1Lebih baik orang miskin yang lurus hidupnya, daripada orang bodoh yang suka berdusta.
1गरीब आणि प्रामाणिक असणे हे खोटे बोलणारा आणि लोकांना फसवणारा मूर्ख माणूस असण्यापेक्षा चांगले असते.
2Kerajinan tanpa pengetahuan, tidak baik; orang yang tergesa-gesa akan membuat kesalahan.
2काही गोष्टींविषयी खूप उत्साह दाखविणे एवढेच पुरेसे नसते. तुम्ही काय करीत आहात ते तुम्हाला कळले पाहिजे. एखादी गोष्ट करण्यासाठी एकदम् पुढे घुसू नये, नाही तर तुम्ही ती चुकीची कराल.
3Manusia merugikan diri sendiri oleh kebodohannya, kemudian menyalahkan TUHAN atas hal itu.
3माणसाचा स्वत:चा मूर्खपणा त्याच्या आयुष्याचा नाश करतो पण तो दोष मात्र परमेश्वराला देतो.
4Orang kaya, kawannya selalu bertambah; orang miskin malah ditinggalkan temannya.
4जर एखादा माणूस श्रीमंत असेल त्याची संपत्ती त्याला खूप मित्र देते. पण जर माणूस गरीब असेल तर त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात.
5Orang yang berdusta di pengadilan, tak akan luput dari hukuman.
5जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
6Setiap orang berusaha mengambil hati orang penting; semua orang mau bersahabat dengan dermawan.
6पुष्कळांना राज्यकर्त्यांबरोबर मैत्री करायची असते आणि जो माणूस नजराणे देतो त्याच्याबरोबर तर सर्वांनाच मैत्री करायची असते.
7Orang miskin diremehkan oleh saudaranya, apalagi oleh temannya. Betapapun ia berusaha, ia tak dapat memikat mereka.
7माणूस जर गरीब असला तर त्याचे कुटुंबही त्याच्याविरुध्द असते आणि त्याचे सगळे मित्र त्याच्यापासून दूर जातात. तो गरीब माणूस मदतीची याचना करतो. पण ते त्याच्या जवळपासही फिरकत नाहीत.
8Siapa mengejar pengetahuan, mengasihi dirinya; dan siapa mengingat apa yang dipelajarinya, akan bahagia.
8जर एखाद्याचे स्वत:वर खूपच प्रेम असेल तर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करील, तो समजून घेण्याचा खूप प्रयत्न करील आणि त्याला त्याचे बक्षिस मिळेल.
9Orang yang berdusta di pengadilan pasti akan dihukum dan dibinasakan.
9जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
10Tidaklah pantas orang bodoh hidup mewah, dan tidak pula patut hamba memerintah penguasa.
10मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.
11Orang bijaksana dapat menahan kemarahannya. Ia terpuji karena tidak menghiraukan kesalahan orang terhadapnya.
11जर माणूस शहाणा असला तर त्याचा शहाणपणा त्याला सहनशीलता देतो. आणि तो जेव्हा चूक करणाऱ्यांना क्षमा करतो. तेव्हा तर ते खूपच चांगले असते.
12Murka raja seperti auman singa; kebaikan raja seperti embun yang membasahi tumbuh-tumbuhan.
12राजा रागावतो तेव्हा ते सिंहाच्या गर्जनेसारखे वाटते. पण तो जर तुमच्यावर खुश असला तर ते हळुवार पावसासारखे वाटते.
13Anak yang bodoh bisa menghancurkan ayahnya. Istri yang suka mengomel bagaikan air menetes tiada hentinya.
13मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते.
14Rumah dan harta bisa diperoleh dari orang tua, tetapi istri yang bijaksana adalah karunia dari TUHAN.
14लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
15Bermalas-malas membuat orang tertidur lelap, dan akhirnya si pemalas akan kelaparan.
15आळशी माणसाला भरपूर झोप मिळेल पण तो खूप उपाशीही असेल.
16Orang yang mentaati perintah-perintah Allah akan selamat, orang yang tidak menghargainya akan mati.
16जर माणसाने कायद्याचे पालन केले तर तो स्वत:चेच रक्षण करतो. पण जर तो या गोष्टीला महत्व देत नसेल तर तो मारला जातो.
17Menolong orang miskin sama seperti memberi pinjaman kepada TUHAN; nanti TUHAN juga yang akan membalasnya.
17गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
18Tertibkan anakmu selama masih ada harapan; kalau tidak, berarti kau menginginkan kehancurannya.
18तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वत:चा नाश करायला मदत करीत आहात.
19Biarlah orang yang cepat marah merasakan sendiri akibatnya. Jika engkau menolong dia, engkau hanya menambah kemarahannya.
19जर एखाद्याला चटकन् राग येत असेल तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागते. जर तुम्ही त्याला त्याच्या संकटातून वाचवत राहिलात तर तो पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करील.
20Jika engkau suka belajar dan mendengar nasihat, kelak engkau menjadi orang yang berhikmat.
20उपदेश ऐका आणि शिका. नंतर तुम्ही शहाणे व्हाल.
21Manusia mempunyai banyak rencana, tetapi hanya keputusan TUHAN yang terlaksana.
21माणूस बऱ्याच योजना आखतो. पण फक्त परमेश्वराच्याच योजना प्रत्यक्षात येतात.
22Sifat yang diharapkan dari seseorang ialah kesetiaannya. Lebih baik miskin daripada menjadi pendusta.
22लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
23Hormatilah TUHAN, maka hidupmu bahagia; engkau akan puas dan bebas dari celaka.
23जो माणूस परमेश्वराचा आदर करतो त्याचे आयुष्य चांगले असते. आयुष्यात समाधानी असतो आणि त्याला संकटांची चिंता नसते.
24Ada orang yang malas bukan kepalang; menyuap makanan ke mulutnya pun ia enggan.
24आळशी माणूस स्वत:च्या भूकेसाठी करायच्या गोष्टी देखील करणार नाही. तो ताटातले अन्न तोंडात टाकायचे कामसुध्द करीत नाही.
25Kalau orang sombong dihukum, orang yang tak berpengalaman mendapat pelajaran. Kalau orang berbudi ditegur ia akan bertambah bijaksana.
25जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
26Anak yang menganiaya dan mengusir orang tuanya, adalah anak yang memalukan dan tercela.
26एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वत:ला लाज आणतो आणि स्वत:चा अनादर करतो.
27Anakku, jika engkau tak mau belajar lagi, engkau akan lupa apa yang sudah kaupelajari.
27तुम्ही जर सुचना ऐकायला नकार दिलात तर तुम्ही मूर्खासारख्या चुका करत राहाल.
28Memberi kesaksian palsu, berarti meremehkan hukum; mencelakakan orang, sedap rasanya bagi orang jahat.
28जर साक्षीदार प्रमाणिक नसला तर योग्य न्याय असणार नाही. दुष्ट माणसांच्या बोलण्याने गोष्टी अधिक वाईट होतील.
29Orang bodoh yang tinggi hati pasti akan dipukuli.
29जो माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याला इतर लोक शिक्षा करतील. मूर्ख माणसासाठी जी शिक्षा राखून ठेवली होती ती त्याला मिळेल.