1TUHAN berkata, "Dengarlah, hai Yakub hamba-Ku, hai Israel, umat pilihan-Ku!
1“याकोब, तू माझा सेवक आहेस. माझे ऐक इस्राएल, मी तुला निवडले आहे. मी काय म्हणतो ते ऐक.
2Akulah TUHAN yang menjadikan engkau, yang membentuk engkau sejak dari kandungan, dan yang menolong engkau. Jangan takut, engkaulah hamba-Ku, umat pilihan-Ku yang Kukasihi.
2मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.
3Sebab Aku akan mencurahkan air ke tanah yang kering, dan mengalirkan sungai-sungai di tanah yang gersang. Aku akan memberikan kuasa-Ku kepada keturunanmu, dan memberkati anak cucumu.
3“मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील.
4Mereka akan tumbuh subur seperti rumput di dekat air, seperti pohon gandarusa di tepi sungai.
4झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
5Seorang demi seorang akan mengaku dirinya milik-Ku, dan datang bergabung dengan keturunan Yakub. Masing-masing menulis di tangannya: Milik TUHAN, dan menyebut dirinya anggota umat Allah."
5“एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वत:ला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”
6Inilah kata TUHAN Yang Mahakuasa, Raja dan pelindung Israel, "Aku Allah Yang Mahaesa, yang pertama dan yang terakhir.
6परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
7Siapakah seperti Aku? Suruhlah ia mengaku! Biarlah ia memberitahukan dan membuktikannya kepada-Ku! Siapa telah meramalkan masa depan sejak permulaan sampai akhir zaman?
7माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे व तो माझ्यासारखा आहे हे सिध्द करावे. मी ह्या लोकांनी निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.
8Bangsa-Ku, jangan takut atau terkejut; bukankah dari dahulu sampai sekarang Aku sudah meramalkan apa yang terjadi? Kamulah saksi-saksi-Ku. Pelindung yang lain tidak ada dan tidak Kukenal."
8घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
9Orang-orang yang membuat patung berhala itu tidak berguna, dan dewa-dewa yang mereka puja itu tidak berfaedah. Orang-orang yang menyembah patung itu buta dan tidak tahu apa-apa, sebab itu mereka akan mendapat malu.
9काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
10Sia-sialah membuat patung tuangan dan menyembahnya sebagai dewa!
10हे खोटे देव कोणी घडवले? ह्या निरूपयोगी मूर्ती कोणी निर्माण केल्या?
11Sungguh, semua orang yang menyembah patung mendapat malu. Orang yang membuat patung itu manusia biasa. Suruhlah mereka tampil bersama-sama; pasti mereka akan takut dan malu.
11कारगिरांनी त्या तयार केल्या. ते सर्व कारगीर माणसेच होती देव नव्हते. त्या सर्व लोकांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीबद्दल विचार केला तर ते लज्जित होतील व घाबरतील.
12Tukang besi mengambil sepotong logam lalu membentuknya dalam api dan menempanya dengan palu. Ia mengerjakannya dengan segala tenaga yang ada padanya. Sementara bekerja, ia menjadi lapar, haus, dan lelah.
12एकजण लोखंड चिमट्यात धरून विस्तवावर तापवितो. मग तो त्यावर घणाचे घाव घालतो आणि त्यातून मूर्ती तयार होते. हा कारागीर आपल्या बळकट हातांचा उपयोग करतो पण तो उपाशी असताना त्याची शक्ती कमी होते. पाणी न मिळाल्यास तो अशक्त होतो.
13Tukang kayu mengukur kayu. Ia menggambar bagan dengan kapur, mengukirnya dengan alat-alatnya dan menjadikannya patung manusia yang tampan, lalu menempatkannya di dalam rumahnya.
13दुसरा कारागीर ओळंबा आणि कर्कटक यांच्या साहाय्याने लाकडावर कापण्यासाठी रेषा आखून घेतो. मग छिन्नीने लाकडातून तो मूर्ती कोरतो. तो मोजपट्टीने मूर्तीचे मोजमाप करतो. अशा तऱ्हेने कारागीर हुबेहूब मनुष्याप्रमाणे दिसणारी मूर्ती करतो आणि ही माणसाची मूर्ती घरात बसून राहण्यापलीकडे काहीही करीत नाही.
14Barangkali kayu yang dipakainya berasal dari pohon cemara, pohon eru atau pohon terpentin yang ditebangnya di hutan. Mungkin juga ia menanam pohon salam lalu menunggu sampai hujan membuatnya tumbuh.
14माणूस गंधसरू, देवदारू वा कधी कधी अल्लोनची झाडे तोडतो (त्या माणसाने ती झाडे वाढवलेली नव्हती. ती जंगलात आपल्या सामर्थ्याने वाढली. जर कोणी भद्रदारू लावला तर पावसामुळे तो वाढतो.)
15Sebagian dari pohon itu dijadikan kayu bakar untuk berdiang dan membakar roti dan memanggang daging, lalu puaslah ia. Ia berdiang dan berkata, "Wah, enak benar dan hangat! Sungguh menyenangkan api ini!" Sisa kayu itu dipakainya untuk membuat patung. Ia tunduk menyembahnya dan berdoa, "Engkaulah ilahku, selamatkanlah aku!"
15तो ह्या झाडांचा उपयोग सरपणासाठी करतो. तो झाडांच्या बारीक ढलप्या करतो आणि त्यांचा उपयोग अन्न शिजविण्यासाठी व ऊबेसाठी करतो. एखाद्या लाकडाच्या ढलपीने अग्नी प्रज्वलित करून तो भाकरी भाजतो आणि त्याच लाकडाच्या तुकड्याचा उपयोग तो देवाची मूर्ती करण्यासाठी करतो व त्या देवाची पूजा करतो. तो देव म्हणजे माणसाने तयार केलेला पुतळा आहे. पण माणूस त्यापुढे नतमस्तक होतो.
16(44:15)
16माणूस अर्ध्याहून अधिक लाकूड जाळतो. अग्नीचा उपयोग तो अन्न स्वत:ला ऊबदार ठेवण्यासाठी तो करतो. मग तो म्हणतो, “छान! मला ऊब आली. अग्नीच्या प्रकाशात मी पाहूही शकतो.”
17(44:15)
17पण थोडे लाकूड शिल्लक आहे. मग त्यापासून मूर्ती करून तो त्या मूर्तीलाच देव म्हणतो. तो तिच्यापुढे वाकतो आणि तिची पूजा करतो. तो प्रार्थना करतो, “तू माझा देव आहेस. माझे रक्षण कर.”
18Sungguh bodohlah orang-orang seperti itu! Mereka menutup mata dan hati mereka sehingga tidak mengerti apa-apa.
18त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत.
19Pembuat patung itu tidak sampai berpikir, "Kayu itu sebagian kubakar, dan arangnya kupakai untuk membakar roti dan memanggang daging bagi makananku. Lalu sisa kayu itu kujadikan patung. Jadi sekarang aku menyembah sepotong kayu!"
19त्यांनी ह्या गोष्टींचा कधीच विचार केला नाही. त्यांना काही समजत नसल्याने त्यांनी असा विचार केला नाही “अर्धे लाकूड मी जाळले. त्या विस्तवावर मी भाकरी भाजली, मांस शिजविले. मग मी जेवलो आणि उरलेल्या लाकडातून मी ही भयानक वस्तू तयार केली. मी लाकडाच्या ओंडक्याचीच पूजा करीत आहे.”
20Perbuatan itu sama saja dengan makan abu. Orang itu disesatkan oleh pikirannya yang bodoh, sehingga ia tidak tertolong lagi. Ia tak dapat mengakui bahwa patung yang ada di tangannya itu penipuan belaka.
20त्या माणसाला, तो काय करीत आहे, ते कळत नाही. तो गोंधळलेला आहे. त्यामुळे त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गाने नेते. तो स्वत:ला वाचवू शकत नाही. तो चूक करतोय हे त्याला दिसत नाही. “मी हातात धरलेली मूर्ती म्हणजे खोटा देव आहे” असे तो म्हणणार नाही.
21TUHAN berkata, "Ingatlah semuanya ini, hai Israel, sebab engkaulah hamba-Ku. Aku membentuk engkau, dan engkau hamba-Ku, Israel, Aku tak akan lupa padamu!
21“याकोबा, ह्या गोष्टी लक्षात ठेव. इस्राएला, तू माझा सेवक आहेस. हे लक्षात ठेव. मी तुला निर्माण केले. तू माझा सेवक आहेस. म्हणून इस्राएल, तू मला विसरू नकोस.
22Kesalahanmu Kuhalaukan seperti awan, dosamu Kuenyahkan seperti kabut. Kembalilah kepada-Ku, sebab Aku telah membebaskan engkau!"
22तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती. पण मी ती सर्व पुसून टाकली. ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली. मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले. म्हणून तू माझ्याकडे परत ये.”
23Bersoraklah gembira, hai langit, bersoraksorailah, hai bagian dalam bumi! Bersoraklah gembira, hai gunung-gunung! juga hutan dan setiap pohon di dalamnya! Sebab TUHAN sudah menunjukkan keagungan-Nya dengan menebus Israel umat-Nya.
23परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
24Beginilah kata TUHAN Penyelamatmu yang membentuk engkau sejak dalam kandungan, "Akulah TUHAN yang menjadikan segala-galanya, yang sendirian membentangkan langit, dan tanpa bantuan menjadikan bumi.
24तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”
25Akulah yang menggagalkan ramalan tukang peramal, dan mempermainkan tukang-tukang tenung. Kata-kata orang bijak Kubantah, kebijaksanaan mereka Kujadikan kebodohan.
25खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
26Akulah yang meneguhkan perkataan hamba-Ku, dan melakukan rencana yang dinyatakan utusan-Ku, Aku berkata bahwa Yerusalem akan didiami lagi, dan kota-kota Yehuda akan Kubangun kembali; puing-puingnya akan dipulihkan.
26परमेश्वर यरूशलेमला म्हणतो, “तुझ्यात परत लोक राहू लागतील.” परमेश्वर यहुदातील नगरांना म्हणतो, “तुमची पुनर्बांधणी होईल.” ज्या शहरांचा नाश झाला, त्या शहरांना परमेश्वर म्हणतो, “मी तुम्हाला परत शहराचे रूप देईन.”
27Akulah yang berkata kepada dasar laut: Surutlah! Aku mau mengeringkan sungai-sungaimu.
27परमेश्वर खोल पाण्याला आटून जायला सांगतो “तो म्हणतो की मी तुमचे झरे सुकवीन.”
28Akulah yang berkata kepada Kores, 'Engkaulah yang akan memerintah untuk-Ku, dan melakukan segala kehendak-Ku. Perintahkanlah supaya Yerusalem dibangun lagi, dan Rumah TUHAN diletakkan dasarnya.'"
28परमेश्वर कोरेशला म्हणतो, “तू माझा मेंढपाळ आहेस. मला पाहिजे ते तू करशील. तू यरूशलेमला म्हणशील, ‘तुझी पुनर्बांधणी केली जाईल. ‘तू मंदिराला सांगशील, ‘तुझा पाया परत घातला जाईल.”‘