Indonesian

Marathi

Psalms

103

1Dari Daud. Pujilah TUHAN, hai jiwaku, segenap batinku, pujilah nama-Nya yang kudus.
1माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
2Pujilah TUHAN, hai jiwaku, jangan lupakan segala kebaikan-Nya!
2माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
3Dia yang mengampuni semua dosamu, yang menyembuhkan segala penyakitmu,
3देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो.
4Dia yang membebaskan nyawamu dari kuburan, yang melimpahi engkau dengan kasih dan belas kasihan.
4देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो.
5Dia yang memuaskan hidupmu dengan yang baik, sehingga engkau awet muda seperti burung rajawali.
5देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.
6TUHAN menjalankan hukum dan keadilan bagi semua orang yang tertindas.
6परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
7Ia menyatakan rencana-Nya kepada Musa dan perbuatan-perbuatan-Nya kepada bangsa Israel.
7देवाने मोशेला नियम शिकवले, देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
8Sebab TUHAN pengasih dan penyayang, Ia panjang sabar dan kasih-Nya berlimpah.
8परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.
9Ia tidak menghardik terus-menerus, dan tidak marah untuk selama-lamanya.
9परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही.
10Ia tidak menghukum kita setimpal dosa kita, atau membalas kita setimpal kesalahan kita.
10आम्ही देवाविरुध्द पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही.
11Tetapi setinggi langit di atas bumi, sebesar itu kasih-Nya bagi orang yang takwa.
11देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.
12Sejauh timur dari barat, sejauh itu dibuang-Nya dosa-dosa kita.
12आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
13Seperti seorang bapak mengasihi anak-anaknya, begitulah TUHAN mengasihi orang yang takwa.
13वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
14Sebab TUHAN tahu kita terbuat dari apa, Ia ingat kita ini hanya debu.
14देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.
15Manusia hidupnya singkat seperti rumput; ia berkembang seperti bunga di ladang;
15आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत.
16bila ditiup angin, lenyaplah ia, malah tempatnya tidak diketahui lagi.
16आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे. ते फूल लवकर वाढते. गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.
17Tetapi TUHAN tetap mengasihi orang takwa, kebaikan-Nya berlangsung turun-temurun
17परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
18bagi orang yang berpegang pada perjanjian-Nya, dan dengan setia melakukan perintah-Nya.
18जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
19TUHAN memerintah di surga, Ia raja yang berkuasa atas segala-galanya.
19देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.
20Pujilah TUHAN, hai malaikat-malaikat-Nya yang perkasa, yang mendengarkan dan melakukan perintah-Nya.
20देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
21Pujilah TUHAN, hai semua makhluk di surga, semua hamba-Nya yang melakukan kehendak-Nya.
21परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा.
22Pujilah TUHAN, hai segala ciptaan di seluruh wilayah kekuasaan-Nya. Pujilah TUHAN, hai jiwaku!
22परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.