1Farai pure un altare per bruciarvi su il profumo: lo farai di legno d’acacia.
1देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी.
2La sua lunghezza sarà di un cubito; e la sua larghezza, di un cubito; sarà quadro, e avrà un’altezza di due cubiti; i suoi corni saranno tutti d’un pezzo con esso.
2ती चौरस असावी; ती आठरा इंच लांब व आठरा इंच रुंद असावी, आणि ती छत्तीस इंच उंच असावी; तिच्या चारही कोपऱ्यांना शिंगे असावीत; ती वेदीच्या एकाच अखंड लाकडाची करावी.
3Lo rivestirai d’oro puro: il disopra, i suoi lati tutt’intorno, i suoi corni; e gli farai una ghirlanda d’oro che gli giri attorno.
3वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि वेदीभोवती सोन्याचा कंगोरा करावा.
4E gli farai due anelli d’oro, sotto la ghirlanda, ai suoi due lati; li metterai ai suoi due lati, per passarvi le stanghe che serviranno a portarlo.
4त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकींच्या विरुद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल.
5Farai le stanghe di legno d’acacia, e le rivestirai d’oro.
5हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करुन ते सोन्याने मढवावेत.
6E collocherai l’altare davanti al velo ch’è dinanzi all’arca della testimonianza, di faccia al propiziatorio che sta sopra la testimonianza, dove io mi ritroverò con te.
6वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; ह्याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन.
7E Aaronne vi brucerà su del profumo fragrante; lo brucerà ogni mattina, quando acconcerà le lampade;
7“अहरोन दिव्याची तेलवात करण्यासाठी येईल त्या प्रत्येक सकाळी दररोज त्याने वेदीवर संगधी धूप जाळावा;
8e quando Aaronne accenderà le lampade sull’imbrunire, lo farà bruciare come un profumo perpetuo davanti all’Eterno, di generazione in generazione.
8पुन्हा संध्याकाळी अहरोन दिवे लावण्यासाठी येईल तेव्हा त्याने वेदीवर सुंगधी धूप जाळावा; याप्रमाणे दररोज परमेश्वरापुढे सुंगधी धूप सतत पिढयानपिढया जाळावा.
9Non offrirete sovr’esso né profumo straniero, né olocausto, né oblazione; e non vi farete libazioni.
9तिच्यावर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा धूप जाळू नये किंवा हव्य अर्पण करू नये; तसेच अन्नार्पण किंवा पेयार्पण अर्पण करू नये.
10E Aaronne farà una volta all’anno l’espiazione sui corni d’esso; col sangue del sacrifizio d’espiazione per il peccato vi farà l’espiazione una volta l’anno, di generazione in generazione. Sarà cosa santissima, sacra all’Eterno.
10“अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.”
11L’Eterno parlò ancora a Mosè, dicendo:
11परमेश्वर मोशेला म्हणाला,
12"Quando farai il conto de’ figliuoli d’Israele, facendo il censimento, ognun d’essi darà all’Eterno il riscatto della propria persona, quando saranno contati; onde non siano colpiti da qualche piaga, allorché farai il loro censimento.
12“एकूण इस्राएल लोक किती आहेत याची तुला माहिती असावी म्हणून तू त्यांची शिरगणती करावीस; अशा प्रत्येक शिरगणतीच्या वेळी प्रत्येक इस्राएलाने स्वत:च्या जिवाबद्दल परमेश्वराला खंड द्यावा; जो कोणी असा खंड देईल त्याच्यावर भयंकर संकट येणार नाही.
13Daranno questo: chiunque sarà compreso nel censimento darà un mezzo siclo, secondo il siclo del santuario, che è di venti ghere: un mezzo siclo sarà l’offerta da fare all’Eterno.
13शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएल व्यक्तिने पवित्र निवास मंडपातील अधिकृत मापाने अर्धा शेकेल खंडणी द्यावी. (एका शेकेलाचे वजन वीस ‘गेरा’ असते) हा अर्धा शेकेल म्हणजे परमेश्वराला दिलेले अर्पण होय.
14Ognuno che sarà compreso nel censimento, dai venti anni in su, darà quest’offerta all’Eterno.
14वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या शिरगणती झालेल्या प्रत्येक इस्राएली माणसाने परमेश्वराला हे अर्पण करावे.
15Il ricco non darà di più, né il povero darà meno del mezzo siclo, quando si farà quest’offerta all’Eterno per il riscatto delle vostre persone.
15श्रीमंत माणसाने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; सर्व जणांनी परमेश्वराला सारखेच अर्पण करावे; हे तुम्हाला आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्ताची खंडणी असे होईल.
16Prenderai dunque dai figliuoli d’Israele questo danaro del riscatto e lo adoprerai per il servizio della tenda di convegno: sarà per i figliuoli d’Israele una ricordanza dinanzi all’Eterno per fare il riscatto delle vostre persone".
16हा पैसा इस्राएल लोकांकडून गोळा करावा आणि त्याचा दर्शनमंडपातील सेवेसाठी उपयोग करावा; हा पैसा म्हणजे परमेश्वराला आपल्या लोकांची आठवण राहण्याचा एक मार्ग होईल; लोक आपल्या जिवाबद्दल खंडणी देत राहतील.”
17L’Eterno parlò ancora a Mosè, dicendo:
17परमेश्वर मोशेला म्हणाला,
18"Farai pure una conca di rame, con la sua base di rame, per le abluzioni; la porrai fra la tenda di convegno e l’altare, e ci metterai dell’acqua.
18“पितळेचे एक गंगाळ बनवून ते पितळेच्या बैठकीवर ठेवावे, त्यातील पाण्याचा हात पाय धुण्यासाठी उपयोग करावा; ते दर्शनमंडप व वेदी यांच्यामध्ये ठेवावे व ते पाण्याने भरावे.
19E Aaronne e i suoi figliuoli vi si laveranno le mani e i piedi.
19या गंगाळातील पाण्याने अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात पाय धुवावेत;
20Quando entreranno nella tenda di convegno, si laveranno con acqua, onde non abbiano a morire; così pure quando si accosteranno all’altare per fare il servizio, per far fumare un’offerta fatta all’Eterno mediante il fuoco.
20दर्शनमंडपात व वेदीजवळ जाताना प्रत्येक वेळी त्यांनी आपले हात पाय धुवावेत; असे केल्यास ते मरणार नाहीत.
21Si laveranno le mani e i piedi, onde non abbiano a morire. Questa sarà una norma perpetua per loro, per Aaronne e per la sua progenie, di generazione in generazione".
21त्यांनी आपले हात पाय धुतलेच पाहिजेत नाहीतर ते मरतील; हा अहरोन व त्याच्या लोकांसाठी कायमचा नियम होय; अहरोनाच्या मागे त्याच्या पुत्रपौत्रांसाठी पिढ्यान्पिढ्या हा नियम लागू राहील.”
22L’Eterno parlò ancora a Mosè, dicendo:
22मग परमेश्वर मोशेला म्हणाला,
23"Prenditi anche de’ migliori aromi: di mirra vergine, cinquecento sicli; di cinnamomo aromatico, la metà, cioè duecentocinquanta; di canna aromatica, pure duecentocinquanta;
23“उत्तमात उत्तम मसाले घे; अधिकृत मापाप्रमाणे बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल प्रवाही गंधरस; त्याच्या निम्मे म्हणजे सहा पौंड म्हणजेच अडीचशे शेकेल सुंगधी दालचिनी, बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल सुंगधी बच.
24di cassia, cinquecento, secondo il siclo del santuario; e un hin d’olio d’oliva.
24आणि बारा पौंड म्हणजे पाचशे शेकेल तज आणि एक हीनभर जैतुनाचे तेल घे.
25E ne farai un olio per l’unzione sacra, un profumo composto con arte di profumiere: sarà l’olio per l’unzione sacra.
25“व या सर्वाच्या मिश्रणाने अभिषेकासाठी पवित्र, सुंगधी तेल तयार कर;
26E con esso ungerai la tenda di convegno e l’arca della testimonianza,
26हे पवित्र तेल दर्शन मंडपावर व आज्ञापटाच्या कोशावर ओतून त्यांना पवित्र कर; या गोष्टींना विशेष महत्व आहे हे यावरून दिसून येईल.
27la tavola e tutti i suoi utensili, il candelabro e i suoi utensili, l’altare dei profumi,
27तसेच मेज व त्यांवरील सर्व समान, दीपवृक्ष व त्याची उपकरणे, धूपवेदी,
28l’altare degli olocausti e tutti i suoi utensili, la conca e la sua base.
28तसेच होमवेदी व तिचे सर्वसामान आणि गंगाळ व त्याची बैठक ह्यांसर्वावर तेल ओतावे.
29Consacrerai così queste cose, e saranno santissime; tutto quello che le toccherà, sarà santo.
29त्यांना पवित्र करावे म्हणजे ती परमेश्वराला परमपवित्र होतील; ज्याचा त्यांना स्पर्श होईल ते पवित्र होईल.
30E ungerai Aaronne e i suoi figliuoli, e li consacrerai perché mi esercitino l’ufficio di sacerdoti.
30“अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;
31E parlerai ai figliuoli d’Israele, dicendo: Quest’olio mi sarà un olio di sacra unzione, di generazione in generazione.
31इस्राएल लोकांना तू सांग की अभिषेकाचे तेल पवित्र आहे, पिढ्यान्पिढ्या ते केवळ माझ्यासाठीच वापरावे.
32Non lo si spanderà su carne d’uomo, e non ne farete altro di simile, della stessa composizione; esso è cosa santa, e sarà per voi cosa santa.
32ह्या तेलाचा, ते साधे सुवासिक तेल असल्यासारखा कोणीही वापर करु नये; हे पवित्र तेल ज्याप्रकारे तयार केले तसे तेल कोणीही तयार करु नये; हे तेल पवित्र आहे आणि तुम्हालाही ते अगदी पवित्रच वाटले पाहिजे.
33Chiunque ne comporrà di simile, o chiunque ne metterà sopra un estraneo, sarà sterminato di fra il suo popolo".
33ह्या पवित्र तेलासारखे सुवासिक तेल जर कोणी तयार करील किंवा ते कोणा परकीयाला देईल तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”
34L’Eterno disse ancora a Mosè: "Prenditi degli aromi, della resina, della conchiglia odorosa, del galbano, degli aromi con incenso puro, in dosi uguali;
34नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू हे सुवासिक मसाले म्हणजे उत्तम गंधरस, जटामांसी, गंधा बिरूजा व शुद्ध धूप आणावेस. ह्या सर्व वस्तू समभाग घ्याव्यात;
35e ne farai un profumo composto secondo l’arte del profumiere, salato, puro, santo;
35आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल.
36ne ridurrai una parte in minutissima polvere, e ne porrai davanti alla testimonianza nella tenda di convegno, dove io m’incontrerò con te: esso vi sarà cosa santissima.
36त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे.
37E del profumo che farai, non ne farete della stessa composizione per uso vostro; ti sarà cosa santa, consacrata all’Eterno.
37या धूपद्रव्याचा फक्त परमेश्वरासाठीच उपयोग करावा; त्याच्या सारखे दुसरे धूप द्रव्य तुम्ही करु नये.
38Chiunque ne farà di simile per odorarlo, sarà sterminato di fra il suo popolo".
38सुवासाचा आनंद घ्यावा म्हणून कोणी आपल्या स्वत:साठी असे धूप द्रव्य तयार करील तर त्याला आपल्या लोकांतून बाहेर काढून टाकावे.”