Indonesian

Marathi

Ecclesiastes

8

1Alangkah senangnya orang bijaksana. Ia tahu jawaban atas segala perkara. Hikmat membuat dia tersenyum gembira, sehingga wajahnya cerah senantiasa.
1शहाणा माणूस ज्या प्रमाणे गोष्टी समजू शकतो आणि गोष्टींचे निराकरण करू शकतो त्याप्रमाणे इतर कोणीही करू शकत नाही. त्याचे शहाणपण त्याला आनंदी बनवते. त्यामुळे दु:खी चेहरा आनंदी होतो.
2Patuhlah jika raja memberi perintah, dan jangan membuat janji gegabah kepada Allah.
2तुम्ही नेहमी राजाची आज्ञा पाळली पाहिजे असे मी म्हणतो. तुम्ही हे करा कारण देवाला तुम्ही तसे वचन दिले. आहे.
3Raja dapat bertindak semaunya, kalau ia tak berkenan, lebih baik jauhi dia.
3राजाला काही गोष्टी सुचवताना भीती बाळगू नका आणि चुकीच्या गोष्टी करायला मदतही करू नका. पण राजा त्याला (स्वत:ला) आनंद देणाऱ्याच आज्ञा देतो हे लक्षात ठेवा.
4Raja bertindak dengan wibawa; tak ada yang berani membantahnya!
4राजाला आज्ञा करण्याचा अधिकार आहे. आणि काय करायचे हे त्याला कोणीही सांगू शकत नाही.
5Orang yang taat kepadanya, akan aman dan sentosa; orang arif tahu kapan dan bagaimana mentaati raja.
5जो माणूस राजाच्या आज्ञा पाळतो तो माणूस सुरक्षित राहातो. शहाण्या माणसाला हे करायची योग्य वेळ माहीत असते आणि योग्य गोष्टी केव्हा करायच्या हे ही त्याला माहीत असतात.
6Bagi segala sesuatu ada waktu dan caranya sendiri, tetapi sedikit sekali yang kita fahami!
6माणसाकडे सगळचा गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग असतो. आणि प्रत्येकाने संधीनुसार काय करायचे ते ठरवायचे असते. तो अनेक संकटांत असला तरी त्याने या गोष्टी केल्या पाहिजेत.
7Tidak seorang pun tahu nasib apa yang menanti, dan tak ada yang dapat mengatakan apa yang akan terjadi.
7कारण काय घडेल या बद्दल त्याला खात्री नसते. का? कारण भविष्यात काय होईल ते त्याला कुणीही सांगू शकत नाही.
8Tak seorang pun dapat menahan atau menunda kematiannya. Itu perjuangan yang tak dapat dielakkannya, tak dapat ia luput daripadanya, walaupun dengan muslihat dan tipu daya.
8आपल्या आत्म्याला सोडून जाण्यापासून परावृत्त करण्याची शक्ती कोणाकडेही नसते. स्वत:चे मरण थांबवणे हे कोणाच्याही हाती नसते. युध्दात वाटेल तिथे जाण्याचे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याप्रमाणे जर एखाद्याने दुष्कृत्य केले तर ते कृत्य त्याची पाठ सोडणार नाही.
9Semua ini kulihat ketika kuperhatikan segala kejadian di dunia. Ada kalanya manusia memakai kuasanya untuk mencelakakan sesamanya.
9मी या सगळचा गोष्टी पाहिल्या. या जगात घडणाऱ्या गोष्टी विषयी मी खूप विचार केला. लोक नेहमी दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठी सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात आणि हे त्यांच्यासाठी वाईट आहे.
10Pernah kulihat orang jahat mati dan dikuburkan. Tetapi waktu orang-orang pulang dari penguburannya, mereka memuji dia di kota tempat ia melakukan kejahatan. Jadi, itu pun sia-sia.
10दुष्ट माणसांची भव्य आणि सुंदर प्रेतयात्रा मी पाहिली. प्रेतयात्रेहून परत जाताना लोक मेलेल्या दुष्टांबद्दल चांगले बोलत होते. ज्या शहरात दुष्टांनी खूप वाईट गोष्टी केल्या त्याच शहरात हे घडेले. हे फारच अविचारी आहे.
11Mengapa begitu mudah orang melakukan kejahatan? Karena hukuman tidak segera diberikan.
11लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते.
12Meskipun seratus kejahatan dilakukan seorang berdosa, ia tetap hidup bahkan panjang umurnya. Konon, siapa taat kepada Allah, pasti hidupnya serba mudah.
12पापी शंभर दुष्कृत्य करेल आणि तरी ही त्याला भरपूर आयुष्य मिळेल. असे असले तरी देवाची आज्ञा पाळणे आणि त्याला मान देणे हे अधिक चांगले असते.
13Sebaliknya, orang jahat mendapat banyak kesukaran. Hidupnya cepat berlalu seperti bayangan. Ia akan mati pada usia muda karena ia tidak taat kepada Tuhannya.
13दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल.
14Namun semua itu omong kosong belaka. Lihat saja apa yang terjadi di dunia: Ada orang saleh yang dihukum bagai pendurhaka, ada penjahat yang diganjar bagai orang saleh. Jadi, itu pun sia-sia.
14पृथ्वीवर घडणारी आणखी एक गोष्ट अशी आहे जी योग्य वाटत नाही. वाईट गोष्टी वाईट माणसांच्या बाबतीत घडाव्या आणि चांगल्या गोष्टी चांगल्या माणसांच्या बाबतीत. पण कधी कधी चांगल्या माणसांचे वाईट होते आणि वाईट माणसांचे चांगले हे योग्य नाही.
15Kesimpulanku ialah bahwa orang harus bergembira. Karena dalam hidupnya di dunia tak ada kesenangan lain baginya kecuali makan, minum dan bersukaria. Itu saja yang dapat dinikmati di tengah jerih payahnya, selama hidup yang diberikan Allah kepadanya.
15म्हणून मी विचार केला की आयुष्य आनंदात घालवणे हे अधिक महत्वाचे आहे. का? कारण आयुष्यात करायची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाणे, पिणे आणि मजा करणे. त्यामुळे देवाने लोकांना पृथ्वीवरील त्यांच्या आयुष्यात करण्यासाठी जे काम दिले आहे ते आनंदाने करायला त्यांना थोडी मदत होईल.
16Ketika aku berusaha mendapat hikmat, dan kuperhatikan segala kejadian di dunia ini, maka sadarlah aku bahwa meskipun kita bersusah payah siang malam tanpa beristirahat,
16लोक या आयुष्यात जे करतात त्याचा मी नीट अभ्यास केला. लोक किती व्यग्र होते ते मी पाहिले. ते रात्रंदिवस काम करतात. ते जवळ जवळ कधीच झोपत नाहीत.
17kita tak mampu mengerti tindakan Allah. Bagaimanapun kita berusaha, tak mungkin kita memahaminya. Orang arif mengaku bahwa ia tahu, tetapi sebenarnya ia tidak tahu.
17देव ज्या असंख्य गोष्टी करतो त्याही मी पाहिल्या आणि देव पृथ्वीवर ज्या गोष्टी करतो त्या लोकांना कळणे शक्य नसते. एखादा माणूस ते समजून धेण्याचा प्रयत्न करील पण त्याला ते अशक्य आहे. एखाद्या विद्धान माणसाने जरी असे म्हटले की त्याला देवाचे काम समजते. तरी ते खरे नसते. त्या सर्व गोष्टी कळणे कोणालाही शक्य नाही.