Marathi

Indonesian

Nehemiah

4

1आम्ही यरुशलेमचा कोट बांधून काढत आहोत हे सनबल्लटच्या कानावर गेले. तेव्हा तो फार संतापला आणि नाराज झाला. त्याने यहूद्यांचा उपहास करायला सुरुवात केली.
1Ketika Sanbalat mendengar bahwa kami orang Yahudi sedang memperbaiki tembok kota, ia menjadi marah sekali dan mulai mengejek kami.
2सनबल्लटने आपले मित्र आणि शोमरोन येथील सैन्य यांच्याशी बातचीत केली. तो म्हणाला, “हे दुबळे यहुदी करताहेत तरी काय? आपण त्यांची गय करु असे त्यांना वाटते? आपण यज्ञ करु असे त्यांना वाटते की काय? अगदी एका दिवसात आपण सगळे बांधकाम पुरे करु असे त्यांना वाटत असावे. या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करु शकणार नाहीत. ते निव्वळ राखेचे आणि उकिरड्याचे ढीग आहेत.”
2Di depan rekan-rekannya dan tentara Samaria, ia berkata, "Apa yang sedang dikerjakan orang Yahudi celaka yang tidak bisa apa-apa itu? Apakah mereka mau membangun kembali kota ini? Sangka mereka pekerjaan itu dapat selesai dalam sehari, hanya dengan mempersembahkan kurban? Apakah timbunan sampah yang sudah hangus itu bisa mereka jadikan batu-batu tembok?"
3तोबीया अम्मोनीची सनबल्लटला साथ होती. तोबीया म्हणाला, “यहूद्यांनी हे कसले बांधकाम आरंभले आहे? एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो हा दगडी कोट पाडून टाकील.”
3Lalu Tobia yang berdiri di sampingnya berkata juga, "Lihat tembok yang mereka bangun! Anjing hutan pun bisa merobohkannya!"
4नहेम्याने देवाची प्रार्थना केली. तो म्हणाला, “आमच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे लोक आमचा तिरस्कार करतात. सनबल्लट आणि तोबीया आमचा अपमान करत आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्यावरच उलटव. त्यांना लाजिरवाणे कर. त्यांना निर्वासित अवस्थेत कैदी कर.
4Maka berdoalah aku, "Ya Allah, dengarlah bagaimana kami dihina! Timpakanlah penghinaan itu ke atas kepala mereka sendiri. Biarlah segala milik mereka dirampok dan mereka sendiri diangkut sebagai tawanan ke negeri asing.
5त्यांच्या अपराधांची क्षमा करु नकोस. तसेच तुझ्या डोळयादेखत केलेल्या पापांना क्षमा करु नकोस. त्यांनी बांधकाम करणाऱ्यांचा अपमान केला आहे. आणि त्यांना नाउमेद केले आहे.”
5Jangan mengampuni kejahatan mereka dan jangan melupakan dosa mereka, sebab mereka telah menghina kami yang sedang membangun ini."
6यरुशलेमचा कोट आम्ही बांधला. पूर्ण नगराभोवती तटबंदी बांधून काढली. पण तिची उंची असायला हवी त्यापेक्षा निम्मीच होती. लोकांनी मनापासून काम केले म्हणून आम्ही एवढे केले.
6Sementara itu kami terus memperbaiki tembok itu, dan tak lama kemudian seluruh tembok itu selesai diperbaiki sampai setengah tinggi, sebab rakyat bekerja dengan penuh semangat.
7पण सनबल्लट तोबीया, अरबी, अम्मोनी आणि अश्दोदी यांचा मात्र फार संताप झाला. लोकांनी यरुशलेमच्या भिंतीचे काम सुरुच ठेवले आहे हे त्यांनी ऐकले. भिंतीला पडलेली भगदाडे ते बुजवत आहेत हे ही त्यांच्या कानावर आले.
7Ketika Sanbalat, Tobia dan orang-orang dari Amon dan Asdod serta orang-orang Arab mendengar bahwa perbaikan tembok Yerusalem itu makin maju dan bahwa lubang-lubang di tembok sudah mulai ditutup, mereka menjadi marah sekali.
8तेव्हा या सर्वांनी एकत्र येऊन यरुशलेम विरुध्द हल्ला करण्याचा कट केला. यरुशलेममध्ये गोंधळ उडवायचा त्यांनी बेत केला. शहरावर चाल करून येऊन हल्ला करायचे त्यांनी ठरवले.
8Mereka bersepakat hendak menyerang Yerusalem untuk menimbulkan kekacauan.
9पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली. आणि त्यांना तोंड द्यायला सज्ज असावे म्हणून आम्ही रात्रंदिवस पहारा करण्यासाठी भिंतींवर राखणदार नेमले.
9Karena itu kami berdoa kepada Allah kami dan menjaga kota itu siang dan malam.
10आणि त्यावेळी यहुदी लोक म्हणाले, “बांधकामावरचे लोक थकत चालले आहेत. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा माजला आहे. कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.
10Tetapi orang Yehuda mulai menyanyikan lagu keluhan ini: "Tenaga kita habis untuk mengangkut muatan, sedangkan sampah masih banyak bertumpukan. Tak sanggup rasanya kita bekerja begini membangun tembok kota ini."
11आणि आपले शत्रू म्हणताहेत, “यहुदींना काही समजायच्या किंवा दिसायच्या अगोदरच आपण त्यांच्यात शिरकाव केलेला असेल. आपण त्यांना मारुन टाकू म्हणजे कामच थांबेल.”’
11Sementara itu musuh kami merencanakan untuk menyerang kami secara tiba-tiba, lalu membunuh kami sehingga pekerjaan kami terhenti.
12मग आमच्या शत्रूंच्या मध्ये राहणारे जे यहुदी लोक होते त्यांनी आम्हाला पुढील गोष्ट दहादा सांगितली, “आपल्या शत्रूने आम्हाला चहूबाजूंनी वेढले आहे. पाहावे तिकडे तेच आहेत.”
12Tetapi orang Yahudi yang tinggal di dekat mereka, berkali-kali datang kepada kami untuk memberitahukan rencana musuh itu.
13तेव्हा मी कोटाभोवतालच्या सर्वात सखल जागांच्या मागे काही जणांना ठेवले. भिंतीतील भगदाडांजवळ त्याना ठेवले. आपापल्या तलवारी, भाले आणि धनुष्यांसह कुटुंबेच मी नेमली.
13Sebab itu aku membagi-bagikan pedang, tombak dan panah kepada rakyat, lalu kutempatkan mereka menurut kaumnya masing-masing di belakang tembok, di tempat-tempat yang belum selesai diperbaiki.
14सगळी परिस्थिती मी डोळ्याखालून घातली. आणि मग उभा राहून मी महत्वाची घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांना म्हणालो, “आपल्या शत्रूची धास्ती बाळगू नका. लक्षात ठेवा, आमचा प्रभु, परमेश्वर जो महान आणि सामर्थ्यशाली आहे त्याचे स्मरण करा. आपले भाऊबंद मुलगे, मुली यांच्याकरता तुम्ही लढा दिला पाहिजे, आपल्या बायका आणि घरेदारे यांच्यासाठी लढले पाहिजे.”
14Ketika kulihat bahwa rakyat takut, aku berkata kepada mereka dan kepada para pemuka serta para pemimpin, "Jangan takut kepada musuh! Ingatlah kepada Tuhan yang kuat dan dahsyat, dan berjuanglah untuk saudara-saudaramu, anak-anak, istri dan rumahmu!"
15आपले बेत आम्हाला कळून चुकले आहेत हे मग आमच्या शत्रूंनी ऐकले. देवाने त्यांचे बेत धुळीला मिळवले हे त्यांना समजले. तेव्हा आम्ही पुन्हा कोटाच्या कामाला लागलो. जो तो आपापल्या ठिकाणी जाऊन आल्या वाटचे काम करु लागला.
15Musuh-musuh kami mendengar bahwa rencana mereka telah kami ketahui. Maka sadarlah mereka bahwa Allah telah menggagalkan rencana mereka itu. Kemudian kami semua kembali bekerja memperbaiki tembok itu.
16त्या दिवसापासून माझ्याकडची निम्मी माणसे तटबंदीचे काम करत होती. आणि उरलेले निम्मे लोक भाले, ढाली, धनुष्य, चिलखत यासह राखणीला सज्ज होते. भिंतीचे बांधकाम करणाऱ्या सर्व यहुदी लोकांच्या पाठीमागे सैन्यातील अधिकारी उभे होते.
16Tetapi sejak hari itu hanya setengah dari anak buahku yang bekerja, sedangkan yang setengah lagi berjaga-jaga dengan berpakaian baju perang dan bersenjatakan tombak, perisai dan panah. Para pemimpin rakyat memberikan dukungan sepenuhnya kepada rakyat
17बांधकाम करणारे आणि त्यांचे मदतनीस यांच्या एका हातात बांधकामाची अवजारे तर दुसऱ्या हातात शस्त्रे होती.
17yang sedang memperbaiki tembok itu. Para pemikul bahan bangunan melakukan pekerjaan itu dengan satu tangan, sedangkan tangan yang lain memegang senjata.
18तलवार कमरेला बांधूनच प्रत्येकजण बांधकाम करत होता. सावधगिरीच्या इषाऱ्याचे रणशिंग वाजवणारा माणूस माझ्या शेजारीच होता.
18Tukang-tukang batu bekerja dengan pedang terikat di pinggang. Peniup trompet tanda bahaya, terus ada di sampingku.
19मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत.
19Lalu aku berkata kepada rakyat, para pemuka dan para pemimpin, "Pekerjaan ini telah meluas sampai jarak yang jauh, sehingga kita terpencar-pencar di sepanjang tembok ini, seorang jauh daripada yang lain.
20तेव्हा कर्ण्याचा आवाज कानी पडताच त्या ठिकाणी धावत या. तेथे आपण एकत्रगोळा होऊ आणि देवच आपल्यासाठी लढेल.”
20Jadi, kalau kalian mendengar bunyi trompet, berkumpullah segera di sekeliling kami di sini. Allah kita akan berperang untuk kita."
21तेव्हा आम्ही यरुशलेमच्या कोटाचे काम चालूच ठेवले. अर्ध्या लोकांजवळ भाले होते. पहाट उजडल्यापासून ते थेट रात्री आकाशात चांदण्या दिसू लागेपर्यंत आम्ही काम करत होतो.
21Demikianlah kami bekerja mulai dari subuh sampai bintang-bintang nampak di langit. Setengah dari rakyat memperbaiki tembok, sedangkan yang lain berjaga-jaga dengan tombak di tangan.
22त्यावेळी मी लोकांना असेही म्हणालो, “प्रत्येक बांधकाम करणाऱ्याने आपल्या मदतनीसासह रात्री यरुशलेमच्या आत राहिले पाहिजे. म्हणजे रात्री ते राखणदार म्हणून आणि दिवसा कामगार म्हणून काम करतील.”
22Selama masa itu semua petugas dengan pembantu mereka, kusuruh bermalam di Yerusalem. Dengan demikian pada malam hari kami dapat menjaga kota dan siangnya membangun temboknya.
23तेव्हा आमच्यापैकी कोणीही अंगावरचे कपडे उतरवले नाहीत. मी, माझे भाऊ, माझी माणसे, आणि राखणदार यांच्यापैकी कोणीही नाही. सदा सर्वकाळ आम्ही सर्वजण शस्त्रसज्ज होतो-अगदी पाणवठ्यावर जात असू तेव्हा ही.
23Aku sendiri, rekan-rekanku, anak buahku dan pengawal-pengawalku selalu berpakaian kerja, baik siang maupun malam. Kami terus-menerus dalam keadaan siap siaga, dengan senjata di tangan.