवा, माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस.
2διοτι στομα ασεβους και στομα δολιου ηνοιχθησαν επ' εμε· ελαλησαν κατ' εμου με γλωσσαν ψευδη·
2दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनांट सांगत आहेत. ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
3και με λογους μισους με περιεκυκλωσαν και με επολεμησαν αναιτιως.
3लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत. ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
4Αντι της αγαπης μου ειναι αντιδικοι εις εμε· εγω δε προσευχομαι.
4मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा, मी आता तुझी प्रार्थना करतो.
5Και ανταπεδωκαν εις εμε κακον αντι καλου, και μισος αντι της αγαπης μου.
5मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत. मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझाद्धेष करत होते.
6[] Καταστησον ασεβη επ' αυτον· και διαβολος ας στεκη εκ δεξιων αυτου.
6माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्याला शिक्षा कर. तो चुकला आहे हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
7Οταν κρινηται, ας εξελθη καταδεδικασμενος· και η προσευχη αυτου ας γεινη εις αμαρτιαν.
7माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे. माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
8Ας γεινωσιν αι ημεραι αυτου ολιγαι· αλλος ας λαβη την επισκοπην αυτου.
8माझ्या शत्रूला लवकर मरु दे. त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
9Ας γεινωσιν οι υιοι αυτου ορφανοι και η γυνη αυτου χηρα.
9माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10Και ας περιπλανωνται παντοτε οι υιοι αυτου και ας γεινωσιν επαιται, και ας ζητωσιν εκ των ερειπιων αυτων.
10त्यांना त्यांचे घर गमावू दे आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11Ας παγιδευση ο δανειστης παντα τα υπαρχοντα αυτου· και ας διαρπασωσιν οι ξενοι τους κοπους αυτου.
11माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12Ας μη υπαρχη ο ελεων αυτον, και ας μη ηναι ο οικτειρων τα ορφανα αυτου.
12माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते. त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13Ας εξολοθρευθωσιν οι εκγονοι αυτου· εν τη επερχομενη γενεα ας εξαλειφθη το ονομα αυτων.
13माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर. पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14Ας ελθη εις ενθυμησιν ενωπιον του Κυριου η ανομια των πατερων αυτου· και η αμαρτια της μητρος αυτου ας μη εξαλειφθη·
14परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते, त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15Ας ηναι παντοτε ενωπιον του Κυριου, δια να εκκοψη απο της γης το μνημοσυνον αυτων.
15परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16Διοτι δεν ενεθυμηθη να καμη ελεος· αλλα κατετρεξεν ανθρωπον πενητα και πτωχον, δια να θανατωση τον συντετριμμενον την καρδιαν.
16का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही, त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही. त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17Επειδη ηγαπησε καταραν, ας ελθη επ' αυτον· επειδη δεν ηθελησεν ευλογιαν, ας απομακρυνθη απ' αυτου.
17त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे. तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18Επειδη ενεδυθη καταραν ως ιματιον αυτου, ας εισελθη ως υδωρ εις τα εντοσθια αυτου και ως ελαιον εις τα οστα αυτου·
18शाप हेच त्याचे कपडे असू दे. शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे. शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19Ας γεινη εις αυτον ως το ιματιον, το οποιον ενδυεται και ως η ζωνη, την οποιαν παντοτε περιζωννυται.
19शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.
20Αυτη ας ηναι των αντιδικων μου η αμοιβη παρα του Κυριου, και των λαλουντων κακα κατα της ψυχης μου.
20परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्याबाबतीत करील अशी मी आशा करतो. जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21[] Αλλα συ, Κυριε Θεε, ενεργησον μετ' εμου δια το ονομα σου· επειδη ειναι αγαθον το ελεος σου, λυτρωσον με.
21परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस. तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव. माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22Διοτι πτωχος και πενης ειμαι, και η καρδια μου ειναι πεπληγωμενη εντος μου.
22मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे. मी खरोखरच दु:खी आहे आणि माझे ह्दयविदीर्ण झाले आहे.
23Παρηλθον ως σκια, οταν εκκλινη· εκτιναζομαι ως η ακρις.
23दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते. कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24Τα γονατα μου ητονησαν απο της νηστειας και η σαρξ μου εξεπεσεν απο του παχους αυτης.
24मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे. माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25Και εγω εγεινα ονειδος εις αυτους· οτε με ειδον, εκινησαν τας κεφαλας αυτων.
25वाईट लोक माझा अपमान करतात. ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26Βοηθησον μοι, Κυριε ο Θεος μου· σωσον με κατα το ελεος σου·
26परमेश्वरा, देवा, मला मदत कर. तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27και ας γνωρισωσιν οτι η χειρ σου ειναι τουτο· οτι συ, Κυριε, εκαμες αυτο.
27नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल. तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28Αυτοι θελουσι καταρασθαι, συ δε θελεις ευλογει· θελουσι σηκωθη, πλην θελουσι καταισχυνθη· ο δε δουλος σου θελει ευφραινεσθαι.
28ते वाईट लोक मला शाप देतात. परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस. त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29Ας ενδυθωσιν εντροπην οι αντιδικοι μου· και ας φορεσωσιν ως επενδυμα την αισχυνην αυτων.
29माझ्या शत्रूंना लाज आण. त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30Θελω δοξολογει σφοδρα τον Κυριον δια του στοματος μου, και εν μεσω πολλων θελω υμνολογει αυτον·
30मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31Διοτι ισταται εν τη δεξια του πτωχου, δια να λυτρονη αυτον εκ των καταδικαζοντων την ψυχην αυτου.
31का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.