Marathi

Indonesian

Song of Solomon

7

1राजाकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कलाकाराने केलेल्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.
1O, gadis yang anggun, manis benar kakimu dengan sandal itu. Lengkung pahamu seperti perhiasan, karya seorang seniman.
2तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
2Pusarmu seperti cawan bulat yang tak pernah kekurangan anggur campur. Perutmu bagaikan timbunan gandum, dikelilingi bunga-bunga bakung.
3तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
3Buah dadamu laksana dua anak rusa, kijang kembar dua.
4तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे.
4Lehermu seperti menara gading. Matamu bagaikan kolam-kolam di Hesybon, dekat pintu gerbang Batrabim. Hidungmu seperti menara di Gunung Libanon, yang menghadap ke kota Damsyik.
5तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
5Kepalamu bagaikan bukit Karmel; rambutmu yang dikepang seperti lembayung, mempesonakan bahkan seorang raja.
6तू किती सुंदर आहेस! किती आल्हाददायक आहेस! सुंदर, आनंद देणारी तरुण स्त्री!
6Sungguh cantik jelita engkau, yang tercinta di antara yang disenangi.
7तू उंच आहेस, नारळाच्या झाडासारखी उंच आहेस. आणि तुझे वक्ष त्या झाडावर लागलेल्या फळांच्या घोसासारखे आहेत.
7Tubuhmu seanggun pohon kurma, buah dadamu gugusan buahnya.
8मला त्या झाडावर चढून त्याच्या फांद्यांना धरायला आवडेल. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
8Ingin aku memanjat pohon kurma itu, dan memperoleh buah-buahnya. Kiranya buah dadamu seperti gugusan buah anggur, napasmu seharum buah apel,
9तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या, झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे.
9mulutmu semanis air anggur!
10मी माझ्या प्रियकराची आहे आणि मी त्याला हवी आहे.
10Aku milik kekasihku, ia menginginkan aku.
11प्रियकरा, ये आपण शोतावर जाऊ. आपण खेेड्यात रात्र घालवू.
11Mari kita ke padang, kekasihku, dan bermalam di ladang di tengah-tengah bunga pacar.
12आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळींब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
12Mari kita pagi-pagi ke kebun, dan melihat apakah pohon anggur sudah berkuncup, dan bunganya sudah mekar; apakah pohon delima sudah berbunga. Di sana akan kuberi cintaku kepadamu.
13पुत्रदात्रीचा वास घे आणि आपल्या दाराजवळ असलेल्या इतर सुंदर फुलांचाही वास घे. होय, प्रियकरा, मी तुझ्यासाठी अनेक चांगल्या आनंददायी नव्या आणि जुन्या, गोष्टी राखून ठेवल्या आहेत.
13Pohon arak harum semerbak baunya, di dekat pintu kita ada buah-buahan lezat, yang sudah lama dipetik dan yang baru; itu kusimpan bagimu, kekasihku.