Marathi

Nepali

Jeremiah

12

1परमेश्वरा, जेव्हा मी तुझ्याशी वाद घालतो, तेव्हा तुझेच म्हणणे बरोबर ठरते. पण काही गोष्टी बरोबर वाटत नाहीत. त्याबद्दल मला तुला विचारावेसे वाटते. दुष्ट लोकच यशस्वी का होतात? तू ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीस, अशांना सुखाचे आयुष्य का मिळते?
1हे परमप्रभु! यदि मैले तपाईंसँग वकालत गरें भने, तपाईं सँधै धार्मिक नै हुनुहुन्छ। तापनि मलाई केही भन्न दिनुहोस् जुन सही देखिँदैन। किन दुष्ट मानिसहरू सफल हुन्छन्? किन दुष्ट मानिसहरू सम्पन्न जीवन जिउँछन्?
2त्या दुष्टांना तूच इथे वसविलेस ती माणसे मजबूत मुळे असलेल्या झाडांप्रमाणे आहेत. ती वाढतात आणि फळे देतात. तोंडाने, तू त्यांना जवळचा व प्रिय असल्याचे, ते सांगतात. पण मनाने ते तुझ्यापासून फार दूर आहेत.
2तपाईंले तिनीहरूलाई रोप्नु भयो अनि तिनीहरू शक्तिशाली भए। तिनीहरू बढछन् अनि फल दिन्छन्। तपाईं तिनीहरूका सम्मुख हुनुहुन्छ तर हृदयदेखि भने टाढा।
3पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर.
3तर हे परमप्रभु तपाईं मेरो हृदयलाई चिन्नु हुन्छ। तपाईंले मलाई देख्नु भएको छ अनि मेरो मनलाई जाँच्नु भएको छ। तिनीहरूलाई थुमाहरूलाई कसाइले अघि ताने झैं तान्नुहोस्। हत्या गरिने दिनको लागि तिनीहरूलाई अलग राख्नु होस्।
4किती काळ जमीन कोरडी राहणार? किती काळ गवत वाळून मरणार? त्या दुष्ट लोकांच्या चुकीमुळे प्राणी आणि पक्षी मरुन गेले. तरीसुद्धा ते लोक म्हणतात, “आमचे काय होईल हे पाहण्याइतक्या दीर्घकाळ यिर्मया जगणार नाही.”
4कहिले सम्म जमीन सूख्खा रहन्छ? कहिले सम्म घाँस ओइलिन्छ? त्यहाँ बस्ने मानिसहरूको दुष्टयाईले गर्दा सब चरा-चुरूङ्गीहरू अनि पशुहरू लोप भइसके। तैपनि ती दुष्ट मानिसहरू भनिरहेका छन्, “यर्मियाले हामीमाथि के घट्छ देख्ने छैन।”
5“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील?
5“यर्मिया, यदि तिमी मानिसहरूसंग दुगुर्दा थाक्यौ भने कसरी घोडाहरूसित दगुर्न सक्छौ? यदि तिमीले शान्तिमय ठाउँमा भरोसा गर्यो भने डरलाग्दो जग्गामा तिमी के गर्नेछौ? यर्दन नदीको किनारमा बढदै गरेको काँडे झाडीहरूमा तिमी के गर्ने छौ?
6ही सर्व माणसे तुझेच भाऊबंद आहेत. तुझ्याच कुटुंबातील माणसे तुझ्याविरुद्ध कट करीत आहेत. तुझ्याच घरातील माणसे तुझ्याविरुद्ध आवाज उठवीत आहे. जरी ते तुझ्याशी मित्रांसारखे बोलत असले, तरी तू त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस.”
6ती मानिसहरू तिम्रा आफ्नै दाज्यू-भाइहरू हुन। तिम्रा आफ्नै परिवारका सदस्यहरूले तिम्रै विरूद्धमा षड्‌यन्त्र रचिरहेकाछन्। तिनीहरू तिम्रो विरूद्धमा जोरसित कराउँछन्। तिनीहरूले मीठा कुराहरू गरे पनि तिनीहरूमाथि भरोसा नगर।”
7“मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे. मी माझी मालमत्ता सोडली आहे. मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.
7“मैले आफ्नो घर परिवार त्यागेको छु, मैले आफ्नो सम्पत्ति छाडें। म जसलाई प्रेम गर्दछु उसैलाई उसको शत्रुहरूलाई सुम्पें।
8माझे स्वत:चेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले. ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली.
8मेरा मानिसहरू सिंह झैं छन। तिनीहरू म पट्टि फर्की र्गजिए, यसकारण म तिनीहरूको शत्रु भएको छु।
9मरायला टेकल्यामुळे गिधाडांनी घेरलेल्या प्राण्याप्रमाणे माझ्या लोकांची स्थिती आहे. गिधाडे तिच्याभोवती (यहूदाभोवती) घिरट्या घालतात. वन्य प्राण्यांनो, तुम्हीसुध्दा या आणि काही खाद्य मिळवा.
9मेरा मानिसहरू मरेका पशुहरू जस्तै छन्। गिद्धहरू तिनीहरूको वरिपरि उडछन्। आऊ, जङ्गली हे पशुहरू हो। खान भेला होऊ।
10पुष्कळ मेंढपाळांनी (नेत्यांनी) माझ्या द्राक्षमळ्याचा नाश केला आहे. त्यांनी द्राक्षेवेली पायदळी तुडविल्या. त्यांनी माझ्या द्राक्षमळ्याचे वैराण वाळवंट केले.
10घेरै गोठालाहरूले मेरो दाखबारीहरू नष्ट पारिदिए। ती गोठालाहरू मेरो खेतका विरूवामाथि जथाभावी हिँडे। ती गोठालाहरूले मेरो सुन्दर खेत बारी रित्तो मरूभूमिमा परिणत गरिदिए।
11त्यांनी माझा मळा उजाड केला. तो सुकून मरुन गेला. तेथे कोणीही राहत नाही. सर्व देश म्हणजे एक निर्जन वाळवंट झाले आहे. त्या मळ्याची काळजी घेण्यासाठी एकही माणूस उरला नाही.
11तिनीहरूले मेरो खेत मरूभूमि बनाइदिए। यो सूखा र अनुर्बर छ र मेरो लागि रून्छ। सम्पूर्ण भूमि नै उजाड भएकोछ, तर कसैले वास्ता गर्दैन।
12त्या रिकाम्या वाळवंटाच्या हिरवळीतून लूट करण्याकरिता सैन्य आले. परमेश्वराने त्या सैन्याचा उपयोग त्या देशाला शिक्षा करण्यासाठी केला. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत राहणाऱ्या सर्वांना शिक्षा केली. कोणीही वाचला नाही.
12मरूभूमिको पहाडमाथि ध्वंशकहरू आउँछन्। यो भूमिको एक कुनादेखि अर्को कुना सम्म परमप्रभुको तरवारले सम्पूर्ण नष्ट पार्नेछ। कुनै जीवित वस्तु सुरक्षित रहने छैन।
13लोकांनी गहू पेरला, तर तिथे काटे उगवतील. लोक दमेपर्यंत खूप कष्ट करतील, पण या अफाट मेहनतीचे फळ त्यांना मिळणार नाही. त्यांच्या पिकाबाबत ते खजिल होतील. परमेश्वराच्या कोपामुळे या गोष्टी घडतील.”
13मानिसहरूले गहूँ रोप्ने छन् तर तिनीहरूले काँढाहरूको बाली काट्नेछन्। तिनीहरू महनेत अधिक गर्छन् तर त्यसबाट केही पाउँदैनन्। आफ्नो परिश्रमको फलमा तिनीहरू आफै लज्जित अनुभव गर्नेछन। परमप्रभुको क्रोधले यी सब चीजहरू हुनेछ।”
14देव काय म्हणतो ते पाहा: “इस्राएलच्या भोवती राहणाऱ्या लोकांसाठी मी काय करणार आहे, ते ती तुम्हाला सांगतो. ते लोक फार दुष्ट आहेत. मी इस्राएलच्या लोकांना दिलेल्या जमिनीचा त्या लोकांनी नाश केला. त्या पापी लोकांना, मी, खेचून काढीन व त्यांच्या देशाबाहेर त्यांना हाकलून देईन. त्यांच्याबरोबर यहूदाच्या लोकांनाही मी बाहेर खेचीन.
14यसकारण परमप्रभु भन्नुहुन्छ “मैले मेरा इस्राएली मानिसहरूलाई दिएको भूमि नजिक बसो-बास गर्ने दुष्ट मानिसहरूलाई के गर्नेछु म तिमीलाई भन्नेछु। म ती मानिसहरूलाई तिनीहरूको ठाँउबाट उखेल्नेछु अनि तिनीहरूबाट यहूदा छुट्टाउनेछु।
15पण अशा रीतीने त्या लोकांना देशाबाहेर हाकलल्यावर मला त्यांची कणव येईल. मी प्रत्येक कुटुंब परत त्यांच्या देशात आणीन आणि त्यांची जमीन परत देईल.
15जब ती मानिसहरूलाई देश निकाला गर्नु शेष हुन्छ, तिमीहरूमाथि दया राख्नेछु। म प्रत्येक मानिसलाई उसको आफ्नै पैतृक भूमिमा ल्याउनेछु।
16ह्यातून त्या लोकांनी योग्य तो बोध घ्यावा असे मला वाटते. पूर्वी त्या लोकांनी, माझ्या माणसांना, बआलच्या नावाने वचन घ्यायला शिकविले होते. आता मी त्याच रीतीने त्यांना धडा शिकविणार. वचन घेताना माझे नाव घेण्यास त्यांनी शिकावे असे मला वाटते. ‘देव नक्कीच असेपर्यंत’ अशी सुरवात त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी असे केले तर मी त्यांना यशस्वी करीन आणि माझ्या लोकांत राहू देईन.
16यदि ती मानिसहरूले मेरा मानिसहरूलाई बालको नाउँमा शपथ गर्न सिकाए झैं मेरो नाउँमा ‘परमप्रभु जीवित हुनुहुन्छ’ भन्न साँचो रूपमा सिके भने म तिनीहरूलाई मेरा मानिसहरूको बीचमा स्थापित गराउछु।
17पण जर एखाद्या राष्ट्राने माझा आदेश मानला नाही, तर त्या राष्ट्राचा मी समूळ नाश करीन. त्या राष्ट्राला मेलेल्या झाडाप्रमाणे उपटीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
17यदि कुनै राज्यले मेरो आज्ञा पालन गरेन भने त्यस जातिलाई चुडनेछु र सम्पूर्ण रूपले ध्वंस पार्नेछु।” यो सन्देश परमप्रभुबाट आएको हो।