Indonesian

Marathi

Leviticus

18

1TUHAN menyuruh Musa
1परमेश्वर मोशेला म्हणाला,
2menyampaikan kepada bangsa Israel perintah ini, "Akulah TUHAN Allahmu.
2“इस्राएल लोकांना सांग: मी परमेश्वर तुमचा देव आहे.
3Janganlah meniru perbuatan orang di Mesir, tempat kamu pernah tinggal, atau orang di Kanaan, ke mana Aku sekarang membawa kamu.
3तुम्ही ज्या मिसर देशात राहात होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हाला घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.”
4Taatilah hukum-hukum-Ku dan lakukanlah apa yang Kuperintahkan. Akulah TUHAN Allahmu.
4तुम्ही माझ्याच नियमाप्रमाणे चाला व माझेच विधी कसोशीने पाळा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे.
5Taatilah peraturan-peraturan dan hukum-hukum yang Kuberikan kepadamu. Kalau kamu berbuat begitu, hidupmu selamat. Akulah TUHAN."
5म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!
6TUHAN memberikan peraturan-peraturan ini. Jangan bersetubuh dengan salah seorang dari sanak saudaramu.
6“तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये! मी परमेश्वर आहे:
7Jangan bersetubuh dengan ibumu, istri ayahmu, sebab dia hak ayahmu.
7“तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये.
8Jangan menghina ayahmu dengan bersetubuh dengan salah seorang istrinya yang lain.
8तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाची लाज जाईल.
9Jangan bersetubuh dengan saudaramu perempuan atau saudara tirimu, baik yang dibesarkan serumah dengan engkau maupun yang dibesarkan di rumah lain.
9“तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो, तू तिच्यापाशी जाऊ नको.
10Jangan bersetubuh dengan cucumu; itu akan membuat malu dirimu sendiri.
10“तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल!
11Jangan bersetubuh dengan saudaramu perempuan yang seayah lain ibu atau seibu lain ayah, karena dia saudaramu juga.
11“जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको.
12Jangan bersetubuh dengan bibimu, baik ia saudara ayahmu atau saudara ibumu.
12“तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे.
13(18:12)
13तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे.
14Jangan bersetubuh dengan istri pamanmu, karena dia bibimu juga.
14तू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे.
15Jangan bersetubuh dengan anak menantumu
15“तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे.
16atau dengan istri abangmu.
16“तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.
17Jangan bersetubuh dengan anak atau cucu seorang wanita yang pernah kaugauli. Mungkin mereka kerabatmu, dan itu perbuatan yang tidak senonoh.
17“एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे.
18Jangan kawin dengan saudara istrimu selama istrimu sendiri masih hidup.
18“तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.
19Jangan bersetubuh dengan seorang wanita selama masa haidnya, karena ia dalam keadaan najis.
19“स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते.
20Jangan bersetubuh dengan istri orang lain; perbuatan itu menjadikan engkau najis.
20“तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील!
21Jangan menyerahkan salah seorang anakmu untuk dikurbankan dalam pemujaan Molokh, karena perbuatan itu menghina nama Allah, Tuhanmu.
21“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.
22Orang laki-laki tak boleh bersetubuh dengan orang laki-laki; Allah membenci perbuatan itu.
22“स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे!
23Laki-laki maupun wanita, sekali-kali tak boleh bersetubuh dengan binatang; perbuatan jahat itu menajiskan kamu.
23“कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
24Jangan menajiskan dirimu dengan perbuatan-perbuatan itu, sebab dengan cara itu bangsa-bangsa yang tinggal di Kanaan sebelum kamu telah menajiskan diri mereka. Karena itu mereka diusir oleh TUHAN, supaya kamu dapat mendiami negeri itu.
24“असल्याप्रकारच्या पाप कर्मामुळे स्वत:ला अशुद्ध करुन घेऊ नका! कारण मी राष्ट्रांना त्यांच्या देशातून बाहेर घालवून देत आहे, आणि तो देश मी तुम्हाला देत आहे! कारण तेथील लोकांनी असली भंयकर पापकर्में केली!
25Mereka telah melakukan semua perbuatan yang menjijikkan itu, sehingga tanah mereka menjadi najis. Maka TUHAN menghukum mereka dan tidak mengizinkan mereka tinggal di sana. Tetapi kamu jangan sekali-kali melakukan perbuatan-perbuatan itu. Kamu semua, orang Israel dan orang asing yang menetap bersama kamu, harus mentaati peraturan dan perintah TUHAN,
25म्हणून त्यांचा देश भयंकर भ्रष्ट झाला आहे! आणि आता तो तेथील रहिवाशांना, ओकून बाहेर टाकीत आहे!
26(18:25)
26“ह्याकरिता तुम्ही माझे विधी व नियम पाळावे; हे नियम इस्राएल लोकांकरिता आणि त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परदेशीय लोकांकरिताही आहेत; तुम्हांपैकी कोणीही असली भयंकर अमंगळ पापकर्मे करु नये.
27(18:25)
27कारण तुमच्या पूर्वी ह्या देशात राहाणाऱ्या लोकांनी भयंकर अमंगळ पापकृत्ये केल्यामुळे हा देश अमंगळ झाला आहे.
28supaya kamu jangan dihukum oleh-Nya dan diusir dari tanah itu seperti orang-orang yang tidak mengenal TUHAN, yang tinggal di sana sebelum kamu.
28जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्ही हा देश भ्रष्ट केला तसा तो तुमचाही त्याग करील.
29Kamu tahu bahwa barangsiapa melakukan perbuatan yang menjijikkan itu tidak lagi dianggap anggota umat Allah.
29जे कोणी ह्यातील कोणतेही अमंगळ पापी कृत्य करतील त्या सर्वाना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.
30Maka TUHAN berkata, "Taatilah peraturan-peraturan yang Kuberikan dan janganlah meniru perbuatan orang-orang yang mendiami tanah Kanaan sebelum kamu. Jangan menajiskan dirimu sendiri dengan melakukan perbuatan-perbuatan itu. Aku TUHAN Allahmu."
30इतर लोकांनी असली भयंकर अमंगळ पापकृत्ये केली, परंतु तुम्ही माझे विधी व नियम पाळावेत; तसली भयंकर अमंगळ पापकृत्ये करुन तुम्ही आपणाला अमंगळ करुन घेऊ नये! मी तुमचा देव परमेश्वर आहे.”