Indonesian

Marathi

2 Samuel

22

1Setelah TUHAN menyelamatkan Daud dari Saul dan dari segala musuhnya yang lain, Daud menyanyikan lagu ini bagi TUHAN:
1शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून देवाने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले.
2(Kucinta kepada-Mu, ya TUHAN, Engkaulah kekuatanku.)
2परमेश्वर हा माझा दुर्ग माझा गड माझ्या सुरक्षिततेचा आधार
3TUHAN seperti benteng yang kuat tempat aku berlindung. Allahku seperti gunung batu, tempat aku bernaung. Seperti perisai Ia menutupi aku, dan menjaga aku agar aman selalu.
3तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या, देवाच्या आश्रयाला जातो. देव म्हणजे माझी संरक्षक ढाल आहे त्याचे सामर्थ्य माझे रक्षण करते. परमेश्वर म्हणजे माझी लपण्याची जागा, माझ्या सुरक्षिततेचे ठिकाण उंच डोंगरात असलेले. क्रूर शत्रूपासून तो मला वाचवतो.
4Aku berseru kepada TUHAN yang patut dipuji, Ia membebaskan aku dari musuh-musuhku.
4त्यांनी माझी चेष्टा केली. पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
5Aku dikelilingi bahaya maut dan digenangi banjir kebinasaan.
5(शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता) मृत्यूच्या लाटा माझ्याभोवती थैमान घालत होत्या. मृत्युसदनाला नेणाऱ्या पुराच्या लोंढ्यात मी सापडलो होतो.
6Aku dikelilingi bahaya maut, perangkap maut ada di depanku.
6कबरीचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
7Dalam kesesakanku aku berseru kepada TUHAN, aku berteriak kepada Allahku mohon pertolongan. Dari Rumah-Nya Ia mendengar suaraku dan memperhatikan seruanku.
7तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो. देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
8Lalu bumi berguncang dan bergetar, dasar-dasar gunung goyah dan gemetar karena kemarahan Allah!
8तेव्हा धरती डळमळली, हादरली स्वर्गाचा पाया थरथरला कारण देवाचा कोप झाला होता.
9Asap menyembur dari lubang hidung-Nya, api dan bara keluar dari mulut-Nya.
9त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता. मुखातून अग्निज्वाळा बाहेर पडत होत्या ठिणग्या बरसत होत्या.
10Langit dibelah-Nya, lalu turunlah Ia, dengan awan gelap di bawah kaki-Nya.
10आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला. काव्व्याकुटृ ढगावर उभा राहिला.
11Ia terbang dengan mengendarai kerub; Ia melayang di atas sayap angin.
11करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. वाऱ्यावर स्वार झाला होता.
12Ia menyelubungi diri-Nya dengan kegelapan; awan mendung yang tebal mengelilingi Dia.
12परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
13Dari kilat di hadapan-Nya, keluarlah awan, hujan es dan api.
13त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की निखारे धगधगू लागले.
14Lalu TUHAN mengguntur dari angkasa, Yang Mahatinggi memperdengarkan suara-Nya.
14परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
15Ia menembakkan panah-panah-Nya, dan menceraiberaikan musuh. Ia menyambarkan kilat berulang-ulang dan membuat mereka lari.
15त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली. परमेश्वराने विजा पाठवल्या आणि लोक भीतीने सैरावैरा पळाले
16Dasar laut tersingkap dan alas bumi terbuka waktu TUHAN membentak musuh-Nya dengan murka.
16परमेश्वरा, तुझ्या घनगंभीर आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या उच्छ्‌वासाने (समुद्राचे पाणीही मागे हटले) समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
17Dari atas TUHAN mengulurkan tangan-Nya; dipegang-Nya aku dan ditarik-Nya dari air yang dalam.
17मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
18Ia menyelamatkan aku dari musuh yang perkasa dan dari orang-orang yang membenci aku karena mereka terlalu kuat bagiku.
18शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता पण परमेश्वराने मला वाचवले.
19Mereka menyerang aku waktu aku ditimpa bencana tetapi TUHAN menjadi penolongku.
19मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला. पण देवाने मला आधार दिला.
20Ia melepaskan aku dari bahaya dan menyelamatkan aku karena Ia berkenan padaku.
20परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे म्हणून त्याने मला सोडवले. मला त्याने सुरक्षित स्थळी नेले.
21TUHAN membalas perbuatanku yang benar; Ia memberkati aku sebab aku tidak bersalah.
21मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल कारण मी योग्य तेच केले. मी गैर काही केले नाही, तेव्हा त्याचे चांगले फळ तो मला देईल.
22Aku mentaati perintah TUHAN, dan tidak berpaling dari Allahku.
22कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही.
23Semua hukum-Nya kuperhatikan, perintah-perintah-Nya tidak kulalaikan.
23परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
24Ia tahu bahwa aku tidak bercela dan menjauhkan diri dari kesalahan.
24माझे आचरण शुध्द आणि निर्दोष आहे.
25Maka TUHAN membalas perbuatanku yang benar sebab Ia tahu aku tidak bersalah.
25तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील.
26TUHAN, Engkau setia kepada orang yang setia dan baik kepada orang yang baik.
26एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करु. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू.
27Terhadap orang suci Kaunyatakan diri-Mu suci, tetapi orang yang jahat Kaumusuhi.
27परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि बदमाशांशी तूही कुटिलतेने वागतोस.
28Orang yang rendah hati Kauselamatkan; tetapi orang yang congkak Kautundukkan.
28परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस
29Engkau menyalakan pelitaku; TUHAN Allahku menerangi kegelapanku.
29परमेश्वरा, तू माझा दीप आहेस माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस
30Engkau menguatkan aku untuk menumpas musuh; dengan bantuan Allahku kudobrak pertahanan mereka.
30परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करु शकतो. देवाच्या मदतीनेचमी शत्रूंची भिंतसुध्दा पार करु शकतो.
31Perbuatan Allah sempurna, janji TUHAN dapat dipercaya! Ia seperti perisai bagi semua yang berlindung pada-Nya.
31देवाची सत्ता सर्वंकष आहे. देवाचे वचन कसोटीला उतरलेले आहे. जे त्याच्यावर भरवसा टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
32Sebab hanya Tuhanlah Allah; Allah saja pembela kita.
32या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता? याच्याखेरीज भक्क म दुर्ग कोण?
33Dialah Allah yang menguatkan aku dan membuat jalanku aman.
33देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांना तो आपल्या मार्गाने नेतो.
34Ia menguatkan kakiku seperti kaki rusa, dan menjaga keselamatanku di pegunungan.
34देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो उच्च स्थानावर तो मला अढक ठेवतो.
35Ia melatih aku untuk berperang, sehingga aku dapat merentangkan busur yang paling kuat.
35युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.
36TUHAN, Engkau melindungi dan menyelamatkan aku, dan menopang aku dengan kuasa-Mu aku menjadi unggul karena tindakan-Mu.
36देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस. शत्रूचा पाडाव करण्यात मला हात दिलास.
37Kaujaga aku supaya aku tidak tertawan
37माझ्या पायांत बळ दे म्हणजे मी न अडखळता ताठ चालू शकेन.
38Kukejar musuhku dan kukalahkan mereka, dan pantang mundur sampai mereka binasa.
38शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे. त्यांचा उच्छेद होई पर्यंत मी परतणार नाही.
39Kubanting mereka sampai tak dapat bangkit lagi, mereka rebah tak berdaya di depan kakiku.
39त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत. होय, ते माझ्या पायदळी तुडवले गेले.
40Kauberi aku kekuatan untuk berperang, dan kemenangan atas musuh-musuhku.
40देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस. शत्रूचा पाडाव केलास.
41Kaubuat musuhku lari daripadaku;
41त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस, म्हणजे मी त्यांच्यावर वार करु शकेन.
42Mereka berteriak, tetapi tak ada yang menolong, mereka berseru kepada TUHAN, tapi Ia tidak menjawab.
42शत्रू मदतीसाठी याचना करु लागले पण कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. त्यांनी देवाचा धावाही केला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवली.
43Mereka kuremukkan seperti debu yang berhamburan, dan kusapu seperti lumpur di jalan.
43माझ्या शत्रूची मी खांडोळी केली. जमिनीवरच्या धुळीसारखे ते क:पदार्थ बनले. त्यांचा मी चेंदामेंदा केला. चिखल तुडवावा तसे मी त्यांना तुडवले.
44Engkau membebaskan aku dari kaum yang durhaka, dan menjadikan aku penguasa bangsa-bangsa; bangsa yang tidak kukenal menjadi hambaku.
44माझ्यावर जे चाल करुन आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस.ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.
45Orang-orang asing tunduk kepadaku, dan taat bila mendengar perintahku.
45आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
46Keberanian mereka sudah hilang; mereka gemetar dan keluar dari kubunya.
46भीतीने ते गर्भगळीत होतात. हे परदेशी लोक जिथे लपून बसले होते ती जागा सोडून भीतीने थरथर कापत बाहेर येतात.
47TUHAN hidup! Terpujilah pembelaku! Agungkanlah kebesaran Allah, penyelamatku!
47परमेश्वर जिवंत आहे. माझ्या दुर्गाची मी स्तुती करतो देव महान आहे. तो माझा रक्षणकर्ता दुर्ग आहे.
48Ia memberi aku kemenangan atas musuhku, bangsa-bangsa ditaklukkan-Nya di hadapanku,
48त्यानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला. लोकांना माझ्या शासनामध्ये ठेवले.
49diselamatkan-Nya aku dari lawan-lawanku. TUHAN, Kauberi aku kemenangan atas musuhku, Kaulindungi aku dari orang-orang yang kejam.
49देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस. मला विरोध करणाऱ्यांचा पाडाव करण्याचे सामर्थ्य मला दिलेस. दुष्टांपासून मला वाचवलेस.
50Maka kuagungkan Engkau di antara bangsa-bangsa, dan kunyanyikan puji-pujian bagi-Mu.
50म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
51Allah memberi kemenangan besar kepada raja yang dilantik-Nya, Ia tetap mengasihi orang pilihan-Nya, yaitu Daud dan keturunannya untuk selama-lamanya.
51परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो. आपल्या अभिषिक्त राजाबद्दल परमेश्वर खरे प्रेम दाखवतो. दावीद आणि त्याचे वंशज यांचे तो निरंतर कल्याण करील.