Marathi

Indonesian

Psalms

4

1माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
1Untuk pemimpin kor. Dengan permainan kecapi. Mazmur Daud. (4-2) Ya Allah, Engkaulah pembelaku; jawablah bila aku berseru. Waktu aku susah, Engkau menolong aku; sekarang kasihanilah aku dan dengarlah doaku.
2लोकहो! तुम्ही आणखी किती काळ माझ्याविषयी वाईट बोलत राहाणार आहात? तुम्ही माझ्याबाद्दल सांगण्यासाठी नवीन काहीतरी खोटे नाटे शोधत असता आणि माझ्याविषयी तसले खोटे सांगणे तुम्हाला आवडते.
2(4-3) Hai orang-orang, berapa lama lagi kamu menghina Allahku? Sampai kapan kamu mencintai yang sia-sia dan mengejar yang tidak benar?
3परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.
3(4-4) Ketahuilah, TUHAN telah memilih bagi diri-Nya seorang yang dikasihi-Nya. TUHAN mendengarkan bila aku berseru kepada-Nya.
4जर तुम्हाला कसला त्रास होत असेल तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका. तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा.
4(4-5) Gemetarlah ketakutan dan jangan berdosa lagi. Renungkanlah sambil berdiam diri, waktu berbaring di tempat tidur.
5देवाला चांगल्या गोष्टीचे होमार्पण करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा.
5(4-6) Persembahkanlah kurban yang benar dan percayalah kepada TUHAN.
6बरेच लोक म्हणतात “आम्हाला देवाचा चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हाला तुझे तेजस्वी मुख पाहू दे.”
6(4-7) Banyak orang bertanya, "Siapa yang akan memberkati kita?" Semoga Engkau berkenan kepada kami, ya TUHAN.
7परमेश्वरा, तू मला खूप सुखी केलेस. सुगीच्या दिवसात जेव्हा धनधान्याची आणि द्राक्षारसाची समृध्दी असते तेव्हा मला जितका आनंद होतो त्यापेक्षा मी आता अधिक आनंदी आहे.
7(4-8) Engkau membuat hatiku lebih gembira daripada orang yang limpah panenannya.
8मी अंथरुणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो का? कारण परमेश्वरा, तू मला सुरक्षित ठेवून झोपवतोस.
8(4-9) Maka aku berbaring dan tidur dengan tentram, sebab hanya Engkau, TUHAN, membuat hidupku aman!