1Or avvenne che, in quel tempo, Giuda discese di presso ai suoi fratelli, e andò a stare da un uomo di Adullam, che avea nome Hira.
1त्याच सुमारास यहूदा आपल्या भावांना सोडून अदुलाम नगरातील हीरा नावाच्या माणसाबरोबर त्याच्या घरी राहावयास गेला.
2E Giuda vide quivi la figliuola di un Cananeo, chiamato Shua; e se la prese, e convisse con lei.
2तेथे यहूदाला शूवा नावाच्या एक कनानी माणसाची मुलगी भेटली. तेव्हा यहूदाने तिच्याशी लग्न केले.
3Ed ella concepì e partorì un figliuolo, al quale egli pose nome Er.
3त्या कनानी मुलीला एक मुलगा झाला. त्यांने त्याचे नाव एर ठेवले.
4Poi ella concepì di nuovo, e partorì un figliuolo, al quale pose nome Onan.
4त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव ओनान ठेवले.
5E partorì ancora un figliuolo, al quale pose nome Scela. Or Giuda era a Kezib, quand’ella lo partorì.
5त्यानंतर तिला शेला नावाचा आणखी एक मुलगा झाला. तिसरा मुलगा झाला तेव्हा यहूदा कजीब येथे राहात होता.
6E Giuda prese per Er, suo primogenito, una moglie che avea nome Tamar.
6यहूदाने आपला पहिला मुलगा एर याच्यासाठी बायको म्हणून तामार नावाच्या स्त्रीची निवड केली.
7Ma Er, primogenito di Giuda, era perverso agli occhi dell’Eterno, e l’Eterno lo fece morire.
7परंतु एर याने बऱ्याच वाईट गोष्टी केल्या मुळे परमेश्वर त्याच्यावर खुश नव्हता म्हणून परमेश्वराने त्याला ठार मारले.
8Allora Giuda disse a Onan: "Va’ dalla moglie del tuo fratello, prenditela come cognato, e suscita una progenie al tuo fratello".
8मग यहूदा, एर याचा भाऊ ओनान याला, म्हणाला, “तू जाऊन तुझ्या मरण पावलेल्या भावाच्या बायकोपाशी नीज; आणि तू तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वाग जर तुझ्यापासून तिला मुले झाली तर ती तुझ्या भावाची मुले समजली जातील व त्याचा वंश पुढे चालवितील:”
9E Onan, sapendo che quella progenie non sarebbe sua, quando s’accostava alla moglie del suo fratello, faceva in modo d’impedire il concepimento, per non dar progenie al fratello.
9आपल्या भावाजयीपाशी निजल्यावर ह्या मीलनातून होणारी मुले आपले नाव धारण करुन चालणार नाहीत हे ओनानला माहीत होते म्हणून जेव्हा तो त्याच्या भावजयीपाशी निजे तेव्हा तो आपले वीर्य बाहेर जमिनीवर पाडत असे.
10Ciò ch’egli faceva dispiacque all’Eterno, il quale fece morire anche lui.
10परंतु त्याच्या हया वागण्याचा परमेश्वराला राग आला, म्हणून त्याने ओनानलाही मारुन टाकले.
11Allora Giuda disse a Tamar sua nuora: "Rimani vedova in casa di tuo padre, finché Scela, mio figliuolo, sia cresciuto". Perché diceva: "Badiamo che anch’egli non muoia come i suoi fratelli". E Tamar se ne andò, e dimorò in casa di suo padre.
11मग यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “तू तुझ्या बापाच्या घरी जाऊन तेथे राहा, पण माझा मुलगा शेला लग्नाच्या वयाचा होईपर्यंत लग्न करु नको;” कारण शेलाही आपल्या दोन भावाप्रमाणे मारला जाईल अशी यहूदाला भीती वाटली; म्हणून मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.
12Passaron molti giorni, e morì la figliuola di Shua, moglie di Giuda; e dopo che Giuda si fu consolato, salì da quelli che tosavan le sue pecore a Timna; egli col suo amico Hira, l’Adullamita.
12काही काळानंतर यहूदाची बायको म्हणजे शूवाची मुलगी मरण पावली. तिच्यासाठी शोक करण्याचे दिवस संपल्यानंतर तो अदुल्लाम येथील आपला मित्र हिरा याच्याबरोबर
13Di questo fu informata Tamar, e le fu detto: "Ecco, il tuo suocero sale a Timna a tosare le sue pecore".
13आपल्या मेंढरांची लोकर कातरवून घेण्याकरिता तिम्ना येथे जात होता हे तामारला समजले.
14Allora ella si tolse le vesti da vedova, si coprì d’un velo, se ne avvolse tutta, e si pose a sedere alla porta di Enaim, ch’è sulla via di Timna; poiché vedeva che Scela era cresciuto, e nondimeno, lei non gli era stata data per moglie.
14तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता.
15Come Giuda la vide, la prese per una meretrice, perch’essa aveva il viso coperto.
15यहूदा रस्त्याने चालला होता. त्याने तिला पाहिले परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले; (कारण वेश्या जसे आपले तोंड झाकतात तसे तिने आपले तोंड बुरख्याने झाकले होते.)
16E accostatosi a lei sulla via, le disse: "Lasciami venire da te!" Poiché non sapeva ch’ella fosse sua nuora. Ed ella rispose: "Che mi darai per venire da me?"
16तेव्हा यहूदा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” (ती तामार आहे, म्हणजे आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते.) ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?”
17Ed egli le disse: "Ti manderò un capretto del mio gregge". Ed ella: "Mi darai tu un pegno finché tu me l’abbia mandato?"
17यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक चांगला तरणाबांड बकरा पाठवून देईन.” ती म्हणाली, “ठीक आहे, मी मान्य करिते, परंतु तो पाठवून देई पर्यंत प्रथम माझ्याजवळ काय हडप ठेवाल?”
18Ed egli: "Che pegno ti darò?" E l’altra rispose: "Il tuo sigillo, il tuo cordone e il bastone che hai in mano". Egli glieli dette, andò da lei, ed ella rimase incinta di lui.
18यहूदा म्हणाला, “मी तुला बकरा पाठवून देईन त्यासाठी पुरावा म्हणून तुझ्यापाशी मी काय हडप ठेवावे अशी तुझी इच्छा आहे?” तामार म्हणाली, “तुम्ही कागदपत्रे, करार वगैरेवर उमटवयासाठी व सीलबंद करण्यासाठी जो शिक्का व जी दोरी वापरता ती मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. आणि त्यामुळे ती गरोदर राहिली.
19Poi ella si levò, e se ne andò; si tolse il velo, e si rimise le vesti da vedova.
19मग घरी गेल्यावर तामारने आपले तोंड झाकण्याचा बुरखा काढून टाकला आणि पुन्हा पहिल्या सारखी विधवेची वस्त्रे घातली.
20E Giuda mandò il capretto per mezzo del suo amico, l’Adullamita, affin di ritirare il pegno di man di quella donna; ma egli non la trovò.
20आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही.
21Interrogò la gente del luogo, dicendo: "Dov’è quella meretrice che stava a Enaim, sulla via?" E quelli risposero: "Qui non c’è stata alcuna meretrice".
21त्याने एनाईम गांवातील काही लोकांना विचारले, “येथे ह्या रस्त्याच्या बाजूला होती ती वेश्या कोठे आहे?” तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.”
22Ed egli se ne tornò a Giuda, e gli disse: "Non l’ho trovata; e, per di più, la gente del luogo m’ha detto: Qui non c’è stata alcuna meretrice".
22तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सांपडली नाही, तेथे राहाणारे लोक म्हणाले की तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.”
23E Giuda disse: "Si tenga pure il pegno, che non abbiamo a incorrere nel disprezzo. Ecco, io ho mandato questo capretto, e tu non l’hai trovata".
23तेव्हा यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे. अधिक चौकशी केल्यास लोकांकडून आपलीच नालस्ती होईल आणि लोकांकडून आपले हंसे व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी कबूल केल्याप्रमाणे तिला बकरा देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपणांस सापडली नाही. झाले एवढे पुरे आहे.”
24Or circa tre mesi dopo, vennero a dire a Giuda: "Tamar, tua nuora, si è prostituita; e, per di più, eccola incinta in seguito alla sua prostituzione". E Giuda disse: "Menatela fuori, e sia arsa!"
24या नंतर जवळ तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझ्या सुनेने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या जारकर्मामुळे ती आता गरोदर राहिली आहे.” तेव्हा मग यहूदा रागाने म्हणाला, “तिला खेचून बाहेर काढा व जाळून टाका.”
25Come la menavano fuori, ella mandò a dire al suocero: "Sono incinta dell’uomo al quale appartengono queste cose". E disse: "Riconosci, ti prego, di chi siano questo sigillo, questi cordoni e questo bastone".
25त्याप्रमाणे काही लोक तामारला ठार मारण्याकरिता तिजकडे गेले, परंतु तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला. तामार म्हणाली, “मला गर्भवती करणारा पुरुष ह्या वस्तूंचा मालक आहे. या वस्तूंकडे नीट पाहा; कोणाच्या आहेत या वस्तू? कोणाची आहे ही मोहोर व ही दोरी? कोणाची आहे ही काठी? सांगा;”
26Giuda li riconobbe, e disse: "Ella è più giusta di me, giacché io non l’ho data a Scela, mio figliuolo". Ed egli non ebbe più relazioni con lei.
26यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “तिचे बोलणे अगदी बरोबर आहे; माझेच चुकले आहे; मी तिला वचन दिल्याप्रमाणे तिचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले नाही.” आणि त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी पुन्हा कधीच शरीर संबंध केला नाही.
27Or quando venne il tempo in cui doveva partorire, ecco ch’essa aveva in seno due gemelli.
27तामार हिची बाळंत होण्याची वेळ जवळ आली. तिला जुळे होणार असे लोकांना वाटले.
28E mentre partoriva, l’un d’essi mise fuori una mano; e la levatrice la prese, e vi legò un filo di scarlatto, dicendo: "Questo qui esce il primo".
28बाळंत होते वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला;”
29Ma egli ritirò la mano, ed ecco uscir fuori il suo fratello. Allora la levatrice disse: "Perché ti sei fatta questa breccia?" Per questo motivo gli fu messo nome Perets.
29परंतु त्या बाळाने आपला हात आखडून घेतला. त्यानंतर मग दुसरे बाळ प्रथम जन्मले; म्हणून मग ती सुईण म्हणाली, “हं! मग तू प्रथम वाट काढून जन्मलास तर!” म्हणून त्यांनी त्याचे नाव पेरेस (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे ‘वाट काढणारा’) असे ठेवले.
30Poi uscì il suo fratello, che aveva alla mano il filo di scarlatto; e fu chiamato Zerach.
30त्यानंतर हाताला लाल धागा बांधलेले ते दुसरे बाळ जन्मले. त्यांनी त्याचे नाव जेरह (म्हणजे हिब्रू भाषेप्रमाणे तेजस्वी किंवा तेजाने प्रकाशणारा) असे ठेवले.