Marathi

Indonesian

Isaiah

39

1त्या वेळेला, बलदानचा मुलगा मरोदख बलदान बाबेलचा राजा होता. मरोदखने हिज्कीयाच्या आजारपणाबद्दल आणि त्याच्या बरे होण्याविषयी ऐकले, म्हणून त्याने हिज्कीयाला पत्रे व भेटी पाठविल्या.
1Sekitar waktu itu, raja Babel, yaitu Merodakh Baladan anak Baladan, mendengar bahwa Raja Hizkia baru sembuh dari sakit. Maka ia mengutus orang untuk membawa surat dan hadiah kepada Hizkia.
2ह्या भेटींमुळे हिज्कीयाला आनंद झाला. म्हणून त्याने आपल्या राज्यातील अगदी खास अशा गोष्टी मरोदखच्या माणसांना पाहू दिल्या. हिज्कीयाने आपली संपत्ती त्यांना दाखविली. त्यात चांदी, सोने, अमूल्य तेले आणि अत्तरे होती. युध्दात वापरलेल्या तलवारी आणि ढालीही हिज्कीयाने त्यांना दाखविल्या. त्याने जमविलेल्या सर्व वस्तू मरोदखच्या माणसांना दाखविल्या. त्याने आपल्या घरातील व राज्यातील सर्व काही दाखविले.
2Hizkia menyambut para utusan itu dengan senang hati dan menunjukkan kepada mereka segala kekayaannya, yaitu emas dan perak, rempah-rempah dan minyak wangi, dan seluruh perlengkapan tentaranya. Tak ada sesuatu pun di istana dan di seluruh kerajaannya yang tidak diperlihatkannya kepada mereka.
3संदेष्टा यशया, हिज्कीया राजाकडे गेला आणि त्याने विचारले, “ही माणसे काय म्हणत होती? ती कोठून आली होती?” हिज्कीया उत्तरला, “ती फार दूरच्या देशातून माझ्याकडे आली होती. ती बाबेलमधून आली होती.”
3Kemudian Nabi Yesaya menghadap Raja Hizkia dan bertanya, "Dari mana orang-orang itu? Apa kata mereka?" Hizkia menjawab, "Mereka dari Babel, negeri yang jauh."
4मग यशयाने विचारले, “तुझ्या राज्यात त्यांनी काय काय पाहिले?” हिज्कीया उत्तरला, “माझ्या राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पाहिली. माझी सर्व संपत्ती मी त्यांना दाखविली.”
4"Mereka melihat apa di istana?" tanya Yesaya lagi. "Segala-galanya," jawab Hizkia. "Tidak ada barang di dalam perbendaharaan istana yang tidak kuperlihatkan kepada mereka."
5यशया हिज्कीयाला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराचे म्हणणे ऐक.
5Lalu Yesaya berkata kepada raja, "TUHAN Yang Mahakuasa berkata,
6“भविष्यात, तुझ्या पूर्वजांनी आणि तू आतापर्यंत जे जमविले आहे ते सर्व लुटले जाईल आणि बाबेलला नेले जाईल.’ सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले.
6'Akan tiba saatnya segala kekayaan di dalam istanamu, dan yang telah dikumpulkan leluhurmu sampai hari ini, diangkut ke Babel. Tidak ada yang akan tertinggal.
7तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”
7Dari anak cucumu ada yang akan diambil dan dijadikan pegawai istana untuk melayani raja Babel.'"
8हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वरचे हे बोल ऐकायला बरे वाटतात.” (हिज्कीयाला वाटले मी राजा असताना सगळीकडे शांतता असेल, कसलाही त्रास असणार नाही.” म्हणून तो असे म्हणाला.)
8Raja Hizkia menjawab, "Baik juga pesan TUHAN yang kausampaikan kepadaku." Ia menjawab begitu karena berpikir: "Asal kerajaanku tetap aman dan damai selama aku hidup."