1Untuk pemimpin kor. Mazmur Daud.
1मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.
2(40-3) Ia menarik aku dari lubang yang berbahaya, dari lumpur rawa. Ia menempatkan aku di atas bukit batu, sehingga langkahku mantap.
2परमेश्वराने मला विनाशाच्याखड्यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले.
3(40-4) Ia mengajar aku menyanyikan lagu baru, lagu pujian untuk Allah kita. Banyak orang melihatnya dan menjadi takut, lalu percaya kepada TUHAN.
3परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
4(40-5) Berbahagialah orang yang percaya kepada TUHAN, yang tidak ikut menyembah dewa-dewa, atau minta tolong kepada orang sombong.
4जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.
5(40-6) TUHAN, betapa banyaknya karya-Mu bagi kami, ya TUHAN Allahku, Engkau tak ada taranya! Banyaklah rencana-Mu yang menakjubkan bagi kami, tak mungkin diceritakan semuanya.
5परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.
6(40-7) Persembahan dan kurban sajian tidak Kausukai, kurban bakaran dan kurban penghapus dosa tidak Kautuntut. Tetapi Engkau telah memberi aku telinga yang dapat mendengar suara-Mu.
6परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस. तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.
7(40-8) Lalu aku berkata, "Inilah aku, dalam gulungan buku tertulis bagiku.
7म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते.
8(40-9) Aku senang melakukan kehendak-Mu, ya Allah, hukum-Mu kusimpan di dalam hati."
8माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.
9(40-10) Dalam himpunan umat-Mu kuwartakan kabar gembira bahwa Engkau telah menyelamatkan kami. Dengan tiada hentinya hal itu kumaklumkan, Engkau tahu semua itu, ya TUHAN.
9मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
10(40-11) Kabar keselamatan itu tidak kusimpan dalam hati, pertolongan dan kesetiaan-Mu selalu kuberitakan. Di depan himpunan umat-Mu aku tidak berdiam diri, tetapi kumaklumkan kasih dan kesetiaan-Mu.
10परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.
11(40-12) TUHAN, janganlah berhenti mengasihani aku; lindungilah aku selalu dengan kasih dan kesetiaan-Mu.
11म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”
12(40-13) Aku dikepung malapetaka yang banyak, jumlahnya tak dapat dihitung. Aku dikejar dosa-dosaku sampai aku tak dapat melihat. Jumlahnya melebihi rambut di kepalaku, membuat aku putus asa.
12माझ्याभोवती दुष्टांची गर्दी झाली आहे ते मोजण्या न येण्याइतके आहेत. माझ्या पापांनी माझी कोंडी केली आहे. आणि मी त्यांपासून पळू शकत नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा माझी पापे जास्त आहेत. माझे धैर्य नाहीसे झाले आहे.
13(40-14) Ya TUHAN, selamatkanlah aku, TUHAN bergegaslah menolong aku!
13परमेश्वरा, माझ्याकडे धाव घे आणि मला वाचव. परमेश्वरा लवकर ये आणि मला मदत कर.
14(40-15) Biarlah orang yang ingin membunuh aku dikalahkan dan lari kebingungan. Biarlah orang yang menyoraki kemalanganku dipukul mundur dan dihina.
14ते वाईट लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत. परमेश्वरा त्या लोकांना लज्जित कर आणि त्यांची निराशा कर. ते लोक मला दु:ख देणार आहेत. त्यांना शरमेने पळून जायला लाव.
15(40-16) Biarlah orang yang menertawakan aku menjadi terkejut dan malu.
15ते वाईट लोक माझी थट्टा करतात. त्यांना गोंधळायला लावून बोलता येणार नाही असे कर.
16(40-17) Semoga semua orang yang menyembah Engkau bersukacita dan bergembira, dan semua yang mencintai keselamatan daripada-Mu terus berkata, "Sungguh agunglah TUHAN!"
16परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
17(40-18) Aku ini miskin dan lemah, tetapi TUHAN memperhatikan aku. Engkaulah penolong dan penyelamatku, jangan berlambat, ya Allahku!
17प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.