Marathi

Indonesian

Luke

3

1तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी, जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना, आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
1Pada tahun kelima belas dari pemerintahan Kaisar Tiberius, Pontius Pilatus menjadi gubernur di Yudea, dan Herodes memerintah di Galilea. Filipus, saudara dari Herodes memerintah di wilayah Iturea dan Trakhonitis, sedangkan Lisanias memerintah di Abilene.
2हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले.
2Yang menjabat imam-imam agung ialah Hanas dan Kayafas. Pada tahun itulah Allah berbicara kepada Yohanes, anak Zakharia di padang pasir.
3तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला.
3Maka Yohanes pergi ke mana-mana di seluruh daerah Sungai Yordan dan menyampaikan berita dari Allah. Yohanes berseru, "Bertobatlah dari dosa-dosamu, dan kamu harus dibaptis, supaya Allah mengampuni kamu."
4हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले: “वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा.
4Itu sesuai dengan yang tertulis di dalam buku Nabi Yesaya: "Ada orang berseru-seru di padang pasir, 'Siapkanlah jalan untuk Tuhan, ratakanlah jalan bagi Dia.
5प्रत्येक दरी भरुन येईल, आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
5Setiap lembah hendaklah ditimbun, setiap gunung dan bukit diratakan. Jalan yang berliku-liku hendaklah diluruskan, dan jalan yang lekak-lekuk diratakan.
6आणि सर्व लोक देवाचे तराण पाहतील!”‘ यशाय 40:3-5
6Orang-orang di seluruh dunia akan melihat Allah menyelamatkan manusia!'"
7त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले?
7Banyak orang datang kepada Yohanes untuk dibaptis. Yohanes berkata kepada mereka, "Kamu orang jahat! Siapa yang mengatakan bahwa kamu dapat luput dari hukuman Allah yang akan datang?
8पश्चात्तापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे.
8Tunjukkanlah dengan perbuatanmu bahwa kamu sudah bertobat dari dosa-dosamu! Jangan mulai berkata bahwa Abraham adalah nenek moyangmu. Ingat: Dari batu-batu ini pun Allah sanggup membuat keturunan untuk Abraham!
9आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
9Kapak sudah siap untuk menebang pohon sampai ke akar-akarnya. Setiap pohon yang tidak menghasilkan buah yang baik akan ditebang dan dibuang ke dalam api."
10जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
10"Jadi, apa yang harus kami buat?" tanya orang-orang kepada Yohanes.
11त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
11Yohanes menjawab, "Orang yang mempunyai dua helai baju, harus memberikan sehelai kepada yang tidak punya; dan orang yang mempunyai makanan, harus membagikannya."
12काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
12Penagih-penagih pajak juga datang kepada Yohanes untuk dibaptis. Mereka bertanya, "Bapak Guru, apa yang harus kami buat?"
13तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
13Yohanes menjawab, "Janganlah menagih lebih banyak dari apa yang sudah ditetapkan."
14काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?” योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
14Ada juga prajurit yang bertanya, "Bagaimana dengan kami? Apa yang harus kami buat?" Yohanes menjawab, "Jangan memeras siapa pun dan jangan merampas uang dengan tuduhan-tuduhan palsu. Puaslah dengan gajimu!"
15लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
15Pada waktu itu orang-orang mulai bertanya-tanya, apakah Yohanes Raja Penyelamat yang mereka nantikan.
16त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील.
16Itu sebabnya Yohanes berkata kepada mereka semua, "Saya membaptis kamu dengan air, tetapi nanti akan datang Orang yang lebih besar daripada saya. Membuka tali sepatu-Nya pun saya tidak layak. Ia akan membaptis kamu dengan Roh Allah dan api.
17त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
17Di tangan-Nya ada nyiru untuk menampi semua gandum-Nya sampai bersih. Gandum akan dikumpulkan-Nya di dalam lumbung, tetapi semua sekam akan dibakar-Nya di dalam api yang tidak bisa padam!"
18योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.
18Demikianlah Yohanes menasihati orang-orang dengan berbagai-bagai cara, pada waktu ia mewartakan Kabar Baik.
19योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या.
19Tetapi Herodes, penguasa Galilea, ditegur oleh Yohanes mengenai perkawinannya dengan Herodias, istri saudaranya, dan mengenai semua kejahatan lain yang telah diperbuatnya.
20हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
20Tetapi Herodes malah menambah kejahatan-kejahatannya dengan memasukkan Yohanes ke dalam penjara.
21तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
21Setelah semua orang itu dibaptis, Yesus juga dibaptis. Dan ketika Ia sedang berdoa, langit terbuka,
22आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.”
22dan Roh Allah turun ke atas-Nya berupa burung merpati. Lalu terdengar suara Allah mengatakan, "Engkaulah Anak-Ku yang Kukasihi. Engkau menyenangkan hati-Ku."
23जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता
23Pada waktu Yesus mulai pekerjaan-Nya, Ia berumur kira-kira tiga puluh tahun. Menurut pendapat orang, Ia anak Yusuf, anak Eli,
24एली मत्ताथाचा मुलगा होता, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी मल्खीचा मुलगा होता. मल्खी यन्रयाचा मुलगा होता. यन्रया योसेफाचा मुलगा होता.
24anak Matat, anak Lewi, anak Malkhi, anak Yanai, anak Yusuf,
25योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता. अमोस नहूमाचा मुलगा होता. नहूम हेस्लीचा मुलगा होता. हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.
25anak Matica, anak Amos, anak Nahum, anak Hesli, anak Nagai,
26नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता.
26anak Maat, anak Matica, anak Simei, anak Yosekh, anak Yoda,
27योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा मुलगा होता. रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता. जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता. शल्तीएल नेरीचा मुलागा होता.
27anak Yohanan, anak Resa, anak Zerubabel, anak Sealtiel, anak Neri,
28नेरी मल्खीचा मुलगा होता. मल्खी अद्दीचा मुलगा होता. अद्दी कोसोमाचा मुलगा होता. कोसोम एल्मदामाचा मुलगा होता. एल्मदाम एराचा मुलगा होता.
28anak Malkhi, anak Adi, anak Kosam, anak Elmadam, anak Er,
29एर येशूचा मुलगा होता. येशू अलिएजराचा मुलगा होता. अलिएजर योरीमाचा मुलगा होता. योरीम मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
29anak Yesua, anak Eliezer, anak Yorim, anak Matat, anak Lewi,
30लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा मुलगा होता. यहूदा योसेफाचा मुलगा होता. योसेफ योनामाचा मुलगा होता. योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.
30anak Simeon, anak Yehuda, anak Yusuf, anak Yonam, anak Elyakim,
31एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता. मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता. मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ नाथानाचा मुलगा होता. नाथान दाविदाचा मुलगा होता.
31anak Melea, anak Mina, anak Matata, anak Natan, anak Daud,
32दावीद इशायाचा मुलगा होता. इशाय ओबेदाचा मुलगा होता. ओबेद बवाजाचा मुलगा होता. बवाज सल्मोनाचा मुलगा होता. सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
32anak Isai, anak Obed, anak Boas, anak Salmon, anak Nahason,
33नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता. अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता. हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता. पेरेस यहूदाचा मुलगा होता.
33anak Aminadab, anak Admin, anak Arni, anak Hezron, anak Peres, anak Yehuda,
34यहूदा याकोबाचा मुलगा होता. याकोब इसहाकाचा मुलगा होता. इसहाक अब्राहामाचा मुलगा होता. अब्राहाम तेरहाचा मुलगा होता. तेरह नाहोराचा मुलगा होता.
34anak Yakub, anak Ishak, anak Abraham, anak Terah, anak Nahor,
35नाहोर सरुगाचा मुलगा होता. सरुग रऊचा मुलगा होता. रऊ पेलेगाचा मुलगा होता. पेलेग एबराचा मुलगा होता. एबर शेलहाचा मुलगा होता.
35anak Serug, anak Rehu, anak Peleg, anak Eber, anak Salmon,
36शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा मुलगा होता. अर्पक्षद शेमाचा मुलगा होता. शेम नोहाचा मुलगा होता. नोहा लामेखाचा मुलगा होता.
36anak Kenan, anak Arpakhsad, anak Sem, anak Nuh, anak Lamekh,
37लामेख मथुशलहाचा मुलगा होता. मथुशलह हनोखाचा मुलगा होता. हनोख यारेदाचा मुलगा होता. यारेद महललेलाचा मुलगा होता. महललेल केनानाचा मुलगा होता.
37anak Metusalah, anak Henokh, anak Yared, anak Mahalaleel, anak Kenan,
38केनान अनोशाचा मुलगा होता. अलोश शेथाचा मुलगा होता. शेथ आदामाचा मुलगा होता. आदाम देवाचा मुलगा होता.
38anak Enos, anak Set, anak Adam, anak Allah.