Italian: Riveduta Bible (1927)

Marathi

Joshua

8

1Poi l’Eterno disse a Giosuè: "Non temere, e non ti sgomentare! Prendi teco tutta la gente di guerra, lèvati e sali contro ad Ai. Guarda, io do in tua mano il re di Ai, il suo popolo, la sua città e il suo paese.
1मग परमेश्वर यहोशवाला म्हणला, “भिऊ नको, हात पाय गाळू नको. सर्व योध्द्यांना घेऊन आय वर चाल करून जा. आयच्या राजाचा पराभव करायला मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी मदत करीन. तेथील प्रजा, ते नगर आणि ती भूमी मी तुमच्या हाती देईन.
2E tu tratterai Ai e il suo re come hai trattato Gerico a il suo re; ne prenderete per voi soltanto il bottino e il bestiame. Tendi un’imboscata dietro alla città".
2यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वत:साठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”
3Giosuè dunque con tutta la gente di guerra si levò per salire contro ad Ai. Egli scelse trentamila uomini valenti e prodi, li fe’ partire di notte, e diede loro quest’ordine:
3तेव्हा यहोशवाने सर्व सैन्यासह आय नगराकडे मोहरा वळवला. आपल्या सैन्यातील तीस हजार उत्कृष्ट योध्द्यांची निवड केली व त्यांना रातोरात पाठवले.
4"Ecco, vi fermerete imboscati dietro alla città; non v’allontanate troppo dalla città, e siate tutti pronti.
4त्यांना आज्ञा केली, “मी काय सांगतो ते सक्षपूर्वक ऐका. नगराच्या मागील बाजूस दबा धरून बसा. हल्ल्याच्या योग्य वेळेची वाट पाहा. फार लांब जाऊ नका. टेहेळणी करत तयारीत राहा.
5Io e tutto il popolo ch’è meco ci accosteremo alla città; e quando essi ci usciranno contro come la prima volta, ci metteremo in fuga dinanzi a loro.
5नगरावर हल्ला करायला लोकांना घेऊन मी पुढे जाईन. नगरातील लोक आमचा सामना करायला समोर येतील. तेव्हा आम्ही माघार घेऊन मागील वेळेप्रमाणे पळत सुटू.
6Essi c’inseguiranno finché noi li abbiam tratti lungi dalla città, perché diranno: Essi fuggono dinanzi a noi come la prima volta. E fuggiremo dinanzi a loro.
6हे लोक आमचा पाठलाग करत नगरापासून दूर येतील. पूर्वींप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत असे त्यांना वाटेल (त्यांचा हा समज कायम ठेवायला) आम्ही पळत सुटू.
7Voi allora uscirete dall’imboscata e v’impadronirete della città: l’Eterno, il vostro Dio, la darà in vostra mano.
7तेव्हा आपल्या लपण्याच्या जागा सोडून बाहेर या आणि नगराचा ताबा घ्या. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जिंकण्याचे सामर्थ्य देईल.
8E quando avrete preso la città, la incendierete; farete come ha detto l’Eterno. Badate bene, questo è l’ordine ch’io vi do".
8“परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागा. माझ्याकडे लक्ष असू द्या नगरावर हल्ला करण्याची मी आज्ञा देईन. तेव्हा नगर काबीज करून त्याला आग लावा.”
9Così Giosuè li mandò, e quelli andarono al luogo dell’imboscata, e si fermarono fra Bethel e Ai, a ponente d’Ai; ma Giosuè rimase quella notte in mezzo al popolo.
9मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.
10E la mattina levatosi di buon’ora, passò in rivista il popolo, e salì contro Ai: egli con gli anziani d’Israele, alla testa del popolo.
10दुसऱ्या दिवशी पहाटे यहोशवाने सर्व लोकांना एकत्र आणले यहोशवा व इस्राएलाच्या पुढाऱ्यांनी या लोकांसह आय कडे मोर्चा वळवला.
11E tutta la gente di guerra ch’era con lui, salì, si avvicino, giunse dirimpetto alla città, e si accampò al nord di Ai. Tra lui ed Ai c’era una valle.
11सर्व सैन्य आयवर चाल करून गेले. नगराजवळ पोचल्यावर त्यांनी उत्तरेस तळ दिला. हे सैन्य आणि आय यांच्यामध्ये एक दरी होती.
12Giosuè prese circa cinquemila uomini, coi quali tese un’imboscata fra Bethel ed Ai, a ponente della città.
12यहोशवाने मग जवळजवक पाच हजार माणसांना आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या मध्ये दबा धरून बसण्यास पाठवले.
13E dopo che tutto il popolo ebbe preso campo al nord della città e tesa l’imboscata a ponente della città, Giosuè, durante quella notte, si spinse avanti in mezzo alla valle.
13अशाप्रकारे त्याने आपल्या सैन्याला सज्ज ठेवले होते. मुख्य छावणी शहराच्या उत्तरेला होती. इतर माणसे परिचमेला दबा धरून बसली होती. रात्री यहोशवा त्या दरीत राहिला.
14Quando il re d’Ai vide questo, la gente della città si levò in fretta di buon mattino; e il re e tutto il suo popolo usciron contro a Israele, per dargli battaglia al punto convenuto, al principio della pianura; perché il re non sapeva che c’era un’imboscata contro di lui dietro la città.
14आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.
15Allora Giosuè e tutto Israele, facendo vista d’esser battuti da quelli, si misero in fuga verso il deserto.
15आयच्या सैन्यापुढे आपली पीछेहाट होते आहे असे यहोशवा व इस्राएलच्या लोकांनी भासवले आणि ते वाळवंटाच्या दिशेला पूर्वेकडे पळत सुटले.
16E tutto il popolo ch’era nella città fu chiamato a raccolta per inseguirli; e inseguirono Giosuè e furon tratti lungi dalla città.
16आयच्या सैन्याने आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करायला सुरूवात केली. नगरातील सर्व लोक यात सामील झाले नगरतील सगळे नगर सोडून बाहेर पडले.
17Non ci fu uomo, in Ai e in Bethel, che non uscisse dietro a Israele. Lasciaron la città aperta e inseguirono Israele.
17आय आणि बेथेल मधील एकूणएक माणसे इस्राएल सैन्याच्या पाठलागावर गेली. नगर मोकळे झाले. त्याचे रक्षण करायला कोणी उरला नाही.
18Allora l’Eterno disse a Giosuè: "Stendi verso Ai la lancia che hai in mano, perché io sto per dare Ai in tuo potere". E Giosuè stese verso la città la lancia che aveva in mano.
18तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “आता तुझ्या हातातील शस्त्र आय नगरावर उगार. मी हे नगर तुझ्या हवाली करत आहे.” तेव्हा यहोशवाने आयवर आपली बरची उगारली.
19E subito, non appena ebbe steso la mano, gli uomini dell’imboscata sorsero dal luogo dov’erano, entraron di corsa nella città, la presero, e s’affrettarono ad appiccarvi il fuoco.
19दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.
20E la gente d’Ai, volgendosi indietro, guardò, ed ecco che il fumo della città saliva al cielo; e non vi fu per loro alcuna possibilità di fuggire né da una parte né dall’altra, perché il popolo che fuggiva verso il deserto s’era voltato contro quelli che lo inseguivano.
20आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली.
21E Giosuè e tutto Israele, vedendo che quelli dell’imboscata avean preso la città e che il fumo saliva dalla città, tornarono indietro, e batterono la gente d’Ai.
21आपल्या माणसांनी नगराचा ताबा घेतला आहे आणि नगरातून धूर निघत आहे हे पाहताच यहोशवाने व इस्राएल लोकांनी मागे वळून आयच्या लोकांवर हल्ला केला.
22Anche gli altri usciron dalla città contro a loro; cosicché furon presi in mezzo da Israele, avendo gli uni di qua e gli altri di là; e Israele li batté in modo che non ne rimase né superstite né fuggiasco.
22ते पाहून लपून राहिलेली आणखी माणसे त्यांच्यावर चाल करू आली. अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी चाल करून येऊन इस्राएलांनी आयच्या लोकांची चांगलीच कोंडी केली. त्यांनी आयचा पराभव केला. आय वासियांपैकी एकहीजण जिवंत राहिला नाही की निसटून जाऊ शकला नाही.
23Il re d’Ai lo presero vivo, e lo menarono a Giosuè.
23आयच्या राजाला मात्र जीवदान मिळाले. त्याला पकडून यहोशवापुढे हजार करण्यात आले.
24Quando Israele ebbe finito d’uccidere tutti gli abitanti d’Ai nella campagna, nel deserto dove quelli l’aveano inseguito, e tutti furon caduti sotto i colpi della spada finché non ne rimase più, tutto Israele tornò verso Ai e la mise a fil di spada.
24या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली.
25Tutti quelli che caddero in quel giorno, fra uomini e donne, furon dodicimila: vale a dire tutta la gente d’Ai.
25अशाप्रकारे आय मधील सर्वजण त्यादिवशी मरण पावले. बायकापुरूष मिळून ती बारा हजार माणसे होती.
26Giosuè non ritirò la mano che avea stesa con la lancia, finché non ebbe sterminato tutti gli abitanti d’Ai.
26हे नगर उध्वस्त करायचा इशारा म्हणून यहोशवाने आपली बरची आयवर उगारलेली होती आणि सर्वांचा संहार होईपर्यंत त्याने ती तशीच उगारलेली ठेवली.
27Israele prese per se soltanto il bestiame e il bottino di quella città, secondo l’ordine che l’Eterno avea dato a Giosuè.
27शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमता इस्राएल लोकांनी स्वत:साठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.
28Giosuè arse dunque Ai e la ridusse in perpetuo in un mucchio di ruine, com’è anch’oggi.
28यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे.
29Quanto al re d’Ai, l’appiccò a un albero, e ve lo lasciò fino a sera; ma al tramonto del sole Giosuè ordinò che il cadavere fosse calato dall’albero; e lo gittarono all’ingresso della porta della città, e gli ammassarono sopra un gran mucchio di pietre, che rimane anche al di d’oggi.
29आयच्या राजाला यहोशवाने एका झाडावर फाशी दिले आणि संध्याकाळपर्यंत त्याचे प्रेत तसेच तेथे टांगत ठेवले. सूर्यास्ताच्या वेळी त्याने ते लोकांना उतरवायला सांगितले. त्यांनी ते झाडावरून काढून नगराच्या वेशीपाशी टाकले. व तो मृतदेह दगडाधोंड्यांनी झाकून टाकला. तीही रास आज तशीच आहे.
30Allora Giosuè edificò un altare all’Eterno, all’Iddio d’Israele, sul monte Ebal,
30मग यहोशवाने एबाल पर्वतावर इस्राएल लोकांच्या परमेश्वर देवासाठी वेदी बांधली.
31come Mosè, servo dell’Eterno, aveva ordinato ai figliuoli d’Israele, e come sta scritto nel libro della legge di Mosè: un altare di pietre intatte sulle quali nessuno avea passato ferro; e i figliuoli d’Israele offriron su di esso degli olocausti all’Eterno, e fecero de’ sacrifizi di azioni di grazie.
31परमेश्वराचा सेवक मोशे याने वेद्या कशा बांधाव्यात हे इस्राएल लोकांना सांगितले होते. तेव्हा, मोशेच्या नियमशास्त्रात लिहून ठेवल्या बरहुकूम यहोशवाने ती बांधली. त्यासाठी कोणत्याही हत्याराचा स्पर्श न झालेले अखंड पाषाण वापरले. अशा वेदीवर त्यांनी होमार्पणे तसेच शांत्यार्पणे वाहिली.
32E là, su delle pietre, Giosuè scrisse una copia della legge che Mosè avea scritta in presenza dei figliuoli d’Israele.
32त्याठिकाणी समस्त इस्राएल लोकांसाठी म्हणून यहोशवाने मोशेच्या नियमशास्त्राची पाषाणांवर नक्कल करून ठेवली.
33Tutto Israele, i suoi anziani, i suoi ufficiali e i suoi giudici stavano in piè ai due lati dell’arca, dirimpetto ai sacerdoti levitici che portavan l’arca del patto dell’Eterno: gli stranieri come gl’Israeliti di nascita, metà dal lato del monte Garizim, metà dal lato del monte Ebal, come Mosè, servo dell’Eterno, avea da prima ordinato che si benedisse il popolo d’Israele.
33यावेळी सर्व वडीलधारी माणसे, अंमलदार, न्यायाधीश व इतर इस्राएल लोक पवित्र करारकोशाभोवती उभे होते. हा परमेश्वराचा पवित्र करारकोश वाहून नेणाऱ्या लेवी याजकांसमोर ते उभे होते. उपस्थितात मूळचे इस्राएल लोक तसेच परकेही होते. त्यांच्यापैकी निम्मे एबाल पर्वतासमोर तर निम्मे गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. परमेश्वरचा सेवक मोशे याने आशीर्वादाच्या वाचनासाठी त्यांना तसे उभे राहायला सांगितले होते.
34Dopo questo, Giosuè lesse tutte le parole della legge, le benedizioni e le maledizioni, secondo tutto ciò ch’è scritto nel libro della legge.
34मग यहोशवाने नियमशास्त्रातील आशीर्वचने आणि शापवाणी वाचून दाखवली त्यात एका शब्दाचाही फेरफार केला नाही.
35Non vi fu parola di tutto ciò che Mosè avea comandato, che Giosuè non leggesse in presenza di tutta la raunanza d’Israele, delle donne, de’ bambini e degli stranieri che camminavano in mezzo a loro.
35स्त्रिया, मुले, परकीय यांच्यासह सर्व इस्राएल लोर तेथे हजर होते. त्यांना मोशेच्या सर्व आज्ञा यहोशवाने वाचून दाखवल्या.