1Inilah keluarga Harun dan Musa pada waktu TUHAN berbicara kepada Musa di atas Gunung Sinai.
1परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ अशी:
2Harun mempunyai empat anak laki-laki: Nadab yang sulung, kemudian Abihu, Eleazar dan Itamar.
2अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार.
3Mereka ditahbiskan menjadi imam dengan upacara penuangan minyak di atas kepala.
3अहरोनाचे हे मुलगे याजक ह्यां नात्याने परमेश्वराची पवित्र सेवा करण्यासाठी निवडले होते व त्यांचा अभिषेक करण्यात आला होता;
4Tetapi Nadab dan Abihu mati di padang gurun Sinai, pada saat mereka menghadap TUHAN dengan api yang tidak halal. Mereka berdua tidak mempunyai anak. Jadi selama Harun masih hidup, Eleazar dan Itamar bertugas sebagai imam.
4परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात मरण पावले. त्यांनी परमेश्वराकरिता यज्ञ अर्पण केला परंतु त्यासाठी त्यांनी परमेशवराला मान्य नसलेल्या प्रकारे अग्नीचा उपयोग केला. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामर हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
5TUHAN berkata kepada Musa,
5परमेशवर मोशेला म्हणाला,
6"Suruhlah suku Lewi datang menghadap, dan tunjuklah mereka menjadi pelayan-pelayan Harun.
6“लेवी वंशातील सर्व लोकांना अहरोन याजकाकडे आण म्हणजे ते त्याचे मदतनीस होतील.
7Mereka bertugas di Kemah-Ku dan harus melayani para imam serta seluruh umat dengan pekerjaan mereka di Kemah-Ku itu.
7अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.
8Tugas mereka ialah mengurus seluruh perlengkapan Kemah-Ku dan melakukan pekerjaan di Kemah-Ku itu sebagai pengganti orang-orang Israel.
8इस्राएल लोकांनी दर्शनमंडपातील सर्व वस्तूचे रक्षण करावे. ते त्यांचे काम आहे परंतु त्या वस्तूची निगा राखण्यामुळे लेवी लोक इस्राएल लोकांची मदत करतील. पवित्रनिवास मंडपात त्यांनी ह्याप्रकारे सेवा करावी.
9Dari bangsa Israel, hanya suku Lewi yang Kutugaskan menjadi pelayan tetap bagi Harun dan keturunannya.
9“लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
10Tetapi Harun dan anak-anaknya harus kauangkat untuk menjalankan tugas sebagai imam; selain mereka, siapa saja yang mencoba melakukan tugas itu harus dihukum mati."
10“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी दुसरा पवित्र वस्तूच्याजवळ येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करु लागला तर त्याला जिवे मारावे.”
11TUHAN berkata kepada Musa,
11परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
12"Sekarang orang-orang Lewi Kupilih menjadi milik-Ku. Ketika Aku membunuh semua anak sulung bangsa Mesir, Kukhususkan bagi-Ku semua anak laki-laki sulung orang Israel dan semua ternak mereka yang pertama lahir. Semuanya itu adalah milik-Ku. Sebagai pengganti anak laki-laki sulung Israel, Aku mengambil orang Lewi untuk-Ku; mereka akan menjadi kepunyaan-Ku. Akulah TUHAN."
12“इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील तेव्हा आता इतर इस्राएल लोकांना त्यांचे प्रथम जन्मलेले मुलगे मला द्यावे लागणार नाहीत.
13(3:12)
13“जेव्हा तुम्ही मिसर देशात होता तेव्हा त्या मिसरच्या लोकांचे प्रथम जन्मलेले मुलगे मी मारुन टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी घेतले. ते माझेच आहेत. परंतु तुमची प्रथम जन्मलेली मुले तुमचीच राहातील व फकत लेवी माझे होतील. मी परमेश्वर आहे.”
14Di padang gurun Sinai TUHAN menyuruh Musa
14परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
15membuat daftar orang-orang Lewi menurut kaum dan keluarganya masing-masing; setiap anak laki-laki yang berumur satu bulan ke atas harus dicatat namanya.
15“लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
16Lalu Musa melakukan perintah TUHAN itu.
16म्हणून मोशेने देवाची आज्ञा मानून त्यांची गणती केली.
17Lewi mempunyai tiga anak laki-laki: Gerson, Kehat dan Merari. Mereka adalah leluhur kaum-kaum yang disebut menurut nama mereka. Gerson mempunyai dua anak laki-laki: Libni dan Simei. Kehat mempunyai empat anak laki-laki: Amram, Yizhar, Hebron dan Uziel. Merari mempunyai dua anak laki-laki: Mahli dan Musi. Mereka itu leluhur dari keluarga-keluarga yang disebut menurut nama mereka.
17लेवीला गेर्षोन, कहाथ व मरारी नांवाचे तीन मुलगे होते.
18(3:17)
18प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.
19(3:17)
19कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
20(3:17)
20मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
21Kaum Gerson terdiri dari keluarga Libni dan keluarga Simei.
21गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
22Jumlah laki-laki kaum Gerson yang berumur satu bulan ke atas yang tercatat adalah 7.500 orang.
22ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
23Elyasaf anak Lael mengepalai kaum itu. Dalam perkemahan bangsa Israel, kaum itu mengambil tempat di sebelah barat di belakang Kemah TUHAN.
23गेर्षोने कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासस्थानाच्या मागे आपले डेरे ठोकले.
24(3:23)
24लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
25Dalam mengurus Kemah TUHAN, mereka bertanggung jawab atas Kemah dan tutupnya, kain di pintu masuknya,
25दर्शन मंडपातील पवित्र निवास मंडप, बाह्य मंडप आणि आच्छादन यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. दर्शन मंडपाच्या प्रवेश द्वारावरील पडद्याचीही निगा त्यांच्यावर सोपवली होती.
26layar pelataran yang mengelilingi Kemah dan mezbah, dan tirai pintu pelataran itu. Mereka bertanggung jawab atas segala pekerjaan yang berhubungan dengan barang-barang itu.
26पवित्र निवास मंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान ह्यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
27Kaum Kehat terdiri dari keluarga-keluarga Amram, Yizhar, Hebron dan Uziel.
27कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
28Laki-laki yang berumur satu bulan ke atas dari kaum itu semuanya berjumlah 8.600 orang. Mereka bertugas mengurus barang-barang di Kemah TUHAN.
28हया कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
29Elisafan anak Uziel mengepalai kaum itu. Di dalam perkemahan, kaum itu mengambil tempat di sebelah selatan Kemah TUHAN.
29त्यांना पवित्र निवास मंडपाचा दक्षिणेकडचा भाग देण्यात आला, तेव्हा तेथे त्यांनी आपली छावणी उभारली.
30(3:29)
30उजीयेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
31Mereka bertanggung jawab atas Peti Perjanjian, meja, kaki lampu, mezbah-mezbah, alat-alat yang dipakai para imam di Ruang Suci, dan tirai yang memisahkan Ruang Suci. Mereka bertanggung jawab atas segala pekerjaan yang berhubungan dengan barang-barang itu.
31पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
32Kepala suku Lewi adalah Eleazar, anak Harun. Ia mengawasi orang-orang yang bertugas di Ruang Suci.
32अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपविले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
33Kaum Merari terdiri dari keluarga Mahli dan keluarga Musi.
33मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
34Laki-laki yang berumur satu bulan ke atas dari kaum itu semuanya berjumlah 6.200 orang.
34ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते.
35Zuriel anak Abihail mengepalai kaum itu. Di dalam perkemahan, kaum itu mengambil tempat di sebelah utara Kemah TUHAN.
35अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. ह्या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली.
36Mereka bertanggung jawab atas rangka Kemah itu, balok-baloknya, tiang-tiangnya, alasnya, dan semua perkakas serta segala pekerjaan yang berhubungan dengan barang-barang itu.
36मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
37Juga atas tiang-tiang, alas-alas, pasak-pasak dan tali-temali untuk pelataran luar.
37तसेच पवित्र निवास मंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका-उथळ्या-मेखा आणि तणाव्याचे दोर ह्यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
38Di dalam perkemahan, Musa dan Harun serta anak-anaknya harus mengambil tempat di depan Kemah TUHAN, di sebelah timurnya. Mereka bertanggung jawab atas upacara ibadat untuk bangsa Israel di Ruang Suci. Selain mereka, siapa saja yang mencoba melakukan pekerjaan itu harus dihukum mati.
38मोशे, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
39Semua laki-laki dalam suku Lewi yang berumur satu bulan ke atas yang didaftarkan Musa menurut kaumnya masing-masing atas perintah TUHAN, seluruhnya berjumlah 22.000 orang.
39लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.
40TUHAN berkata kepada Musa, "Semua anak laki-laki sulung Israel adalah kepunyaan-Ku. Catatlah nama-nama mereka yang berumur satu bulan ke atas. Tetapi sebagai ganti mereka, Aku menyatakan semua orang Lewi menjadi milik-Ku. Akulah TUHAN! Dan ternak orang Lewi pun Kunyatakan menjadi pengganti semua binatang yang pertama lahir di antara ternak bangsa Israel."
40परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
41(3:40)
41आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्या ऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
42Musa melakukan apa yang diperintahkan TUHAN; ia mencatat nama semua anak laki-laki sulung
42तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
43yang berumur satu bulan ke atas. Mereka semua berjumlah 22.273 orang.
43मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
44Lalu TUHAN berkata kepada Musa,
44परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
45"Khususkanlah orang-orang Lewi untuk-Ku sebagai pengganti semua anak laki-laki sulung Israel; juga ternak orang Lewi sebagai pengganti ternak orang Israel.
45“मी परमेश्वर तुला अशी आज्ञा देतो की इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे; आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी मी लेवी लोकांचे पशू घेतो, कारण लेवी माझे लोक आहेत.
46Karena anak-anak lelaki sulung Israel 273 orang lebih banyak dari jumlah orang-orang Lewi, maka yang kelebihan itu harus kamu tebus.
46लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर मुलगे अधिक शिल्लक राहातात.
47Untuk setiap anak, kamu harus membayar lima uang perak menurut harga yang berlaku di Kemah-Ku;
47त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येककडून पवित्र स्थानातील अधिकृत चलणाप्रमाणे पाच शेकेल चांदी प्रत्येकी 273 जणांसाठी घे. (एक शेकेल म्हणजे वीस गेरा) इस्राएल लोकांकडून ही चांदी घे,
48berikan uang itu kepada Harun dan anak-anaknya."
48व ती अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांनी सोडविलेल्या दोनशें त्र्याहत्तर प्रथम जन्मलेल्या लोकांनी दिलेले ते सोडवणुकीचे पैसे होत.”
49Musa melakukan perintah TUHAN itu.
49तेव्हा मोशेने त्या दोनशे त्र्याहत्तर लोकांकडून पैसे गोळा केले. ह्या दोनशेत्र्याहत्तर लोकांची जागा घेण्यास लेवी लोकाकडे कोणी उरले नव्हते.
50Ia mengambil 1.365 uang perak,
50इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ह्या लोकांकडून अधिकृत पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशें पासष्ट शेकेल चांदी गोळा केली.
51dan menyerahkannya kepada Harun dan anak-anaknya.
51परमेश्वराने सांगितलेले मोशेने ऐकले व त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने ती चांदी-ते पैसे-अहरोन व त्याच्या मुलांना दिले.