1Mazmur Daud. Milik Tuhanlah bumi seisinya, dunia dan semua yang mendiaminya.
1पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत.
2Ia meletakkan dasarnya di atas lautan, dan menegakkannya di atas air yang dalam.
2परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली.
3Siapakah yang boleh naik ke Bukit TUHAN, dan masuk ke dalam Rumah-Nya?
3परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो?
4Orang yang tidak bercela pikiran dan perbuatannya, yang tidak bersumpah palsu dan tidak menyembah berhala.
4तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
5Dialah yang akan diberkati dan diselamatkan TUHAN, dan dinyatakan tidak bersalah oleh Allah.
5चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे, त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात.
6Begitulah orang yang datang menghadap Allah, yang datang menyembah Allah Yakub.
6ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.
7Bukalah lebar-lebar gerbang tua, supaya masuk Raja yang mulia.
7वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.
8Siapakah Raja yang mulia? Dialah TUHAN yang perkasa; TUHAN yang penuh kuasa, yang jaya dalam peperangan.
8तो गौरशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे.
9Bukalah lebar-lebar gerbang tua, supaya masuk Raja yang mulia.
9वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल.
10Siapakah Raja yang mulia? TUHAN Yang Mahakuasa, Dialah Raja yang mulia!
10तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.