1Dengar! Kebijaksanaan berseru-seru, hikmat mengangkat suara.
1ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.
2Ia berdiri di bukit-bukit di sisi jalan, dan di persimpangan-persimpangan.
2ते टेकडीच्या माथ्यावर जिथे रस्ते मिळतात, तिथे उभे आहेत.
3Di pintu gerbang, di jalan masuk ke kota, di situlah terdengar suaranya.
3ते शहराच्या दरवाजाशी आहेत. ते उघड्या दरवाजातून बोलावत आहेत.
4"Hai, umat manusia, kepadamu aku berseru; setiap insan di bumi, perhatikanlah himbauanku!
4ज्ञान (रुपी स्त्री) म्हणते, “लोक हो! मी तुम्हाला बोलावत आहे. मी सगळ्या लोकांना बोलावत आहे.
5Kamu yang belum berpengalaman, belajarlah mempunyai pikiran yang tajam; kamu yang bebal, belajarlah menjadi insaf.
5तुम्ही जर मूर्ख असाल, तर शहाणे व्हायला शिका. मूर्ख माणसांनो समजून घ्यायला शिका.
6Perhatikanlah perkataan-perkataanku, karena semuanya tepat dan bermutu.
6लक्ष द्या! ज्या गोष्टी शिकवतो त्या महत्वाच्या आहेत. मी तुम्हाला फक्त योग्य असलेल्या गोष्टीच सांगतो.
7Yang kukatakan, betul semua, sebab aku benci kepada dusta.
7माझे शब्द खरे आहेत. मला वाईटाचा, खोट्याचा तिरस्कार वाटतो.
8Perkataan-perkataanku jujur semua, tak satu pun yang berbelit atau salah.
8मी ज्या गोष्टी सांगतो त्या न्याय्य आहेत. माझ्या शब्दांत काहीही चुकीचे अथवा खोटे नाही.
9Bagi orang cerdas, perkataanku benar, bagi orang yang arif, perkataanku tepat.
9जो माणूस समजूतदार आहे त्याला या गोष्टी स्पष्ट दिसतात. ज्ञानी माणूस या गोष्टी समजू शकतो.
10Hargailah nasihatku melebihi perak asli, pentingkanlah pengetahuan melebihi emas murni.
10माझ्या शिस्तीचा स्वीकार करा. ती रुप्यापेक्षाही मौल्यवान आहे. ती शुध्द सोन्यापेक्षाही मौल्यावान आहे.
11Akulah hikmat, lebih berharga dari berlian; tak dapat dibandingkan dengan apa pun yang kauidamkan.
11ज्ञान मोत्यापेक्षा, अधिक मौल्यवान आहे. ते माणसाला हव्या असलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे.”
12Akulah hikmat; padaku ada pengertian, kebijaksanaan dan pengetahuan.
12“मी ज्ञान आहे. मी चांगल्या न्यायाने जगते. तुम्ही मला ज्ञानाबरोबर आणि चांगल्या योजनांबरोबर पाहू शकता.
13Menghormati TUHAN berarti membenci kejahatan; aku tidak menyukai kesombongan dan keangkuhan. Aku benci tingkah laku yang jahat dan kata-kata tipu muslihat.
13जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
14Akulah yang memberi ilham. Dan aku juga yang mewujudkannya. Aku cerdas dan kuat pula.
14परंतु मी लोकांना योग्य निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते आणि योग्य चांगला न्याय देते. मी समजूतदारपणा आणि शक्ती देते.
15Raja-raja kubantu menjalankan pemerintahan, para penguasa kutolong menegakkan keadilan.
15राजे राज्य करताना माझा उपयोग करतात. राज्यकर्ते चांगले कायदे करण्यासाठी माझा उपयोग करतात.
16Karena jasaku, para pembesar dan para bangsawan memerintah dan menjalankan keadilan.
16प्रत्येक चांगला राज्यकर्ता त्याच्या अंमलाखाली असलेल्या लोकांवर राज्य करण्यासाठी माझा उपयोग करुन घेतो.
17Aku mengasihi mereka yang suka kepadaku; yang mencari aku, akan menemukan aku.
17मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
18Padaku tersedia kekayaan juga kehormatan dan kemakmuran.
18माझ्याजवळही देण्यासाठी श्रीमंती आणि मानमरातब आहेत. मी खरी संपत्ती आणि यश देते.
19Yang kaudapat dari aku melebihi emas murni; lebih berharga dari perak asli.
19मी ज्या गोष्टी देते त्या शुध्द सोन्यापेक्षा चांगल्या असतात. आणि माझे नजराणे शुद्ध चांदीपेक्षा चांगले असतात.
20Aku mengikuti jalan keadilan, aku melangkah di jalan kejujuran.
20मी लोकांना योग्य मार्गावर आणते. मी तयांना योग्य न्यायाच्या मार्गाने नेते.
21Orang yang mengasihi aku, kujadikan kaya; kupenuhi rumahnya dengan harta benda.
21जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी संपत्ती देते. होय, मी त्यांची घरे खजिन्यांनी भरुन टाकीन.
22Aku diciptakan TUHAN sebagai yang pertama, akulah hasil karya-Nya yang semula pada zaman dahulu kala.
22खूप पूर्वी सुरुवातीला परमेश्वराने प्रथम माझीच निर्मिती केली.
23Aku dibentuk sejak permulaan zaman, pada mulanya, sebelum bumi diciptakan.
23आरंभीला मला निर्माण केले गेले. जगाची सुरुवात होण्यापूर्वी मी निर्माण झाले.
24Aku lahir sebelum tercipta samudra raya, sebelum muncul sumber-sumber air.
24महासागराच्या आधी माझा जन्म झाला. पाणी उत्पन्न होण्या आधी मी होते.
25Aku lahir sebelum gunung-gunung ditegakkan, sebelum bukit-bukit didirikan,
25पर्वतांच्या आधी माझा (ज्ञानाचा) जन्म झाला. डोंगरांच्या आधी माझा जन्म झाला.
26sebelum TUHAN menciptakan bumi dan padang-padangnya, bahkan sebelum diciptakan-Nya gumpalan tanah yang pertama.
26परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
27Aku menyaksikan ketika langit dihamparkan, dan cakrawala direntangkan di atas lautan,
27परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
28ketika TUHAN menempatkan awan di angkasa, dan membuka sumber-sumber samudra,
28परमेश्वराने आकाशात ढग ठेवण्याआधी माझा जन्म झाला. आणि परमेश्वराने समुद्रात पाणी ठेवले तेव्हाही मी तिथे होते.
29ketika Ia memerintahkan air laut supaya jangan melewati batas-batasnya. Aku pun turut hadir di sana ketika alas bumi diletakkan-Nya.
29परमेश्वराने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाणी परमेश्वराच्या संमती शिवाय चढू शकत नाही. परमेश्वराने पृथ्वीचा पाया घातला तेव्हा मी तिथे होते.
30Aku berada di samping-Nya sebagai anak kesayangan-Nya, setiap hari akulah kebahagiaan-Nya; selalu aku bermain-main di hadapan-Nya.
30एखाद्या कसलेल्या कामगारासारखी मी त्याच्या बाजूला होते. माझ्यामुळे परमेश्वर रोज आनंदी असे. मी त्याचा आनंद होते.
31Aku bersenang-senang di atas bumi-Nya, dan merasa bahagia di antara manusia.
31त्याने निर्माण केलेल्या जगाविषयी परमेश्वर उत्सुक होता. तो तिथे निर्माण केलेल्या लोकांबद्दल आनंदी होता.
32Karena itu, dengarkanlah aku, hai orang muda! Turutilah petunjukku, maka kau akan bahagia.
32“मुलांनो, आता माझे ऐका, जर तुम्ही माझा मार्ग अनुसरला तर तुम्हीही आनंदी व्हाल.
33Terimalah petuah dan jadilah bijaksana, janganlah engkau meremehkannya.
33माझी शिकवण ऐका आणि शहाणे व्हा. ऐकायला नकार देऊ नका.
34Bahagialah orang yang mendengarkan aku yang setiap hari duduk menanti di pintu rumahku, dan berjaga-jaga di gerbang kediamanku.
34जो माझे ऐकतो तो सुखी होतो. तो रोज माझ्या दारावर पाहारा देतो. तो माझ्या दाराजवळ थांबतो.
35Siapa mendapat aku, memperoleh kehidupan, kepadanya TUHAN berkenan.
35ज्या माणसाला मी सापडते. त्याला जीवन सापडते. त्याला परमेश्वराकडून चांगल्या गोष्टी मिळतील.
36Siapa tidak mendapat aku, merugikan diri sendiri; orang yang membenciku, mencintai maut."
36पण जो माझ्याविरुध्द पाप करतो तो स्वत:लाच इजा करुन घेतो. जे लोक माझा तिरस्कार करतात ते मरणाला कवटाळतात.”