Marathi

Indonesian

Psalms

107

1परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
1"Bersyukurlah kepada TUHAN sebab Ia baik, kasih-Nya kekal abadi."
2परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत. परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
2Katakanlah itu berulang-ulang, hai kamu yang sudah diselamatkan dari kesusahan.
3परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.
3Kamu sudah dikumpulkan-Nya dari negeri-negeri asing, dari timur dan barat, utara dan selatan.
4त्यांतले काही वाळवंटात फिरले. ते राहाण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
4Ada yang mengembara di padang belantara, dan tak tahu jalan ke tempat kediaman di kota.
5ते खूप भुकेले आणि तान्हेले होते आणि अशक्त होत होते.
5Mereka kelaparan dan kehausan dan kehilangan segala harapan.
6नंतर त्यांनी परमेश्वराला मदती साठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
6Dalam kesusahan mereka berseru kepada TUHAN, dan Ia membebaskan mereka dari kesesakan.
7देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
7Ia membimbing mereka melalui jalan yang lurus ke tempat kediaman di kota.
8परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
8Pantaslah mereka bersyukur kepada TUHAN karena kasih-Nya, karena karya-karya-Nya yang mengagumkan bagi manusia.
9देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
9Sebab Ia memuaskan orang yang haus, dan melimpahi orang lapar dengan segala yang baik.
10देवाची काही माणसे कैदी होती आणि काळ्याकुटृ तुंरुंगात गजांच्या आडबंद होती.
10Ada yang meringkuk di dalam kegelapan, orang tahanan yang menderita dalam belenggu besi,
11का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
11sebab mereka telah berontak terhadap Allah dan tidak mengindahkan perintah Yang Mahatinggi.
12त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
12Ia meremukkan hati mereka dengan kerja berat; mereka jatuh dan tak ada yang menolong.
13ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
13Dalam kesusahan mereka berseru kepada TUHAN, dan Ia membebaskan mereka dari kesesakan.
14देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले, ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
14Ia membawa mereka keluar dari kegelapan, dan mematahkan belenggu mereka.
15त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
15Pantaslah mereka bersyukur kepada TUHAN karena kasih-Nya, karena karya-karya-Nya yang mengagumkan bagi manusia.
16देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव कायला मदत करतो. देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो. देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.
16Sebab Ia merobohkan pintu-pintu tembaga, dan meremukkan palang-palang besi.
17पापयुक्त जीवन पध्दतीमुळे काही लोक मूर्ख बनतात आणि अपराधी भावनेमुळे त्यांना पीडा होते.
17Ada yang dungu dan menderita karena dosa-dosa mereka, serta disiksa karena kesalahan mereka.
18त्या लोकांनी खायचे नाकारले आणि ते जवळ जवळ मेले.
18Mereka muak terhadap segala makanan, ajal mereka sudah dekat.
19ते संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटातून वाचवले.
19Dalam kesusahan mereka berseru kepada TUHAN, dan Ia membebaskan mereka dari kesesakan.
20देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
20Ia menyembuhkan mereka dengan perintah-Nya, dan meluputkan mereka dari liang kubur.
21परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल व तो लोकांसाठी करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
21Pantaslah mereka bersyukur kepada TUHAN karena kasih-Nya, karena karya-karya-Nya yang mengagumkan bagi manusia.
22परमेश्वराने जे काही केले त्याबद्दल त्याला धन्यवाद म्हणून बळी अर्पण करा. परमेश्वराने केलेल्या गोष्टी आनंदाने सांगा.
22Biarlah mereka bersyukur dengan membawa persembahan, dan mewartakan perbuatan-Nya dengan lagu-lagu gembira.
23काही लोक बोटीतून समुद्रापार जातात. त्यांचे व्यवसाय त्यांना महासागरापार घेऊन गेले.
23Ada lagi yang mengarungi laut dengan kapal, untuk mencari nafkah di laut yang luas.
24त्या लोकांनी परमेश्वर काय करु शकतो ते पाहिले. त्याने समुद्रावर ज्या अद्भुत गोष्टी केल्या त्या त्यांनी पाहिल्या.
24Mereka melihat perbuatan-perbuatan TUHAN, karya-Nya yang ajaib di lautan.
25देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.
25Atas perintah-Nya bertiuplah angin topan dan menggelorakan ombak-ombak.
26लाटांनी त्यांना खूप उंच आकाशापर्यंत उंच नेले आणि खोल समुद्रात खाली टाकले. वादळ इतके भयंकर होते की लोकांचे धैर्य नाहीसे झाले.
26Kapal-kapal terangkat tinggi ke udara, lalu dihempaskan ke dasar samudra. Orang-orang kehilangan keberanian menghadapi bahaya sebesar itu.
27ते अडखळत होते आणि प्यायलेल्या माणसासारखे पडत होते. खलाशी म्हणून असलेले त्यांचे कसब निरुपयोगी होते.
27Mereka pusing dan terhuyung-huyung seperti orang mabuk dan kehilangan akal.
28ते संकटात सापडले म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली आणि त्याने त्यांना संकटापासून वाचवले.
28Dalam kesusahan mereka berseru kepada TUHAN, dan Ia membebaskan mereka dari kesesakan.
29देवाने वादळ थांबवले. त्याने लाटांना शांत केले.
29Badai yang mengamuk disuruh-Nya diam, ombak-ombak pun menjadi tenang.
30समुद्र शांत झाला म्हणून खलाशी आंनदित झाले. देवाने त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी आणून पोहोचवले.
30Mereka senang sebab topan sudah berlalu; dibawa-Nya mereka ke pelabuhan yang dituju.
31परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल धन्यवाद द्या.
31Pantaslah mereka bersyukur kepada TUHAN karena kasih-Nya, karena karya-karya-Nya yang mengagumkan bagi manusia.
32देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
32Mereka memasyhurkan keagungan TUHAN di tengah umat-Nya, dan memuji Dia dalam majelis kaum tua.
33देवाने नदीचे वाळवंटात रुपांतर केले. देवाने झऱ्यांचे वाहाणे बंद केले.
33Sungai-sungai diubah-Nya menjadi padang gurun mata air menjadi tanah yang gersang.
34देवाने सुपीक जमिनीचे क्षारयुक्त ओसाड जमिनीत रुपांतर केले. का? कारण त्या ठिकाणी वाईट लोक राहात होते.
34Tanah subur dijadikan-Nya padang asin, karena kejahatan orang-orang yang mendiaminya.
35देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.
35Padang gurun diubah-Nya menjadi kolam air, tanah kering menjadi mata air.
36देवाने भुकेल्या लोकांना चांगल्या प्रदेशातून नेले आणि त्यांनी तिथे राहाण्यासाठी शहर वसवले.
36Orang-orang lapar ditempatkan-Nya di sana; mereka mendirikan kota untuk kediaman mereka.
37त्या लोकांनी त्यांच्या शेतात बी पेरले त्यांनी त्यांच्या शेतात द्राक्षं पेरली आणि त्यांना चांगले उत्पन्न आले.
37Mereka menaburi ladang-ladang dan menanam pohon anggur, lalu mengumpulkan hasil yang berlimpah.
38देवाने त्या लोकांना आशीर्वाद दिला. त्यांचे कुटुंब वाढले. त्यांच्या जवळ खूप जनावरे होती.
38TUHAN menganugerahi mereka banyak anak, dan hewan mereka terus berkembang biak.
39अरिष्टे आणि संकटे यांमुळे त्यांची कुटुंब लहान आणि अशक्त राहिली.
39Tetapi mereka dikalahkan dan tinggal sedikit karena sengsara dan penindasan yang kejam.
40देवाने त्यांच्या प्रमुखाला लज्जित केले आणि ओशाळवाणे वाटायला लावले आणि त्याला खाली पाहायला लावले. देवाने त्यांना रस्ते नसलेल्या वाळवंटातून हिंडायला लावले.
40TUHAN merendahkan para penguasa mereka, dan menyuruh mereka mengembara di padang belantara yang tidak ada jalannya.
41पण नंतर देवाने त्या गरीब लोकांची संकटातून मुक्तता केली आणि आता त्यांची कुटुंब मेंढ्यांच्या कळपासारखी मोठी आहेत.
41Tetapi orang miskin dibebaskan-Nya dari kesusahan mereka, keluarga mereka bertambah seperti kawanan domba.
42चांगले लोक हे बघतात आणि आनंदी होतात. पण दुष्ट लोक ते बघतात आणि काय बोलावे ते त्यांना सुचत नाही.
42Orang jujur melihatnya dan bergembira, tetapi orang jahat dibungkamkan.
43जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.
43Semoga orang bijaksana memikirkan semua hal itu dan mengakui bahwa TUHAN tetap mengasihi.