Marathi

Indonesian

Isaiah

60

1“यरूशलेम, माझ्या ज्योती, ऊठ. तुझा प्रकाश (देव) येत आहे. परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल.
1Bangkitlah dan jadilah terang, hai Yerusalem, sebab terang keselamatanmu sudah datang; Allah menyinari engkau dengan kemuliaan-Nya.
2आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत. पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल, त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल.
2Bumi diliputi kegelapan, bangsa-bangsa ditutupi kekelaman; tetapi terang TUHAN terbit di atasmu, cahaya kehadiran-Nya menjadi nyata di atasmu.
3राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील. राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
3Bangsa-bangsa datang berduyun-duyun ke terangmu, raja-raja tertarik oleh cahaya yang terbit bagimu.
4तुझ्या सभोवती पाहा! बघ, लोक तुझ्या भोवती जमून तुझ्याकडे येत आहेत. ती तुझी दूरवरून येणारी मुले आहेत आणि त्याच्याबरोबर, तुझ्या मुलीही येत आहेत.
4Lihatlah apa yang terjadi di sekelilingmu; rakyat berhimpun untuk pulang kepadamu. Anak-anakmu laki-laki datang dari jauh, anak-anakmu perempuan digendong.
5हे भविष्यात घडून येईल. त्यावेळी तू तुझ्या लोकांना पाहशील. तुझा चेहरा मग आनंदाने उजळेल. प्रथम तू घाबरशील. पण नंतर तुझ्या भावना अनावर होतील. समुद्रापलीकडील सर्व संपत्ती तुझ्यापुढे ठेवली जाईल. राष्ट्रांचे सर्व धन तुला मिळेल.
5Melihat itu engkau heran dan wajahmu berseri; engkau terharu dan berbesar hati. Harta bangsa-bangsa dibawa kepadamu, kekayaan dari seberang laut melimpahimu.
6मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.
6Negerimu dikerumuni banyak unta, mereka datang dari Midian dan Efa. Dari Syeba orang membawa emas dan kemenyan, sambil memuji perbuatan TUHAN.
7लोक केदारमधील सर्व मेंढ्या गोळा करून तुला देतील. नबायोथचे मेंढे ते तुझ्याकडे आणतील. तू ती जनावरे माझ्या वेदीवर अर्पण करशील आणि मी त्यांचा स्वीकार करीन. मी माझे सुंदर मंदिर आणखी सुंदर करीन.
7Kambing domba Kedar dibawa kepadamu domba jantan dari Nebayot tersedia untuk ibadatmu. Kurban itu menyenangkan hati TUHAN Ia menyemarakkan Rumah-Nya yang penuh keagungan.
8लोकांकडे पाहा! आकाशात वेगाने ढग सरकावेत त्याप्रमाणे ते घाईने तुझ्याकडे येत आहेत ते जणू घरट्याकडे उडत येणारे पारवे आहेत.
8Apakah itu yang melayang seperti awan seperti merpati yang sedang terbang pulang?
9दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत. दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत. परमेश्वराचा तुझ्या देवाचा, इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील. परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
9Itulah kapal-kapal yang datang berlabuh membawa umat Allah pulang dari negeri jauh. Perak dan emas dibawanya serta untuk memuji TUHAN Allahmu; bagi Allah Israel Yang Mahasuci, yang membuat umat-Nya dihormati.
10दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील, राजे तुझी सेवा करतील “मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले. पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
10TUHAN berkata kepada Yerusalem, "Orang asing akan membangun kembali tembokmu, dan raja-raja akan melayanimu. Dulu Aku menghukum engkau dalam kemarahan-Ku, tetapi sekarang Aku berkenan mengasihanimu.
11तुझे दरवाजे सदोदित उघडे राहतील. दिवस असो वा रात्र ते कधीही बंद होणार नाहीत. राष्ट्रे आणि राजे, त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील.
11Siang malam pintu gerbangmu akan terbuka, supaya kekayaan bangsa-bangsa dapat diantar kepadamu, dengan raja-raja mereka sebagai tawanan.
12जे राष्ट्र अथवा जे राज्य तुझी सेवा करीत नाही त्याचा नाश होईल.
12Bangsa dan kerajaan yang tak mau mengabdi kepadamu, akan binasa dan hilang lenyap.
13लबानोनमधील मौल्यवान चिजा तुला दिल्या जातील. लोक सुरू देवदारू आणि भद्रदारू तुला आणून देतील. माझे पवित्र स्थान सुंदर करण्यासाठी या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला जाईल. ही जागा म्हणजे जणू काही माझ्या सिंहासनासमोरील चौरंग आहे आणि मी त्याला फार महत्व देईन.
13Kebanggaan hutan Libanon akan diangkut kepadamu kayu pohon berangan, cemara dan eru untuk menjadikan Rumah-Ku semarak, dan memperindah tempat Aku berpijak.
14पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी तुझा तिरस्कार केला तेच आता तुझ्या पायाशी वाकतील. तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’ ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.”‘
14Anak-anak penindasmu datang bersujud, yang pernah menghina engkau akan tunduk, engkau akan disebut 'Kota TUHAN', 'Sion, Kota Allah Kudus Israel'.
15“तुला पुन्हा कधीही एकटे सोडले जाणार नाही. पुन्हा कधीही तुझा तिरस्कार केला जाणार नाही. तुला पुन्हा कधीही ओस पाडले जाणार नाही. मी तुला चिरकालासाठी मोठी करीन. तू चिरंतन सुखी होशील.
15Engkau tak akan ditinggalkan dan dibenci, dan tidak dibiarkan menjadi sunyi sepi. Engkau Kujadikan kebanggaan abadi, tempat kegembiraan untuk selamanya.
16राष्ट्रे तुला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट देतील. हे म्हणजे मुलाने आईचे स्तनपान करावे तसे असेल. पण तू राजांच्या संपत्तीचे ‘पान’ करशील. मग तुला समजेल की तो मी आहे, जो तुला वाचवितो, तो परमेश्वर मी आहे. तुला कळेल की याकोबाचा महान देव तुझे रक्षण करतो.
16Engkau akan dipelihara bangsa-bangsa dan raja-raja, seperti seorang ibu memelihara anaknya. Maka tahulah engkau bahwa Aku TUHAN, Penyelamatmu, dan bahwa Allah Israel yang kuat Pembebasmu.
17“आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.
17Aku membawa emas sebagai ganti perunggu, dan perak sebagai ganti besi. Kuberi perunggu sebagai ganti kayu, dan besi sebagai ganti batu. Negerimu akan Kubuat aman dan tentram, dan diperintah dengan keadilan.
18“तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
18Tak akan ada lagi berita tentang kekerasan di negerimu, tentang kehancuran dan keruntuhan di wilayahmu. Seperti tembok Aku akan melindungi engkau, dan engkau akan memuji Aku sebagai penyelamatmu.
19“या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.
19Engkau tak perlu disinari matahari di waktu siang, dan tak perlu diterangi bulan di waktu malam. Sebab Aku TUHAN menjadi penerang abadi bagimu, Aku menyinari engkau dengan keagungan-Ku.
20“तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल. तुझा दु:खाचा काळ संपेल.
20Bagimu akan ada matahari yang tak pernah terbenam, dan bulan yang tak pernah surut. Sebab Aku TUHAN menjadi penerang abadi bagimu masa berkabungmu akan berakhir.
21“तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
21Pendudukmu akan bertindak dengan benar, mereka akan memiliki negeri untuk selama-lamanya. Mereka seperti cangkokan yang Kutanam sendiri, untuk menyatakan keagungan-Ku.
22सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल. सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल. योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन. मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
22Bahkan keluarga yang kecil dan hina akan menjadi bangsa yang besar dan kuat. Aku TUHAN akan segera bertindak, pada saat yang tepat."