1परमेश्वर म्हणतो, “दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या. राष्ट्रांनो, शूर व्हा, येऊन माझ्याशी बोला. आपण एकत्र जमून कोणाचे बरोबर आहे ते ठरवू.
1Kata Allah, "Diamlah dan dengarkan Aku, hai penduduk negeri-negeri yang jauh. Bersiaplah untuk tampil di pengadilan, majulah dan ajukanlah perkaramu. Mari kita bersidang bersama, untuk memutuskan siapa benar, siapa salah.
2माझ्या पुढील प्रश्नांना उत्तरे द्या:पूर्वेकडून येणाऱ्या माणसाला कोणी उठविले? चांगलुपणा त्याच्याबरोबर आहे. तो त्याच्या तलवारीच्या जोरावर राष्ट्रांना पराभूत करतो मग त्यांची जणू माती होते. तो तीर सोडतो आणि राजांना जिंकतो. वाऱ्याने गवताची काठी उडावी तसे ते दूर पळतात.
2Siapakah yang menggerakkan penguasa dari timur, dan memberi dia kemenangan terus-menerus? Siapakah yang membuat dia mengalahkan bangsa-bangsa, dan menaklukkan raja-raja baginya? Pedangnya membuat mereka terserak seperti debu, panahnya menghamburkan mereka seperti jerami ditiup angin.
3तो सैन्याचा पाठलाग करतो पण त्याला कधीच ईजा होत नाही पूर्वी कधीही न गेलेल्या ठिकाणी तो जातो.
3Ia terus mengejar dan maju tanpa rintangan; kakinya cepat, hampir tak menyentuh jalan.
4ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.
4Siapakah yang melakukan semuanya itu? Siapakah yang menentukan jalannya sejarah? Aku, TUHAN, Akulah yang pertama, dan tetap ada sampai penghabisan.
5अती दूरच्या सर्व स्थळांनो, पाहा आणि भिऊन असा! पृथ्वीवरच्या दूरवरच्या सर्व ठिकाणांनो, भीतीने थरथर कापा! इकडे या आणि माझे ऐका.” आणि ते आले.
5Penduduk negeri-negeri jauh melihat apa yang telah Kuperbuat. Mereka terkejut dan gemetar ketakutan, lalu berkumpul bersama dan datang.
6“कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात.
6Semua orang saling menolong, dan saling menguatkan hati.
7एकजण मूर्ती करण्यासाठी लाकूड कापतो. तो सोन्याचे काम करणाऱ्याला उत्तेजन देतो. दुसरा हातोडीने धातू मऊ करतो. तो ऐरणी वर घाव घालणाऱ्याला उत्तर देतो हा शेवटचा कामगार म्हणतो, ‘हे काम चांगले झाले. सोने आता निघून येणार नाही.’ नंतर तो खिळ्याने मूर्ती पायावर पक्की बसवितो. मग मूर्ती खाली पडू शकत नाही आणि ती कधीही सरकत नाही.”
7Tukang kayu menguatkan hati tukang emas, orang yang memipihkan logam dengan martil memuji orang yang menempa di atas landasan. Katanya, 'Baik benar pekerjaanmu'; lalu dikuatkannya dengan paku supaya tidak goyang.
8परमेश्वर म्हणतो, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. याकोब, मी तुझी निवड केली. तू अब्राहामच्या वंशातील आहेस. आणि अब्राहामवर प्रेम केले.
8Tetapi engkau, Israel, hamba-Ku, umat pilihan-Ku, engkau keturunan Abraham, sahabat-Ku.
9पृथ्वीवर खूप लांब, दूरच्या देशात होतास, पण मी तुला बोलाविले व सांगितले, ‘तू माझा सेवक आहेस.”‘ मी तुझी निवड केली आणि मी कधीच तुझ्याविरूध्द गेलो नाही.
9Engkau telah Kuambil dari ujung-ujung bumi, Kupanggil dari tempat-tempat yang terjauh. Kata-Ku, 'Engkaulah hamba-Ku; Aku tidak menolak pilihan-Ku.'
10काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.
10Jangan takut, sebab Aku menyertaimu, jangan cemas, sebab Aku Allahmu. Engkau akan Kuteguhkan dan Kutolong, Kutuntun dengan tangan-Ku yang jaya.
11बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.
11Lihatlah, semua orang yang marah kepadamu, akan dikalahkan dan tersipu-sipu. Orang-orang yang melawan engkau, akan binasa dan habis tersapu.
12तू तुझ्याविरूध्द असणाऱ्या लोकांना शोधशील पण ते तुला सापडू शकणार नाहीत. ते संपूर्णपणे नाहीसे होतील.
12Engkau akan mencari orang-orang yang menentang engkau, tetapi mereka tidak kautemukan. Orang-orang yang berperang dengan engkau sekarang sudah binasa dan hilang.
13मी परमेश्वर तुझा देव आहे, मी तुझा उजवा हात धरतो आहे, मी तुला सांगतो: घाबरू नकोस मी तुला मदत करीन.
13Sebab Aku TUHAN, Allahmu, memegang tangan kananmu; kata-Ku, 'Jangan takut, Aku akan menolong engkau.'"
14बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.
14Kata TUHAN, "Jangan takut, Israel, biarpun engkau kecil dan lemah. Akulah TUHAN yang menolong engkau, Yang Mahakudus, Allah Israel adalah Penyelamatmu.
15“मी तुम्हाला कोऱ्या मळणीयंत्राप्रमाणे केले आहे. त्या यंत्राला खूप तीक्ष्ण दाते आहेत. शेतकरी त्याचा उपयोग टरफलांपासून धान्य वेगळे करण्याकरिता करतात. त्याचप्रमाणे तुम्ही डोंगर पायाखाली तुडवून चिरडून टाकाल. तुम्ही टेकडयांची अवस्था धान्याच्या भुसकटाप्रमाणे कराल.
15Lihatlah, engkau Kujadikan seperti papan pengirik, yang baru, tajam dan bergigi dua jajar. Engkau akan mengirik gunung-gunung dan menghancurkannya; bukit-bukit kaujadikan seperti sekam.
16तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”
16Engkau akan menampi mereka, lalu mereka diterbangkan angin dan dihamburkan topan. Engkau akan bergembira karena Aku, TUHAN, dan bermegah karena Aku, Allah Israel.
17“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.
17Apabila bangsa-Ku yang malang itu mencari air, dan kerongkongan mereka kering karena kehausan, maka Aku, TUHAN, akan menjawab doa mereka; Allah Israel tak akan meninggalkan umat-Nya.
18वैराण टेकड्यांवर मी नद्या वाहायला लावीन आणि दऱ्यांतून झऱ्याचे पाणी वाहायला लावीन. मी वाळवंटाचे रूपांतर पाण्याने भरलेल्या सरोवरात करीन. त्या शुष्क भूमीवर पाण्याचे झरे वाहतील.
18Kubuat sungai-sungai mengalir di bukit-bukit yang gundul; mata air akan membual di tengah dataran. Padang gurun akan Kujadikan telaga; air akan memancar dari tanah yang kering.
19वाळवंटात गंधसरू, बाभूळ, ऑलिव्ह (तेल) सरू, देवदारू आणि भद्रदारू हे वृक्ष वाढतील.
19Padang gurun akan Kutanami pohon cemara, pohon zaitun, pohon murad dan pohon akasia. Padang belantara akan Kujadikan hutan, hutan eru, berangan dan cemara.
20लोक हे सर्व पाहतील आणि परमेश्वराच्या सामर्थ्यामुळेच हे सर्व झाले आहे हे त्यांना कळेल. हे सर्व घडवून आणणारा एकमेव पवित्र (देव) आहे हे लोकांना, हे सर्व पाहिल्यावर कळेल.”
20Maka semua orang akan melihatnya dan mengetahui bahwa Aku, TUHAN, yang melakukannya. Mereka akan memperhatikan dan mengerti, Allah kudus Israel membuat itu terjadi."
21परमेश्वर, याकोबचा राजा म्हणतो, “या आणि तुमचे काय मुद्दे आहेत ते मला सांगा तुमचे त्याबद्दलचे पुरावे मला दाखवा आणि मग आपण काय बरोबर आहे ते ठरवू.
21TUHAN, raja Israel, berkata kepada dewa-dewa, "Ajukanlah perkaramu, kemukakan alasan-alasannya!
22तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे. “सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.
22Datanglah, dan ramalkanlah apa yang akan terjadi, supaya kami tahu kesudahannya nanti. Beritahukanlah kejadian-kejadian yang dahulu, terangkan artinya supaya kami perhatikan.
23काय घडेल हे समजण्यासाठी कोणत्या गोष्टी आम्ही पाहाव्या ते आम्हाला सांगा. मग आमचा तुमच्यावर खरोखरचे देव म्हणून विश्वास बसेल. काहीतरी चांगले किंवा वाईट करा म्हणजे आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात आहात, जिवंत आहात हे दिसेल व आम्ही तुम्हाला अनुसरू.
23Katakanlah apa yang akan terjadi, supaya kami tahu kamu sungguh ilahi. Lakukanlah yang berguna atau yang merugikan, supaya kami tercengang melihatnya.
24“बघा! तुम्ही शून्य किंमतीचे आहात तुम्ही काहीच करू शकत नाही फक्त कवडी किंमतीची माणसेच तुमची पूजा करू इच्छितात.”
24Sesungguhnya, kamu dan perbuatanmu tidak ada, dan para pemujamu menjijikkan saja.
25“मी उत्तरेकडील एका माणसाला उठविले तो उगवत्या सूर्याच्या दिशेकडून म्हणजे पूर्वेकडून येत आहे. तो माझी उपासना करतो. कुंभार ज्याप्रमाणे चिखल तुडवितो, त्याप्रमाणे तो विशिष्ट माणूस राजांना तुडवेल.”
25Aku telah menggerakkan seorang dari timur: Kupanggil dia untuk menyerang dari utara. Para penguasa akan diinjak-injaknya seperti lumpur, seperti tukang periuk menginjak-injak tanah liat.
26हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले? त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणात्या मूर्तीने हे सांगितले का? नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही. त्या मूर्ती एक शब्दसुध्दा बोलत नाहीत. आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.
26Siapa dari kamu sudah menubuatkannya sehingga kami dapat membenarkan dia? Tetapi di antara kamu tak ada yang memberitahukannya, tidak ada yang mendengar kamu berbicara.
27सियोनला ह्या गोष्टीबद्दल सांगणारा पहिला मी म्हणजेच परमेश्वर आहे. मी यरूशलेमला दूताबरोबर संदेश पाठविला. “पाहा! तुझे लोक परत येत आहेत.”
27Aku, TUHAN, yang pertama mengabarkannya kepada Sion; Aku mengirim pembawa kabar baik ke Yerusalem.
28मी त्या खोट्या देवांना पाहिले. काहीही सांगण्याइतके ते शहाणे नाहीत. मी त्यांना प्रश्न विचारले, पण त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही.
28Waktu Kucari di antara dewa-dewa, tak satu pun dapat memberi petunjuk, tak ada yang dapat menjawab.
29ते सगळे देव कवडीमोलाचे आहेत. ते काही करू शकत नाहीत. त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत.
29Sungguh, dewa-dewa itu tidak berguna, mereka hanya patung tuangan yang tidak berdaya, dan tidak mampu berbuat apa-apa."