Marathi

Indonesian

Job

30

1परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत. आणि त्याचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
1Tetapi kini aku diejek oleh orang yang lebih muda. Dahulu ayah mereka kupandang terlalu hina untuk menjaga dombaku bersama anjing gembala.
2त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
2Bagiku mereka tidak berguna karena sudah kehabisan tenaga.
3ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
3Mereka lapar dan menderita sekali, sehingga makan akar kering di gurun yang sunyi.
4ते वाळवटांतील क्षार - झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
4Mereka mencabut belukar di padang belantara lalu memakan baik daun maupun akarnya.
5त्यांना दुसऱ्या माणसांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
5Mereka diusir dengan tengking seperti orang mengusir maling.
6त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते.
6Mereka tinggal di dalam gua-gua; lubang-lubang di dinding gunung menjadi rumah mereka.
7ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहातात.
7Di rimba mereka meraung-raung seperti binatang, berkelompok di bawah semak belukar di hutan.
8ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
8Mereka tak bernama dan tak berharga, orang-orang yang sudah dihalau dari negerinya.
9“अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
9Sekarang mereka datang dan aku ditertawakannya; bagi mereka, aku ini lelucon belaka.
10ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहातात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
10Aku dipandang oleh mereka hina dan keji, bahkan mukaku mereka ludahi.
11देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
11Karena Allah membuat aku lemah tidak berdaya, mereka melampiaskan amukan mereka.
12ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
12Gerombolan itu menyerang aku dari depan, dan kejatuhanku mereka rencanakan.
13मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
13Mereka memotong jalanku untuk membinasakan aku; tak seorang pun menghalangi ketika mereka menyerbu.
14ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
14Bagaikan banjir mereka dobrak tembok pertahananku; beramai-ramai mereka datang menindih tubuhku.
15भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
15Kedahsyatan meliputi diriku; bagaikan hembusan angin, harga diriku berlalu; bagaikan awan lewat, hilanglah kebahagiaanku.
16“माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसांनी मला वेढून टाकले आहे.
16Sekarang hampir matilah aku; tak ada keringanan bagi deritaku.
17माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
17Pada waktu malam semua tulangku nyeri; rasa sakit yang menusuk tak kunjung berhenti.
18देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
18Allah mencengkeram aku pada leher bajuku sehingga pakaianku menggelambir pada tubuhku.
19देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
19Ke dalam lumpur aku dihempaskan-Nya, aku menjadi seperti sampah saja!
20देवा मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहातो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
20Aku berseru kepada-Mu, ya Allah, Kau tak memberi jawaban; bila aku berdoa, Kau tak memperhatikan.
21देवा तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
21Engkau berlaku kejam terhadapku, Kautindas aku dengan seluruh kekuatan-Mu.
22देवा तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
22Engkau membiarkan angin melayangkan aku; dalam angin ribut Kauombang-ambingkan diriku.
23तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच.
23Aku tahu, Kaubawa aku kepada alam kematian, tempat semua yang hidup dikumpulkan.
24“परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्याला कुणी अधिक दु:ख देणार नाही.
24Mengapa Kau menyerang orang yang celaka, yang tak dapat berbuat apa pun kecuali mohon iba?
25देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
25Bukankah aku menangis bersama orang yang kesusahan, dan mengasihani orang yang berkekurangan?
26परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
26Aku mengharapkan bahagia dan terang, tapi kesukaran dan kegelapanlah yang datang.
27मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
27Aku terkoyak oleh duka dan nestapa; hari demi hari makin banyak yang kuderita.
28मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
28Di dalam kelam, tanpa cahaya, aku berkeliaran; aku berdiri di muka umum, minta pertolongan.
29रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे.
29Suaraku sedih penuh iba seperti tangis serigala dan burung unta.
30माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
30Kulitku menjadi hitam; tubuhku terbakar oleh demam.
31माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.
31Dahulu kudengar musik gembira, kini hanya ratapan tangis belaka.