1Ayub melanjutkan uraiannya, katanya,
1ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
2"Kiranya hidupku dapat lagi seperti dahulu, waktu Allah melindungi aku.
2“काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
3Aku selalu diberi-Nya pertolongan, diterangi-Nya waktu berjalan dalam kegelapan.
3तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
4Itulah hari-hari kejayaanku, ketika keakraban Allah menaungi rumahku.
4मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
5Waktu itu, Yang Mahakuasa masih mendampingi aku, dan anak-anakku ada di sekelilingku.
5जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
6Ternakku menghasilkan banyak sekali susu. Banyak minyak dihasilkan oleh pohon-pohon zaitunku, meskipun ditanam di tanah berbatu.
6त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
7Jika para tua-tua kota duduk bersama, dan kuambil tempatku di antara mereka,
7“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
8minggirlah orang-orang muda, segera setelah aku dilihat mereka. Juga orang-orang tua bangkit dengan khidmat; untuk memberi hormat.
8सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
9Bahkan para pembesar berhenti berkata-kata,
9लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
10dan orang penting pun tidak berbicara.
10महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
11Siapa pun kagum jika mendengar tentang aku; siapa yang melihat aku, memuji jasaku.
11लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
12Sebab, kutolong orang miskin yang minta bantuan; kusokong yatim piatu yang tak punya penunjang.
12का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
13Aku dipuji oleh orang yang sangat kesusahan, kutolong para janda sehingga mereka tentram.
13मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.
14Tindakanku jujur tanpa cela; kutegakkan keadilan senantiasa.
14सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
15Bagi orang buta, aku menjadi mata; bagi orang lumpuh, aku adalah kakinya.
15मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
16Bagi orang miskin, aku menjadi ayah; bagi orang asing, aku menjadi pembela.
16गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
17Tapi kuasa orang kejam, kupatahkan, dan kurban mereka kuselamatkan.
17मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
18Harapanku ialah mencapai umur yang tinggi, dan mati dengan tenang di rumahku sendiri.
18“मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल.
19Aku seperti pohon yang subur tumbuhnya, akarnya cukup air dan embun membasahi dahannya.
19मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
20Aku selalu dipuji semua orang, dan tak pernah kekuatanku berkurang.
20मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
21Orang-orang diam, jika aku memberi nasihat; segala perkataanku mereka dengarkan dengan cermat.
21“पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
22Sehabis aku bicara, tak ada lagi yang perlu ditambahkan; perkataan meresap seperti tetesan air hujan.
22मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
23Semua orang menyambut kata-kataku dengan gembira, seperti petani menyambut hujan di musim bunga.
23पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
24Kutersenyum kepada mereka ketika mereka putus asa; air mukaku yang bahagia menambah semangat mereka.
24काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले.
25Akulah yang memegang pimpinan, dan mengambil segala keputusan. Kupimpin mereka seperti raja di tengah pasukannya, dan kuhibur mereka dalam kesedihannya.
25मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.