1योडचा मेलेल्या माशा सगव्व्यांत चांगल्या अत्तरालासुध्दा वाईट वास आणतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो.
1मरेका थोरै झिंगाले उत्तम सुगन्धलाई पनि दुर्गन्धपूर्ण बनाउँदछन्। यसरी नै सानो मूर्खताले सम्पूर्ण बुद्धि र सम्मान नष्ट गर्दछ।
2विद्धान माणसाचे विचार त्याला योग्य दिशेने नेतात. पण मूर्खाचे विचार त्याला अयोग्य दिशेकडे नेतात.
2ज्ञानीको विचारले उसलाई ठिक बाटोमा हिंडाउँदछ। तर मूर्खको विचारले उसलाई गलत बाटोमा हिँडाउँछ।
3मूर्ख त्याचा मूर्खपणा रस्त्यावरून जात असतानासुध्दा दाखवतो. तेव्हा तो मूर्ख आहे हे सर्वांना दिसते.
3मूर्ख बाटोमा हिडदाखेरि पनि आफ्नो मूर्खता दर्शाउँछ र हरेकले ऊ मूर्ख हो भन्ने कुरा जान्दछन्।
4तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची नोकरी सोडू नका. जर तुम्ही शांत राहिलात आणि मदत केलीत तर तुम्ही तुमच्या घोडचुकाही दुरुस्त करू शकाल.
4मालिक रिसाए भन्दैमा आफ्नो काम नछोड। यदि तिमी शान्त र सहायक बनिरह्यौ भने तिमीले ठूला-ठूला गल्तीहरू सुधार्न सक्ने छौ।
5मी आयुष्यात जे काही पाहिले त्यात ही एक गोष्ट आहे आणि ती योग्य नाही. राजे लोक करतात तशी ती एक चूक आहे.
5यहाँ केही भिन्नै कुराहरू पनि छन् जुन मैले आफ्नो जीवनमा देखेको छु। अनि यो न्याय संगत पनि छैन। यो त्यस्तो भूल हो जुन शासकहरूबाट हुन्छ।
6मूर्खांना महत्वाची जागा दिली जाते आणि श्रीमंतांना बिनमहत्वाच्या जागा दिल्या जातात.
6मूर्खहरूलाई महत्वपूर्ण ओहोदा दिइन्छ, जहाँ धनी मानिसहरूले यस्ता काम पाउंछन् जसको कुनै महत्व हुँदैन।
7जे लोक नोकर व्हायच्या लायकीचे असतात त्यांना घोडचावरून जाताना मी पाहिले आणि जे लोक राजे व्हायच्या योग्यतेचे होते त्यांना मूर्खाबरोबर गुलामासारखे जाताना मी पाहिले.
7नोकर बन्नु पर्नेहरू घोडामा चढेर हिंडेको पनि देखेको छु, जहाँ शासक बन्नु पर्नेहरू नोकर जस्ता भई तिनैका छेउछाऊ पैदलै हिंडिरहेका हुन्छन्।
8जो माणूस खड्डा खणतो, तो त्याच खड्ड्यात पडू शकतो. जो माणूस भिंत पाडून टाकतो त्याला साप चावण्याची शक्यता असते.
8आफूले खनेको खाडलमा आफै पर्न सक्छन। पर्खाल भत्काउनेलाई साँपले डस्न पनि सक्छ।
9जो माणूस मोठ मोठे दगड हलवतो त्याला त्यामुळेच इजा होऊ शकते. आणि जो माणूस झाडे तोडतो तो संकटात असतो. ती झाडे त्याच्याच अंगावर पडण्याची शक्यता असते.
9ढुङ्गाहरू त्यो मानिसमाथि झर्ने सक्छ जसले त्यसलाई चलाउँछ अनि जसले रूख काटेर ढाल्छ उसलाई चोट लाग्न सक्छ।
10पण शहाणपण कुठलेही काम सोपे करते. धार नसलेल्या सुरीने कापणे कठीण असते. पण एखाद्याने जर सुरीला धार लावली तर कापणे सोपे जाते. शहाणपण तसेच आहे.
10तर बुद्धिले हर काम सुगम हुँन्छ। भुत्ते छुरीले काट्न कठीन पर्छ। तर कसैले छुरीलाई उध्याएर काटे त्यही सजिलो काम हुँन्छ ज्ञान त्यस्तै हो।
11एखाद्याला सापावर ताबा कसा मिळवायचा ते माहीत असते. पण तो माणूस जवळपास नसताना कोणाला साप चावला तर त्या कौशल्याचा उपयोग नसतो. ते कौशल्य निरुपयोगी ठरते. शहाणपणही तसेच आहे.
11लट्ठ्याउन अघिनै साँपले डस्यो भने सपेरालाई केही फाइदा हुँदैन।
12विद्धाव माणसाचे शब्द स्तुतीला पात्र ठरतात. पण मूर्खाचे शब्द त्याचा नाश ओढवतात.
12ज्ञानीका शब्दहरूले प्रशांसित तुल्याउँछन्, परन्तु मूर्खका शब्दहरूले विनाश गराउँछन।
13मूर्ख माणूस मूर्ख गोष्टींनी सुरुवात करतो. शेवटी तर तो वेडचासारख्या गोष्टी सांगायला लागतो.
13मूर्ख मानिसले मूर्खताबाट कुरा थाल्छ अन्तमा पागल कुरामा टुग्याउँदछ।
14मूर्ख माणूस नेहमी तो काय करणार आहे याबद्दल बोलत असतो. पण भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते. नंतर काय घडेल ते कोणीच सांगू शकत नाही.
14मूर्खले धेरै कुराहरू गर्छ तर कसैलाई पनि थाहा हुदैन कि भविष्यमा के घट्छ। कसैले पनि भन्न सक्दैन भविष्यमा हुनेवाला छ।
15मूर्ख माणूस घरी जाण्याचा रस्ता शोधून काढण्याइतका हुशार नसतो म्हणून त्याला आयुष्यभर कष्ट उपसावे लागतात.
15एउटा मूर्ख आफ्नै घरको बाटो पत्ता लाउनमा साह्रै बुद्धु बनिनु सक्छ, यसर्थ जुनकाम गर्ने चेष्टा गर्छ त्यसले उसलाई थकित बनाउँछ।
16राजा जर लहान मुलासारखा असला तर ते देशाच्या दृष्टीने फार वाईट असते. आणि जर राजे लोक आपला सर्व वेळ खाण्यात घालवत असतील तर तेही देशाच्या दृष्टीने वाईट असते.
16देशको निम्ति यो खुबै खराब हो जुन देशको राजा बालक जस्तो छ। अनि कुनै देशको निम्ति पनि उत्तिकै खराब छ यो जहाँको राजा सारा समय खानैमा व्यस्त रहन्छ।
17पण राजा जर चांगल्या घराण्यातून आलेला असेल तर ते देशाच्या दृष्टीने चांगले असते. आणि जर राजांनी आपल्या खाण्यापिण्यावर ताबा मिळवला तर तेही देशासाठी चांगले असते. ते राजे सशक्त होण्यासाठी खातात-पितात, नशा चढण्यासाठी नाही.
17तर जुन देशको राजा एउटा महान परिवारबाट आएको हुन्छ त्यस देशलाई खुबै असल हुन्छ। अनि भूमिलाई पनि फाइदा हुन्छ जब ती शासकहरूले ज्यादा खाँदैन अथवा मतुवा हुँदैनन्।
18जर एखादा माणूस कामाच्या बाबतीत खूप आळशी असेल तर त्याचे घर गळायला लागेल आणि त्याचे छत कोसळून पडेल.
18अल्छेको घरमा पानी चुहिन थाल्छ र टाल्दै नटाली सबै छाना झर्छ।
19लोकांना खायला आवडते, आणि द्राक्षारस (मद्य) आयुष्य आनंदी करतो. पण पैसा अनेक समस्यांची उकल करतो.
19मानिस भोजनमा आनन्द लिन्छन् अनि दाखरसले जीवन अझै आनन्दित बनाउँछ। तर धनले नै सबै समस्या सुल्झाउँदछ।
20राजाबद्दल वाईट बोलू नका. त्याच्याबद्दल वाईट विचारसुध्दा करू नका. श्रीमंत लोकांबद्दलसुध्दा वाईट बोलू नका. तुम्ही तुमच्या घरात एकटेच असलांत तरी सुध्दा. का? कारण एक छोटासा पक्षी उडून जाईल व त्यांना तुम्ही काय काय बोलला ते सांगेल.
20राजाको निन्दा नगर अनि महानुभाव र सम्पन्न मानिसहरूको बारेमा पनि निन्दा नगर। चाहे तिमी आफ्नो घरमा एक्लै किन नहोऊ, नराम्रो कुरै नगर। किन? किन कि कुनै एउटा सानो चरो उडेर गएर तिमीले भनेका सबै कुरा तिनीहरूलाई सुनाइदेला।