Italian: Riveduta Bible (1927)

Marathi

Exodus

16

1E tutta la raunanza de’ figliuoli d’Israele partì da Elim e giunse al deserto di Sin, ch’è fra Elim e Sinai, il quindicesimo giorno del secondo mese dopo la loro partenza dal paese d’Egitto.
1मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीनायच्या रानात आले.
2E tutta la raunanza de’ figliuoli d’Israele mormorò contro Mosè e contro Aaronne nel deserto.
2लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले;
3I figliuoli d’Israele dissero loro: "Oh, fossimo pur morti per mano dell’Eterno nel paese d’Egitto, quando sedevamo presso le pignatte della carne e mangiavamo del pane a sazietà! Poiché voi ci avete menati in questo deserto per far morir di fame tutta questa raunanza".
3ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला मिसरमध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात आणले आहे; येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ.”
4E l’Eterno disse a Mosè: "Ecco, io vi farò piovere del pane dal cielo; e il popolo uscirà e ne raccoglierà giorno per giorno quanto gliene abbisognerà per la giornata, ond’io lo metta alla prova per vedere se camminerà o no secondo la mia legge.
4मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हाला खाण्याकरिता मी आकाशातून अन्न पडावे असे करीन; दर दिवशी लोकांनी आपल्याला त्या दिवसाला पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. मी सांगतो त्याप्रमाणे लोक करतात की नाही हे पाहण्यासाठी मी हे करीन.
5Ma il sesto giorno, quando prepareranno quello che avran portato a casa, essa sarà il doppio di quello che avranno raccolto ogni altro giorno".
5दरदिवशी लोकांनी एक दिवस पुरेल एवढेच अन्न गोळा करावे, परंतु शुक्रवारी जेव्हा ते जेवण तयार करतील तेव्हा मात्र ते जेवण दोन दिवस पुरेल इतके करावे.”
6E Mosè ed Aaronne dissero a tutti i figliuoli d’Israele: "Questa sera voi conoscerete che l’Eterno è quegli che vi ha tratto fuori dal paese d’Egitto;
6म्हणून मोशे व अहरोन लोकांना म्हणाले, “आज रात्री तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हाला वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हाला कळेल.
7e domattina vedrete la gloria dell’Eterno; poich’egli ha udito le vostre mormorazioni contro l’Eterno; quanto a noi, che cosa siamo perché mormoriate contro di noi?"
7उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराकडे तक्रार केली आणि त्याने ती ऐकली; आणि तुम्ही उगीच आम्हाकडे पुन्हा पुन्हा तक्रार करीत आला आहात. आता आपण जरा आराम करु या.”
8E Mosè disse: "Vedrete la gloria dell’Eterno quando stasera egli vi darà della carne da mangiare e domattina del pane a sazietà; giacché l’Eterno ha udito le vostre mormorazioni che proferite contro di lui; quanto a noi, che cosa siamo? le vostre mormorazioni non sono contro di noi ma contro l’Eterno".
8आणि मोशे म्हणाला, “तुम्ही एक सारखी तक्रार करीत आहात; परमेश्वराने तर तुमची तक्रार ऐकली आहे; तेव्हा आज रात्री परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे; आणि दर दिवशी सकाळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील; तुम्ही अहरोनाकडे व मजकडे तक्रार करीत आहात तुम्ही माझ्या किंवा अहरोनाच्याविरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या.”
9Poi Mosè disse ad Aaronne: "Di’ a tutta la raunanza de’ figliuoli d’Israele: Avvicinatevi alla presenza dell’Eterno, perch’egli ha udito le vostre mormorazioni".
9मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांशी बोल; त्यांना सांग, ‘तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.”
10E come Aaronne parlava a tutta la raunanza de’ figliuoli d’Israele, questi volsero gli occhi verso il deserto; ed ecco che la gloria dell’Eterno apparve nella nuvola.
10मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.
11E l’Eterno parlò a Mosè, dicendo:
11परमेश्वर मोशेला म्हणाला,
12"Io ho udito le mormorazioni dei figliuoli d’Israele; parla loro, dicendo: Sull’imbrunire mangerete della carne, e domattina sarete saziati di pane; e conoscerete che io sono l’Eterno, l’Iddio vostro".
12“मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, ‘रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हाला पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हाला समजेल.”‘
13E avvenne, verso sera, che saliron delle quaglie, che ricopersero il campo; e, la mattina, c’era uno strato di rugiada intorno al campo.
13त्या संध्याकाळच्या वेळी, रात्र पडण्याच्या सुमारास तेथे लावे पक्षी आले व छावणीभर ते पसरले (आणि त्यांना खाण्याकरिता इस्राएल लोकांनी ते पकडले) आणि सकाळी छावणीच्या सभोंवती जमिनीवर दंव पडले.
14E quando lo strato di rugiada fu sparito, ecco sulla faccia del deserto una cosa minuta, tonda, minuta come brina sulla terra.
14सूर्य उगवल्यावर दंव विरून गेले परंतु त्या नंतर जमिनीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे कण दिसले.
15E i figliuoli d’Israele, veduta che l’ebbero, dissero l’uno all’altro: "Che cos’è?" perché non sapevan che cosa fosse. E Mosè disse loro: "Questo è il pane che l’Eterno vi dà a mangiare.
15ते पाहून इस्राएल लोकांनी एकमेकांना विचारले, “ते काय आहे?” त्यांनी असे विचारले कारण ते काय आहे हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा मोशेने त्यांना सांगितले, “परमेश्वर हे अन्न तुम्हाला खाण्याकरिता देत आहे.
16Ecco quel che l’Eterno ha comandato: Ne raccolga ognuno quanto gli basta per il suo nutrimento: un omer a testa, secondo il numero delle vostre persone; ognuno ne pigli per quelli che sono nella sua tenda".
16परमेश्वर म्हणतो, “आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढे प्रत्येक जणाने घ्यावे; तुम्हापैकी प्रत्येकाने तुमच्या कुटूंबातील लोकांकरिता दर माणशी आठवाट्या म्हणजे एक ओमर गोळा करावे.”‘
17I figliuoli d’Israele fecero così, e ne raccolsero gli uni più e gli altri meno.
17तेव्हा इस्राएल लोकांनी तसे केले, म्हणजे प्रत्येकाने हे अन्न गोळा करून घेतले.
18Lo misurarono con l’omer, e chi ne aveva raccolto molto non n’ebbe di soverchio; e chi ne aveva raccolto poco non n’ebbe penuria. Ognuno ne raccolse quanto gliene abbisognava per il suo nutrimento.
18लोकांनी ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकास दिले; ते मोजल्यानंतर प्रत्येकासाठी पुरेसे भरले; परंतु कमी अधिक गोळा केले असले तरी ते कधीही कमी किंवा जास्त नव्हते कारण प्रत्येक जण आपल्या स्वत:साठी व आपल्या घरातील सर्व माणसास पुरेल एवढे गोळा करी.
19E Mosè disse loro: "Nessuno ne serbi fino a domattina".
19मोशेने लोकांना सांगितले, “दुसऱ्या दिवसासाठी ते अन्न ठेवू नका.”
20Ma alcuni non ubbidirono a Mosè, e ne serbarono fino all’indomani; e quello inverminì e mandò fetore; e Mosè s’adirò contro costoro.
20परंतु लोकांनी मोशेचे ऐकले नाही, काही लोकांनी त्या अन्नातून काही बाकी ठेवले आणि त्या ठेवलेल्या अन्नात किडे पडले व त्याची घाण येऊ लागली. तेव्हा असे करणाऱ्यावर मोशे फार रागावला.
21Così lo raccoglievano tutte le mattine: ciascuno nella misura che bastava al suo nutrimento; e quando il sole si faceva caldo, quello si struggeva.
21दर दिवशी ते लोक आपल्याला पुरेसे अन्न गोळा करीत परंतु दुपारी सूर्याच्या उष्णतेमुळे ते अन्न वितळून जाई व नाहीसे होई.
22E il sesto giorno raccolsero di quel pane il doppio: due omer per ciascuno. E tutti i capi della raunanza lo vennero a dire a Mosè.
22शुक्रवारी लोकांनी दुप्पट अन्न म्हणजे दर माणशी सोळा वाट्या किंवा दोन ओमर अन्न गोळा केले. तेव्हा सर्व पुढारी लोक मोशेकडे आले व त्यांनी हे त्याला कळविले.
23Ed egli disse loro: "Questo è quello che ha detto l’Eterno: Domani è un giorno solenne di riposo: un sabato sacro all’Eterno; fate cuocere oggi quel che avete da cuocere e fate bollire quel che avete da bollire; e tutto quel che vi avanza, riponetelo e serbatelo fino a domani".
23मोशेने त्यांना सांगितले, “हे असे होईल असे परमेश्वराने सांगितले होते; हे असे झाले कारण उद्या शब्बाथ दिवस आज तुम्हाला लागणारे सर्व अन्न शिजवून तयार ठेवावे परंतु उरलेले दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवावे.”
24Essi dunque lo riposero fino all’indomani, come Mosè aveva ordinato: e quello non diè fetore e non inverminì.
24म्हणून लोकांनी उरलेले अन्न दुसऱ्या दिवसाकरिता ठेवले आणि त्यातील थोडे ही वाईट झाले नाही किंवा त्यात कोठेही किडे पडले नाहीत.
25E Mosè disse: "Mangiatelo oggi, perché oggi è il sabato sacro all’Eterno; oggi non ne troverete per i campi.
25शनिवारी मोशेने लोकांना सांगितले, “आज शब्बाथ दिवस म्हणजे विसावा घेण्याचा आणि परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचा विशेष दिवस आहे; तेव्हा तुम्हापैकी कोणीही बाहेर जाऊ नये तर तुम्ही काल गोळा केलेल्या अन्नातून जेवण खावे.
26Raccoglietene durante sei giorni; ma il settimo giorno è il sabato; in quel giorno non ve ne sarà".
26तुम्ही सहा दिवस अन्न गोळा करावे परंतु आठवड्याचा सातवा दिवस हा विसाव्याचा दिवस आहे; या दिवशी अन्न मिळणार नाही.”
27Or nel settimo giorno avvenne che alcuni del popolo uscirono per raccoglierne, e non ne trovarono.
27शनिवारी काही लोक अन्न गोळा करावयास बाहेर गेले परंतु त्यांना काहीच मिळाले नाही.
28E l’Eterno disse a Mosè: "Fino a quando rifiuterete d’osservare i miei comandamenti e le mie leggi?
28नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझ्या आज्ञा व माझे नियम पाळावयास तुम्ही कोठवर नाकारणार?
29Riflettete che l’Eterno vi ha dato il sabato; per questo, nel sesto giorno egli vi dà del pane per due giorni; ognuno stia dov’è; nessuno esca dalla sua tenda il settimo giorno".
29पाहा तुम्ही विसावा घ्यावा यासाठी परमेश्वराने शब्बाथ दिवस बनविला आहे; म्हणून शुक्रवारी परमेश्वर तुम्हाला दोन दिवस पुरेल एवढे अन्न देतो, तेव्हा शब्बाथ दिवशी तुम्ही आहात तेथे बसून विसावा घ्यावा.”
30Così il popolo si riposò il settimo giorno.
30म्हणून मग लोक शब्बाथ दिवशी विसावा घेऊ लागले.
31E la casa d’Israele chiamò quel pane Manna; esso era simile al seme di coriandolo; era bianco, e aveva il gusto di schiacciata fatta col miele.
31लोक त्या विशेष अन्नला “मान्ना” म्हणू लागले; ते धण्यासारखे पांढऱ्या रंगाचे होते त्याची चव मध घालून केलेल्या सपाट पोळी सारखी होती.
32E Mosè disse: "Questo è quello che l’Eterno ha ordinato: Empi un omer di manna, perché sia conservato per i vostri discendenti, onde veggano il pane col quale vi ho nutriti nel deserto, quando vi ho tratti fuori dal paese d’Egitto".
32मोशे म्हणाला, “परमेश्वराने सांगितले, ‘या अन्नातील आठवाट्या म्हणजे एक ओमर इतके किंवा एका एफाचा दहावा भाग इतके अन्न तुमच्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवा म्हणजे मग तुम्हाला मिसर देशातून काढून नेल्यावर मी तुम्हाला रानात कसे अन्न दिले हे त्यांना समजेल.”‘
33E Mosè disse ad Aaronne: "Prendi un vaso, mettivi dentro un intero omer di manna, e deponilo davanti all’Eterno, perché sia conservato per i vostri discendenti".
33तेव्हा मोशेने अहरोनाला सांगितले, “एक मोठ्या तोंडाचे खोल भांडे घे आणि त्यात आठवाट्या म्हणजे एक ओमर मान्ना घाल. तो परमेश्वरापुढे सादर करण्यासाठी देव तो आपल्या पुढील पिढ्यांसाठी राखून ठेव.”
34Secondo l’ordine che l’Eterno avea dato a Mosè, Aaronne lo depose dinanzi alla Testimonianza, perché fosse conservato.
34मग अहरोनाने, परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञे प्रमाणे केले. अहरोनाने परमेश्वराच्या आज्ञापटा पुढे मान्ना भरलेले ते भांडे ठेवले.
35E i figliuoli d’Israele mangiarono la manna per quarant’anni, finché arrivarono in paese abitato; mangiarono la manna finché giunsero ai confini del paese di Canaan.
35इस्राएल लोक तो मान्ना चाळीस वर्षे म्हणजे वस्ती असलेल्या देशाला पोहोंचेपर्यंत म्हणजे कनान देशाच्या सरहद्दीला पोहोंचेपर्यंत, खात होते.
36Or l’omer è la decima parte dell’efa.
36एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.