Marathi

Nepali

Genesis

19

1त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.
1साँझमा दुइजना स्वर्गदूतहरू सदोम शहरमा आए। त्यस बेला लूत सदोमको फाटकमा बसिरहेका थिए। लूतले स्वर्गदूतलाई देखेर भेट्न गए। तब लूतले तिनीहरूको सामुन्ने निहुरेर दण्डवत् गरे।
2लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.” त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.”
2तिनले भने, “महाशय, कृपा गरी तपाईंहरूको दासको घरमा गई हात पाऊ धोई रात त्यही बिताउनु होस् र बिहान चाँडै उठी आफ्नो स्थानको लागि बाटोतर्फ प्रस्थान गर्नु होस्।” ती स्वर्गदूतहरूले भने, “अहँ हामी बाटोमै रात बिताउनेछौं।”
3परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले.
3तर लूतले तिनीहरूलाई आफ्नो घर लैजान अत्यन्तै बिन्ती गरे, यसर्थ स्वर्गदूतहरू लूतको घरमा गए। तब लूतले स्वर्गदूतहरूको निम्ति खाना तयार गरे अनि खमीर नहालेको रोटी बनाए र तिनीहरूले खाए।
4त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले.
4तिनीहरू सुत्न जानुअधि सदोम शहरका सबै मानिसहरू आएर लूतको घर घेरे।
5“आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.”
5तिनीहरूले उनलाई बोलाए अनि भने, “राती तिम्रो घरमा आएका दुइ मानिसहरू कहाँ छन्? तिनीहरूलाई बाहिर हामी भएकोमा ल्याऊ जसले गर्दा तिनीहरूसित हामी संभोग गर्न चाहन्छौं।”
6लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले.
6तब लूत बाहिर निस्केर घरको ढोका लगाए।
7लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका.
7त्यसपछि उनले भने, “हे मेरा साथीहरू, कृपा गरी तिनीहरूसित नराम्रो व्यवहार नगर।
8पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.”
8सुन, कुनै पुरूषसित सहवास नगरेका मेरो दुइ जना छोरीहरू छन्। म तिमीहरूलाई सुम्पिदिनेछु र आफ्नो इच्छा अनुसार जे गर्न मन लाग्छ तिनीहरूसित गर। तर यी मानिसहरू जो मेरो घरमा आएका छन् तिनीहरूलाई केही नगर, तिनीहरूको रक्षा मैले गर्नु नै पर्छ।”
9तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले.
9घेरेका मानिसहरूले भने, “हामीलाई बाटो देऊ! हाम्रो बाटोबाट पर सर।” तब सदोमका ती मानिसहरूले भने, “यी मानिस हाम्रो शहरमा पाहुना भएर आएका हुन् अनि अहिले हाम्रो न्यायाधीश यी को हुन? अब हामी तिमीसित तिनीहरूसित भन्दा अशिष्ट व्यवहार गर्ने छौं।” त्यो भीडले लूतमाथि एकसाथ घचेटेर ढोका भत्काएर खोल्ने चेष्टा गरे।
10परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले.
10तब ती भित्र भएका मानिसहरूले ढोका उघारे र लूतलाई भित्र ताने र ढोका थुने।
11त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.
11त्यसपछि तिनीहरूले ती बाहिर घर घेरेर बस्ने सबै बूढा-जवानहरूलाई अन्धा बनाइ दिए। तब तिनीहरूले ढोका खोल्न असमर्थ भए।
12ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग;
12तब ती भित्र भएका दुइजना मानिसहरूले लूतलाई भने, “तिम्रो घरमा अरू कोही मानिसहरू छन्? तिम्रा ज्वाँईहरू, छोरा-छोरीहरू अनि जो पनि यस शहरमा छन् भने तिनीहरूलाई शहर छोडनु भनीदेऊ,
13कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.”
13शहर छोड, किनभने हामी यसलाई नाश गर्न लागेका छौं। परमप्रभुलाई यो थाह भएकोछ यो शहर दुष्टहरूले भरिएको छ अनि उहाँले हामीलाई यो शहर नाश गर्न पठाउनु भएको छ।”
14म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.
14तब लूत बाहिर गए अनि आफ्नो ज्वाँईहरूलाई भने, “उठ अनि यो शहर छोडिदेऊ किनभने परमप्रभुले यस शहरलाई नष्ट पार्नु हुँदैछ।” तर उसका ज्वाँईहरूले सोचे उनी ठट्टा गरिरहेका छन्।
15दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.”
15अर्को बिहानै उज्यालो हुन लाग्दा ती स्वर्गदूतहरूले लूतलाई चाँडो गर्न लगाए। तिनीहरूले भने, “हेर, यो शहरलाई दण्ड दिइन्छ। यसर्थ तिम्री पत्नी अनि छोरीहरू जो यहाँ छन् तिनीहरूलाई लिएर शहरबाहिर जाऊ। यसो गरे तिमीहरू यो शहरसितै नष्ट हुने छैनौ।”
16परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली.
16तर लूतले शहर छोड्न आनाकानी गरे। उनी दोमनमा परे। यसर्थ दुइजना स्वर्गदूतले उनलाई, उनकी पत्नी र छोरीहरूलाई आफ्नो हातले समाते अनि उनीहरूलाई सुराक्षित ठाउँमा लगे। परमप्रभु लूत अनि उनको परिवारप्रति दयालु हुनुहुन्थ्यो।
17नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”
17यसर्थ ती दुइ स्वर्गदूतहरुले लूत र उनको परिवारलाई शहरदेखि बाहिर पुर्याए। तिनीहरू शहरबाहिर आएपछि एकजना स्वर्गदूतले भने, “अब तिमीहरूले शहरतिर फकेर्र नहेर्नु, जीवन सुरक्षाको निम्ति भाग, अनि कुनै ठाउँमा पनि नथामिनु बेंसीमा कतै पनि नअडिनु। जबसम्म पर्वतमा पुग्दैनौ तिमीहरू भाग यदि थामियौ भने तिमीहरू शहरसितै नष्ट हुनेछौ।”
18परंतु लोट त्या दोन देवदूतांना म्हणाला, “प्रभू! इतके दूर पळत जाण्याची माझ्यावर सक्ती करु नका,
18तर लूतले ती दुई स्वर्गदूतहरुलाई भने, “महाशयहरू हो, यति टाडासम्म भाग्न मलाई कर नलगाउनु होस्।
19मी तर तुमच्या दासासारखा आहे; पण मला वांचविण्यासाठी तुम्ही माझ्यावर खूप दया केली आहे. मी डोंगरापर्यंत पळत जाऊ शकणार नाहीं; जर मी अगदी सावकाश पळू लागलो तर काहीतरी विपरीत व वाईट घडेल व मी मरुन जाईन.
19म तपाईंको दासप्रति तपाईंहरू मेरो बचाऊको निम्ति अत्यन्तै दयालु हुनुहुन्छ। तर म यहाँदेखि पर्वतसम्म भागेर जान सक्तिन। यदि म अत्यन्तै ढिलो भएर पर्वतमा पुग्नु नसकेर केही हुनु गएँ भने? म मर्ने छु।
20परंतु पाहा, येथे जवळच फार लहान गांव आहे; तेथे जाण्याची मला परवानगी असावी, त्या गावापर्यंत पळत जाऊन मी सुरक्षित राहू शकतो.”
20हेर्नुहोस्! यस ठाउँको नजिकै एउटा एकदमै सानो शहर छ र मलाई त्यहाँसम्म मात्र जानु दिनुहोस्। म त्यस शहरसम्म भाग्नु सक्छु र सुरक्षित रहन्छु।”
21तेव्हा देवदूत लोटाला म्हणाला, “ठीक आहे, मी तसेही करण्यास तुला परवानगी देतो; मी त्या नगराचा नाश करणार नाही;
21स्वर्गदूतले लूतलाई भने, “हेर, म तिमीलाई त्यसो गर्नु दिनेछु। म त्यो शहरलाई नाश पार्दिन।
22पण तेथे लवकर पळत जा. तू तेथे सुरक्षितपणे जाऊन पोहोंचेपर्यंत मला सदोम नगराचा नाश करता येणार नाही.” (लहान असल्यामुळे त्या गांवाला तेव्हापासून सोअर असे नाव पडले.)
22तर त्यहाँ छिटो पुग। तिमीहरू त्यस शहर नपुगुञ्जेलसम्म म सदोम नाश पार्न सक्तिन।” (सानो शहर हुनाले यसको नाउँ ‘सोअर’ हो।)
23लोट सोअर गांवात पाऊल टाकीत असताना सकाळ झाली व सूर्य तेजाने प्रकाशू लागला,
23घाम झुल्कँदै गर्दा लूत सोअर शहरभित्र पस्दै थिए।
24आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला;
24त्यति बेलै परमप्रभुले सदोम र गमोरालाई नष्ट गर्न शुरू गर्नु भयो। परमप्रभुले आकाशबाट आगो र जल्दै गरेको गन्धक त्यहाँ खसाल्नु भयो।
25अशा रीतीने परमेवराने सदोम व गमोरा या नगरांचा तसेच त्या सगळ्या खोऱ्याचा म्हणजे त्या तळवटीत राहाणाऱ्या सगळ्या माणसांचा, पशूंचा व वनस्पतींचा नाश केला.
25यसरी परमप्रभुले ती शहरहरू नष्ट पार्नु भयो। परमप्रभुले समस्त बेंसी उद्भिदहरू र मानिसहरू सबै नष्ट पार्नुभयो।
26लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली.
26जब तिनीहरू भाग्दै थिए, लूतकी पत्नीले पछाडी फर्केर शहरलाई हेरिन्। जब उनले फर्केर हेरिन तिनी नूनको थुप्रोमा परिणत भइन्।
27त्याच दिवशी पहाटे अब्राहाम उठला आणि आदल्या दिवशी तो परमेश्वरासमोर ज्या ठिकाणी उभा राहिला होता तेथे गेला.
27त्यसै दिन बिहानै अब्राहाम त्यस ठाउँमा गए जहाँ तिनी परमप्रभुको सामुन्ने उभिएका थिए।
28त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.
28अब्राहामले सदोम र गमोरा शहरहरूतर्फ नजर डुलाएर त्यस बेंसीको सम्पूर्ण भूमिलाई हेरे। त्यो प्रान्तबाट धूवाँको मुस्लो गइरहेको तिनले देखे अनि त्यो तिनलाई भयंकर आगोबाट निस्किएको धूवाँ जस्तो लाग्यो।
29देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते.
29त्यस बेंसीको शहरहरूलाई परमेश्वरले नाश पार्नु भयो। तर परमेश्वरले जब यस्तो गर्नु भयो उहाँले अब्राहामलाई सम्झनु भयो र तिनको भतिजोलाई बचाउँनु भयो। लूत बेंसीको शहरहरूमा बसो-बास गर्दथिए तर शहरहरू नष्ट पार्नुअघि परमेश्वरले त्यहाँबाट बाहिर भगाउनु भयो।
30या नंतर अधिक काळ सोअरात राहण्यास लोटाला भीती वाटली; तेव्हा तो त्याच्या मुलींना घेऊन डोंगरात एका गुहेत जाऊन राहिला.
30लूत सोअरमा बस्न डराए र आफ्नी दुवै छोरीहरू लिएर पर्वतको ओडारमा बस्न गए।
31एके दिवशी वडील मुलगी धाकटीला म्हणाली, “पृथ्वीवर जिकडे तिकडे स्री पुरुष लग्न करुन राहतात, आपले वडील म्हातारे होत राहिले आहेत; आणि या भागात आपल्याबरोबर लग्न करण्यास एकही पुरुष नाही;
31एक दिन उनका जेठी छोरीले आफ्नो बहिनीलाई भनी, “संसारमा कही पनि पुरूष र स्त्रीहरू विवाह गरेर आफ्नो सन्तान उत्पन्न गर्छन। तर हाम्रा पिता बृद्ध भई सकेका छन् अनि यहाँ वरिपरि हामीलाई सन्तान उत्पन्न गर्नका लागि समर्थन गर्ने कोही छैन।
32तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
32यसर्थ हामीले हाम्रो पितालाई दाखरस पियाएर मताऊँ र तिनीसित सम्बन्ध गरौं। यसरी हाम्रो परिवारलाई जीवित राख्न आफ्नो पितालाई प्रयोग गर्न सक्छौ।”
33त्याच रात्री त्या दोघी मुली वडिलांकडे गेल्या आणि त्यांना त्यानी द्राक्षमद्य पाजले; नंतर वडील मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; पण द्राक्षमद्याच्या नशेमुळे ती आपल्याजवळ निजली हे लोटाला कळले नाही.
33त्यस रात यी दुइ दिदी-बहिनीहरूले आफ्नो पितालाई मद्य दिएर पूरा मताए। तब दिदी चाँहि आफ्नो पिताको ओछ्यानमा गई अनि उनीसित सहवास गरी। लूत यति मातेका थिए कति बेला छोरी आई र गई उनलाई थाहा भएन।
34दुसऱ्या दिवशी वडील बहीण धाकट्या बहिणीला म्हणाली, “मी काल रात्री आपल्या वडिलाजवळ निजले, तर आज रात्री पुन्हा आपण वडिलांना द्राक्षमद्य पाजू या, मग रात्री तू वडिलांच्या बिछान्यात जाऊन त्याच्याजवळ नीज. अशा प्रकारे आपण त्याना मुले होऊ देऊ व आपल्या वडिलांचा वंश चालविण्यास त्यांचा उपयोग करु.”
34अर्को दिन दिदीले आफ्नी बहिनीलाई भनिन्, “हिजो राती, म हाम्रा पितासित सुतें। आज राती, फेरि उनलाई मताऊँ अनि तिमी उनको ओछ्यानमा जान सक्छौ अनि उनीसित शारीरिक सर्म्पक राख्नसक्छौ। यस प्रकार हामी आफ्नो परिवारलाई निःसन्तान हुनबाट बचाउन सक्छौं।”
35तेव्हा त्या रात्री त्या दोन मुलींनी आपल्या वडिलानां द्राक्षमद्य पाजला; नंतर धाकटी मुलगी आपल्या वडिलांच्या बिछान्यात गेली व त्यांच्याजवळ निजली; यावेळी ही नशेमुळे आपली मुलगी आपल्याजवळ निजली हे लोटाला समजले नाहीं.
35त्यस राती ती दुइ बहिनीहरूले आफ्नो पितालाई दाखरस पियाएर मताए अनि सानी चाँहि छोरी उनको ओछ्यानमा गई र सहवास गरी। तर फेरि लूत यति साह्रो मातेका थिए कति बेला को केटी उनको ओछ्यानमा सुत्न आई अनि उठेर गई उनलाई पत्तै भएन।
36अशा रीतीने लोटाच्या दोन्हीही मुली गरोदर राहिल्या. त्यांचे वडीलच त्यांच्या बांळांचे वडील होते.
36लूतका दुबै छोरीहरू गर्भवती भए अनि तिनीहरूका पिता तिनीहरूको नानीहरूका पिता थिए।
37थोरल्या मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले; आजतागायत राहात असलेल्या मवाबी लोकांचा हा मूळ पुरुष,
37जेठी छोरीले छोरो जन्माई र उसको नाउँ मोआब राखी। मोआब आजका सबै मोआबी मानिसहरूको पिता हुन्।
38धाकट्या मुलीलाही मुलगा झाला; तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी लोक आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
38सानी छोरीले पनि छोरो जन्माई र उसको नाउँ बेनअमी राखी। बेनअमी आजका सबै अम्मोनी मानिसहरूका पिता हुन्।