1Bersyukurlah kepada TUHAN, sebab Ia baik; kasih-Nya kekal abadi.
1परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. देवाचे प्रेम सदैव राहील.
2Siapa dapat mewartakan keperkasaan TUHAN, dan memberi pujian yang layak bagi-Nya?
2परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3Berbahagialah orang yang mentaati perintah-perintah-Nya, dan selalu benar dalam tindakannya.
3जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात. ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4Ingatlah aku, ya TUHAN, demi kebaikan-Mu bagi umat-Mu, tolonglah aku juga bila Engkau menyelamatkan mereka.
4परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव. मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5Semoga aku melihat kemakmuran orang-orang pilihan-Mu dan bersukacita bersama umat-Mu. Semoga aku berbangga dan bergembira bersama orang-orang yang menjadi milik-Mu.
5परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6Kami telah berdosa seperti leluhur kami; kami sudah berbuat jahat dan mendurhaka.
6आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली.
7Waktu di Mesir nenek moyang kami tidak mengerti; karya-Mu yang mengagumkan tidak mereka pahami. Mereka lupa akan kasih-Mu yang berlimpah, dan di dekat Laut Gelagah mereka berontak terhadap Yang Mahatinggi.
7परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत. ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.
8Tetapi TUHAN menyelamatkan mereka demi diri-Nya sendiri, supaya keperkasaan-Nya menjadi nyata.
8परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर, देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
9Atas perintah-Nya Laut Gelagah menjadi kering, Ia membawa umat-Nya berjalan melalui laut, seperti melalui padang gurun.
9देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला. देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10Dengan demikian diselamatkan-Nya mereka dari tangan lawan, dibebaskan-Nya mereka dari kuasa musuh.
10देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले. देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11Tetapi air menenggelamkan lawan mereka; tak seorang pun ketinggalan.
11देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले. शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.
12Lalu umat-Nya percaya kepada janji-Nya dan menyanyikan pujian bagi-Nya.
12नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
13Tetapi mereka segera melupakan perbuatan TUHAN dan bertindak tanpa minta nasihat-Nya.
13परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकल नाही.
14Di padang gurun mereka dirangsang nafsu, dan mencobai Allah.
14आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
15Ia memberi apa yang mereka minta, tetapi juga wabah penyakit yang menyerang mereka.
15परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या. पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.
16Di padang gurun itu mereka iri hati kepada Musa dan kepada Harun hamba-Nya yang suci.
16लोकांना मोशेचा मत्सर वाटला. त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.
17Lalu bumi terbelah menelan Datan, menutupi Abiram dan keluarganya.
17म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
18Api turun menyambar kelompok mereka, menghanguskan semua yang telah mendurhaka.
18नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले. अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.
19Di Gunung Sinai mereka membuat anak lembu emas, dan menyembah patung tuangan itu.
19त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले. त्यांनी मूर्तीपूजा केली.
20Mereka menukar Allah yang agung dengan patung sapi pemakan rumput.
20त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21Mereka lupa akan Allah penyelamat mereka yang telah melakukan hal-hal yang besar di Mesir.
21देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.
22Sungguh dahsyat perbuatan-perbuatan-Nya di negeri itu, menakjubkan tindakan-Nya di Laut Gelagah.
22देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या. देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.
23Maka Allah berniat membinasakan umat-Nya, tetapi dicegah oleh Musa, orang pilihan-Nya. Musa menjadi penengah mereka, sehingga kemarahan Allah reda.
23देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती. परंतु मोशेने त्याला थोपवले. मोशे देवाचा निवडलेला सेवक होता. देव खूप रागावला होता. पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही.
24Kemudian mereka menolak negeri yang indah itu karena tak percaya kepada janji Allah.
24परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.
25Mereka menggerutu di dalam kemah mereka dan tak mau mendengarkan suara TUHAN.
25आमच्या पूर्वजांनी देवाचे ऐकायला नकार दिला.
26Maka dengan sumpah Ia berjanji akan membunuh mereka di padang gurun.
26म्हणून देवाने शपथ घेतली की ते वाळवंटात मरतील.
27Keturunan mereka akan dibuang-Nya di antara bangsa-bangsa dan diceraiberaikan di negeri-negeri asing.
27देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन. देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28Kemudian di Peor mereka menyembah Baal, dan makan persembahan untuk dewa-dewa.
28नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्या लोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
29Perbuatan itu membangkitkan kemarahan TUHAN, sehingga mereka diserang wabah yang mengerikan.
29देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले.
30Tetapi Pinehas bangkit menghukum yang bersalah, maka berhentilah wabah itu.
30पण फीनहासने देवाची प्रार्थना केली आणि देवाने आजार थांबवला.
31Perbuatan itu dianggap sebagai jasa baginya, dan dikenang untuk selama-lamanya.
31फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते. देव याची सदैव आठवण ठेवील.
32Di sumur-sumur Meriba mereka membuat TUHAN marah, dan menyusahkan Musa dengan perbuatan mereka.
32मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
33Mereka membuat hatinya kesal, sehingga ia bicara tanpa berpikir.
33त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला.
34Bangsa-bangsa lain tidak mereka musnahkan, seperti yang diperintahkan TUHAN.
34परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्याइ तर देशाचा नाश करायला सांगितले. पण इस्राएलाच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.
35Mereka malah berbaur dengan bangsa-bangsa itu, dan meniru cara-cara orang yang tak mengenal Allah.
35ते इतर लोकांत मिसळले आणि ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.
36Lalu mereka menyembah berhala-berhala, dan itu menjadi sebab keruntuhan mereka.
36ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.
37Mereka mengurbankan anak-anak mereka kepada berhala-berhala Kanaan.
37देवाच्या माणसांनी स्व:तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
38Mereka menumpahkan darah orang tak bersalah, darah anak-anak mereka sendiri, untuk dikurbankan kepada berhala-berhala; sehingga negeri itu mereka cemarkan.
38देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
39Karena perbuatan-perbuatan itu mereka menjadi najis, dan tidak setia kepada Allah.
39म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली. देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.
40Lalu kemarahan TUHAN menyala terhadap mereka, Ia muak dengan milik-Nya sendiri.
40देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंटाळा आला.
41Maka diserahkan-Nya mereka kepada bangsa-bangsa, dibiarkan-Nya mereka dikuasai musuh.
41देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले. देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42Lalu mereka ditindas oleh musuh-musuh mereka, dan ditaklukkan di bawah kuasa mereka.
42देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43Berulang kali TUHAN membebaskan mereka, tetapi mereka lebih suka memberontak, sehingga mereka binasa dalam dosa-dosa mereka.
43देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44Tetapi TUHAN mendengar teriakan mereka, Ia memperhatikan kesusahan mereka.
44पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45Demi mereka Ia ingat akan perjanjian-Nya dan menyayangi mereka karena kasih-Nya yang besar.
45देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46Ia membuat mereka dikasihani oleh semua orang yang menawan mereka.
46इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47Selamatkanlah kami, ya TUHAN Allah kami, kumpulkanlah kami dari antara bangsa-bangsa, supaya kami dapat bersyukur dan memuji nama-Mu yang suci.
47परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करु.
48Pujilah TUHAN, Allah Israel, sekarang dan selama-lamanya. Biarlah semua orang mengatakan, "Amin!" Pujilah TUHAN!
48परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”