Marathi

Indonesian

Numbers

14

1त्या रात्री छावणीतले सगळे लोक जोरजोरात आक्रोश करायला लागले.
1Sepanjang malam umat Israel berteriak-teriak dan menangis-nangis.
2इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रारी केल्या. सगळे लोक एकत्र आले आणि मोशेला व अहरोनाला म्हणाले, “आम्ही मिसरमध्ये किंवा वाळवंटात मरुन जायला हवे होते. या नवीन प्रदेशात मारले जाण्यापेक्षा ते अधिक चांगले झाले असते.
2Mereka mengomel kepada Musa dan Harun dan berkata, "Lebih baik kita mati di Mesir atau di padang gurun ini! Biar kita mati saja!
3या नवीन प्रदेशात युद्धात जाण्यासाठीच परमेश्वराने आम्हाला इथे आणले का? शत्रू आम्हाला मारून टाकील आणि आमच्या बायका मुलांना घेऊन जाईल. मिसर देशात परत जाणेच आमच्या दृष्टीने जास्त बरे आहे.”
3Untuk apa TUHAN membawa kita ke negeri itu? Nanti kita mati dalam peperangan dan istri-istri serta anak-anak kita ditawan. Bukankah lebih baik kembali saja ke Mesir!"
4नंतर लोक एकमेकांना म्हणाले, “आपण आता दुसरा नेता निवडू आणि मिसर देशात परत जाऊ.”
4Lalu mereka berkata satu sama lain, "Baiklah kita memilih seorang pemimpin dan kembali ke Mesir!"
5तिथे जमलेल्या सर्व लोकांसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले.
5Lalu Musa dan Harun sujud di depan seluruh rakyat.
6यहोशवा आणि कालेब यांनी आपले कपडे फाडले (तक्रारी ऐकून झालेल्या दु:खप्रदर्शनासाठी) नूनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे ही या प्रदेशाच्या शोधात गेलेल्या लोकांपैकी होते.
6Yosua anak Nun dan Kaleb anak Yefune, dua di antara mata-mata itu, merobek pakaian mereka tanda berdukacita.
7या दोघांनी तिथे जमलेल्या इस्राएल लोकांना सांगितले, “आम्ही जो प्रदेश बघितला तो खूप चांगला आहे.
7Mereka berkata kepada seluruh rakyat itu, "Negeri yang kami selidiki itu luar biasa baiknya.
8तो प्रदेश चांगल्या चांगल्या गोष्टींनी संपन्न आहे. आणि जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या प्रदेशात नेईल आणि तो प्रदेश आपल्याला देईल.
8Kalau TUHAN berkenan kepada kita, Ia akan membawa kita ke sana dan memberikan tanah yang kaya dan subur itu kepada kita.
9म्हणून परमेश्वराविरुद्ध जाऊ नका. त्या प्रदेशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपण त्यांचा पराभव करु शकू. त्यांच्याकडे कसलेही संरक्षण नाही. सुरक्षित राहण्यासाठी काहीही नाही. परंतु आपल्याजवळ परमेश्वर आहे. म्हणून घाबरु नका.”
9Janganlah melawan TUHAN, dan jangan takut terhadap orang-orang yang tinggal di negeri itu, sebab dengan mudah kita akan mengalahkan mereka. Yang melindungi mereka sudah meninggalkan mereka, dan TUHAN menyertai kita. Jadi, janganlah takut."
10सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली.
10Seluruh rakyat mengancam hendak melempari mereka dengan batu sampai mati. Tetapi tiba-tiba orang-orang itu melihat cahaya kemilau TUHAN muncul di atas Kemah-Nya.
11परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक किती वेळ माझ्याविरुद्ध जाणार आहेत? त्यांचा माझ्यावर विश्वास नाही असे ते दाखवितात ते माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला नकार देतात. मी त्यांना खूप शक्तिशाली चिन्हे दाखवली तरीही ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. मी त्यांच्या मध्ये खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत.
11TUHAN berkata kepada Musa, "Berapa lama lagi orang-orang ini melawan Aku? Sampai kapan mereka tidak mau percaya kepada-Ku, walaupun Aku sudah membuat begitu banyak keajaiban di antara mereka?
12मी त्यांना एखाद्या भयानक आजारने मारून टाकीन. मी त्यांचा नाश करीन. मी तुझा उपयोग करुन दुसरे राष्ट्र निर्माण करीन. तुझा देश या लोकांपेक्षा मोठा आणि शक्तिमान असेल.”
12Aku akan membinasakan mereka dengan mendatangkan penyakit menular. Tetapi engkau akan Kujadikan bapak dari suatu bangsa yang lebih besar dan lebih kuat dari mereka!"
13नंतर मोशे परमेश्वराला म्हणाला, “जर तू असे केलेस तर ते मिसर मधील लोक ऐकतील तुझ्या लोकांना मिसरमधून बाहेर आणण्यासाठी तू तुझ्या महान शक्तीचा उपयोग केलास हे त्यांना माहीत आहे.
13Lalu Musa berkata kepada TUHAN, "Ya, TUHAN, nanti orang Mesir mendengar hal itu! Padahal dengan kuasa-Mu Engkau telah membawa kami keluar dari negeri itu,
14मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे.
14dan mereka akan menceritakannya kepada orang-orang di negeri ini, yang telah mendengar bahwa Engkau, TUHAN, menyertai kami. Mereka sudah mendengar juga bahwa Engkau menampakkan diri kepada kami waktu Engkau berjalan di depan kami dalam tiang awan di waktu siang, dan dalam tiang api pada waktu malam.
15म्हणून आता तू या लोकांना मारू नकोस. जर तू त्यांना मारलेस तर सर्व देशांना ही बातमी कळेल व ते म्हणतील.
15Jika Engkau membunuh seluruh umat-Mu ini, maka bangsa-bangsa yang pernah mendengar tentang kemasyhuran-Mu itu akan mengatakan bahwa
16“परमेश्वर त्या लोकांना त्याने वचन दिलेल्या प्रदेशात आणू शकत नव्हता म्हणून परमेश्वराने त्यांना वाळवंटात मारून टाकले.’
16Engkau membunuh umat-Mu di padang gurun karena Engkau tidak mampu membawa mereka ke negeri yang telah Kaujanjikan.
17“प्रभू, म्हणून आता तू तुझी शक्ती दाखव. तू, ‘मी ती दाखवीन’ असे म्हणाला होतास त्याप्रमाणे दाखव.
17Sebab itu, TUHAN, saya mohon, tunjukkanlah kekuasaan-Mu kepada kami dan laksanakan apa yang sudah Kaujanjikan. Engkau telah berkata,
18तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टी बद्दल शिक्षा करतो.’
18'Aku, TUHAN, tidak cepat marah. Aku menunjukkan kasih-Ku dan kesetiaan-Ku dengan berlimpah-limpah. Aku mengampuni orang yang berdosa dan yang melawan Aku. Biarpun begitu, kesalahan orang tua akan Kubalaskan kepada anak-anak dan cucu-cucunya, sampai keturunan yang ketiga dan keempat.'
19आता तुझे दिव्य प्रेम या लोकांना दाखव. त्यांच्या पापाची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही क्षमा कर.”
19Sekarang, TUHAN, karena besarnya belas kasihan-Mu dan Engkau setia kepada janji-Mu, saya mohon, ampunilah dosa orang-orang ini seperti Engkau telah mengampuni mereka sejak mereka meninggalkan tanah Mesir."
20परमेश्वराने उत्तर दिले, “तू सांगितलेस त्याप्रमाणे मी लोकांना क्षमा करीन.”
20Lalu TUHAN menjawab, "Baiklah, Aku akan mengampuni mereka seperti yang kauminta.
21पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो.
21Tetapi Aku berjanji demi diri-Ku dan demi Aku yang hidup dan berkuasa di bumi ini,
22मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.
22bahwa dari orang-orang ini tak seorang pun masih hidup untuk memasuki negeri yang telah Kujanjikan kepada nenek moyang mereka. Sebab mereka tidak mau taat kepada-Ku, dan terus-menerus mencobai Aku. Padahal mereka sudah melihat cahaya-Ku yang kemilau, dan keajaiban-keajaib yang Kulakukan di Mesir dan di padang gurun.
23मी त्यांच्या पूर्वजांना वचन दिले. मी त्यांना तो प्रदेश देण्याचे वचन दिले. पण त्यांच्यापैकी जे लोक माझ्याविरुद्ध गेले ते कधीही त्या प्रदेशात पाऊल टाकणार नाहीत.
23Tidak! Mereka tidak akan memasuki negeri itu. Dari antara mereka yang melawan Aku, tidak seorang pun akan menginjak negeri itu.
24पण माझा सेवक कालेब वेगळा होता. तो माझे अनुकरण पूर्णपणे करतो. म्हणून मी त्याला त्याने आधी पाहिलेल्या प्रदेशात घेऊन जाईन. आणि त्याच्या वंशजांना तो प्रदेश मिळेल.
24Tetapi tidak demikian hamba-Ku Kaleb. Ia tetap setia kepada-Ku. Sebab itu Aku akan membawa dia ke negeri yang telah dimasukinya. Sekarang orang Amalek dan orang Kanaan tinggal di dataran itu. Tetapi daerah itu akan menjadi milik keturunan Kaleb, hamba-Ku itu. Besok kamu harus berbalik dan pergi ke padang gurun ke arah Teluk Akaba."
25अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात रहात आहेत. म्हणून उद्या तुम्ही ही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या वाळवंटात परत जा.”
25(14:24)
26परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला,
26TUHAN berkata kepada Musa dan Harun,
27“हे वाईट लोक किती काळ माझ्याविरुद्ध तक्रार करीत राहणार आहेत? मी त्यांच्या तक्रारी आणि कुरकुरी ऐकलेल्या आहेत.
27"Sampai kapan orang-orang jahat itu mengomel terhadap Aku? Semua keluhan mereka sudah Kudengar.
28म्हणून तू त्यांना सांग, ‘ज्याविषयी तुम्ही तक्रार करत. त्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला करील. तुम्हाला पुढील गोष्टी होतील.
28Kamu harus menjawab mereka begini: TUHAN berkata, 'Aku bersumpah demi Aku yang hidup bahwa kamu akan Kuperlakukan seperti yang kamu katakan di hadapan-Ku. Aku, TUHAN, sudah berbicara.
29तुम्ही या वाळवंटात मराल. वीस वर्षांचा किंवा त्याहून मोठा असलेला आणि माझ्या लोकापैकी असलेला प्रत्येक जण मरेल. तुम्ही माझ्याविरुद्ध, परमेश्वराविरुद्ध तक्रार केली आहे.
29Kamu sudah mengomel terhadap Aku. Sebab itu kamu akan mati, dan mayat-mayatmu berserakan di padang gurun ini.
30म्हणून जो प्रदेश देण्याचे वचन मी तुम्हाला दिले त्या प्रदेशात तुमच्यापैकी कोणीही प्रवेश करणार नाही आणि कोणीही राहाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा त्या प्रदेशात जातील.
30Selain Kaleb dan Yosua, tak seorang pun di antara kamu yang berumur dua puluh tahun ke atas akan memasuki negeri yang Kujanjikan kepadamu itu.
31त्या प्रदेशातील लोक तुमची मुले नेतील अशी भीती तुम्हाला वाटली आणि त्याविरुद्ध तुम्ही तक्रार केली. पण मी तुम्हाला सांगतो की मी ती मुले त्या प्रदेशात आणीन. तुम्ही ज्या गोष्टींचा स्वीकार करायला नकार दिला त्या गोष्टींचा ते उपभोग घेतील.
31Kamu telah berkata bahwa anak-anakmu akan ditawan. Tetapi merekalah yang akan Kubawa ke negeri yang kamu tolak itu, dan negeri itu akan menjadi tanah air mereka.
32आणि तुमच्याबद्दल बोलायचे तर तुम्ही या वाळवंटात मराल.
32Sedangkan kamu akan mati di padang gurun ini.
33“तुमची मुले इथे या वाळवंटात 40 वर्षे भटकणारे मेंढपाळ असतील. त्यांना दु:ख भोगावे लागेल कारण तुम्ही माझ्याशी इमानदार नव्हता. या वाळवंटात जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्यांना दु:ख भोगावे लागेल.
33Empat puluh tahun lamanya anak-anakmu akan mengembara di padang gurun. Karena kamu tidak setia, anak-anakmu itu akan menderita, sampai orang yang terakhir di antara kamu sudah meninggal.
34तुम्हाला तुमच्या पापाबद्दल 40 वर्षे दु:ख भोगावे लागेल. (त्या माणसांना तो प्रदेश शोधायला 40 दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष) मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हाला समजेल.
34Kamu akan menanggung akibat-akibat dosamu empat puluh tahun lamanya; satu tahun dihitung untuk satu hari dari setiap empat puluh hari yang kamu pakai untuk menyelidiki tanah itu. Kamu akan tahu bagaimana rasanya kalau Aku melawan kamu!
35“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट माणसांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरुद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या वाळवंटात मरतील.”
35Aku bersumpah bahwa Aku akan melakukan hal itu terhadap kamu, orang-orang jahat yang bersekongkol untuk melawan Aku. Di padang gurun ini kamu semua akan mati. Aku, TUHAN, sudah berbicara.'"
36मोशेने ज्या लोकांना नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तिवान नाहीत.
36Orang-orang yang telah diutus Musa untuk menyelidiki tanah itu, kembali membawa laporan yang tidak benar tentang negeri itu, dan hal itu menyebabkan orang Israel mengomel terhadap TUHAN. Karena itu TUHAN menghukum mereka sehingga mereka mati kena penyakit.
37इस्राएल लोकांमध्ये संकटे पसरविण्यास तेच लोक जबाबदार होते म्हणून परमेश्वराने त्या लोकांना मारण्यासाठी आजार निर्माण केला.
37(14:36)
38यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे ही तो प्रदेश शोधायला पाठवलेल्या लोकांत होते परंतु परमेश्वराने त्या दोघांना वाचवले. ज्या आजाराने इतर सर्वजण मेले, तो आजार त्या दोघांना झाला नाही.
38Dari kedua belas mata-mata itu hanya Yosua dan Kaleb yang masih hidup.
39मोशेने या सर्व गोष्टी इस्राएल लोकांना सांगितल्या. लोक खूप दु:खी झाले.
39Setelah Musa menyampaikan pesan TUHAN kepada bangsa Israel, bangsa itu berkabung dengan sedih.
40दुसऱ्या दिवशी पहाटे लोकांनी डोंगरावर असलेल्या त्या प्रदेशात जायला सुरुवात केली. लोक म्हणाले, “आम्ही पाप केले आहे. आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही याचे आम्हाला वाईट वाटते. परमेश्वराने वचन दिलेल्या प्रदेशात आम्ही जाऊ.”
40Keesokan harinya pagi-pagi benar, bersiap-siaplah mereka hendak naik ke puncak gunung. Kata mereka, "Memang kami telah berdosa. Tetapi sekarang kami sudah siap untuk pergi ke tempat yang ditunjukkan TUHAN."
41पण मोशे म्हणाला, “तुम्ही परमेश्वराची आज्ञा का पाळत नाही? तुम्हाला यश मिळणार नाही.
41Tetapi Musa berkata, "Mengapa kamu sekarang mau melanggar perintah TUHAN? Kamu tidak akan berhasil!
42त्या प्रदेशात जाऊ नका. परमेश्वर तुमच्याबरोबर नाही म्हणून तुमचा सहज पराभव होऊ शकेल.
42Janganlah pergi! Kamu akan dikalahkan musuh-musuhmu karena TUHAN tidak menyertaimu.
43अमालेकी आणि कनानी लोक तेथे तुमच्याविरुद्ध लढतील. तुम्ही परमेश्वरापासून दूर गेला आहात म्हणून युध्दाच्या वेळी तो तुमच्याबरोबर नसेल आणि तुम्ही सर्व युद्धात मारले जाल.”
43Pada waktu kamu berhadapan dengan orang Amalek dan orang Kanaan itu, kamu akan mati dalam pertempuran. TUHAN tidak akan menyertai kamu karena kamu tidak mau taat kepada-Nya."
44परंतु लोकांनी मोशेवर विश्वास ठेवला नाही. ते उंच डोंगरावरच्या प्रदेशात गेले. परंतु मोशे आणि परमेश्वराचा आज्ञापटाचा कोश त्यांच्याबरोबर गेला नाही.
44Tetapi orang-orang Israel itu masih nekat juga menuju ke puncak gunung itu, walaupun Musa dan Peti Perjanjian tidak meninggalkan perkemahan itu.
45डोंगरावरच्या प्रदेशात राहणारे अमालेकी आणि कनानी लोक खाली आले आणि त्यांनी इस्राएल लोकांवर हल्ला केला. त्यांनी इस्राएल लोकांचा सहज पराभव केला आणि हर्मापर्यंत त्यांचा पाठलाग केला.
45Maka orang Amalek dan orang Kanaan yang tinggal di sana menyerang dan mengalahkan orang-orang Israel serta mengejar mereka sampai ke Horma.