1Ajalku sudah dekat, hampir putuslah napasku; hanyalah kuburan yang tinggal bagiku.
1माझा आत्मा भंगला आहे. मी आशा सोडून दिली आहे. माझे आयुष्य जवळ जवळ संपले आहे आणि थडगे माझी वाट पाहात आहे.
2Orang menjadikan aku bahan ejekan; kulihat betapa mereka melontarkan sindiran.
2लोक माझ्याभोवती उभे राहातात आणि मला हसतात. ते मला चिडवतात. माझा अपमान करतात. तेव्हा मी फक्त बघत राहतो.
3Aku ini jujur, ya Allah. Percayalah padaku! Siapa lagi yang dapat menyokong perkataanku?
3“देवा, तुझा मला खरोखरच पाठिंबा आहे हे मला दाखव. दुसरे कुणीही मला पाठिंबा देणार नाही.
4Kaututup hati mereka sehingga tak mengerti; jangan sampai mereka menundukkan aku kini.
4“तू माझ्या मित्रांच्या मनाची कवाडे बंद करुन टाकलीस आणि आता त्यांना काही कळत नाही. कृपा करुन तू त्यांना विजयी होऊ देऊ नकोस.
5Menurut pepatah, siapa mengadukan teman demi keuntungan, anak-anaknya sendiri akan menerima pembalasan.
5“लोक काय म्हणतात ते तुला माहीत आहे ‘एखादा माणूस मित्राला मदत करण्यासाठी स्वत:च्या मुलांकडे दुर्लक्ष करतो’ परंतु माझे मित्र मात्र माझ्या विरुध्द गेलेत.
6Kini aku disindir dengan pepatah itu; mereka datang untuk meludahi mukaku.
6देवाने माझे नाव म्हणजे सर्वासाठी एक शिवी केली. लोक माझ्या तोंडावर थुंकतात.
7Mataku kabur karena dukacita; seluruh tubuhku kurus merana.
7दु:ख आणि यातना यांनी मी जवळ जवळ आंधळा झालो आहे, माझे शरीर छायेप्रमाणे अतिशय बारीक झाले आहे.
8Orang yang saleh, terkejut dan heran; orang yang tak bersalah, menganggap aku tidak bertuhan.
8यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत. देवाची पर्वा न करणाऱ्या लोकांमुळे निष्पाप लोक व्यथित होतात.
9Orang yang baik dan yang tidak bersalah, makin yakin cara hidupnya berkenan kepada Allah.
9पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहातात. निष्पाप लोक अधिक सामर्थ्यवान होतात.
10Tapi seandainya kamu semua datang ke mari, tak seorang bijaksana pun yang akan kudapati.
10“पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या. तुमच्या पैकी कुणीही विद्वान नाही.
11Hari-hariku telah lalu, gagallah segala rencanaku; hilang pula semua cita-cita hatiku.
11माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या आणि माझी आशा नष्ट झाली.
12Tetapi sahabat-sahabatku berkata, 'Malam itu siang dan terang hampir tiba.' Namun aku tahu dalam hatiku bahwa tetap gelaplah keadaanku.
12माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते. अंधार प्रकाशाला पळवून लावतो असे त्यांना वाटते.
13Hanya dunia mautlah yang kuharapkan, di sanalah aku akan tidur dalam kegelapan.
13“थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो.
14Kuburku kunamakan "Ayahku", dan cacing-cacing pemakan tubuhku kusebut "Ibu" dan "Saudara perempuanku".
14“तू माझा जन्मदाता आहेस’ असे मी थडग्याला आणि किड्यांना ‘माझी आई’ किंवा ‘बहीण’ म्हणू शकेन.
15Di manakah harapan bagiku; siapa melihat adanya bahagia untukku?
15परंतु मला जर तेवढी एकच आशा असेल, तर मला मुळीच आशा नाही. मला जर तेवढी एकच आशा असेल तर लोकांना मी आशे शिवायच दिसेन.
16Apabila aku turun ke dunia orang mati, aku tidak mempunyai harapan lagi."
16माझी आशा माझ्याबरोबरच मरेल का? ती सुध्दा मृत्युलोकात जाईल का? आम्ही बरोबरच मातीत जाऊ का?”