Marathi

Nepali

Jeremiah

18

1हा संदेश यिर्मयाला परमेश्वराकडून आलेला आहे:
1यर्मियाकहाँ आएको यो परमप्रभुको सन्देश हो
2“यिर्मया, कुंभाराच्या घरी जा. मी तेथे तुला माझा संदेश देईन.”
2“कुमालेको घरमा जाऊ अनि म त्यहाँ तिमीलाई मेरा बचनहरू सुनाउनेछु।”
3म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, मी त्याला चाकावर चिखल ठेवून काम करताना पाहिले.
3यसकारण म कुमालेको घरतिर गएँ। कुमालेले चक्रमा माटो लिएर काम गरिरहेको मैले देखें।
4तो चिखलापासून भांडे बनवीत होता. पण त्यात काहीतरी चुकले म्हणून कुंभाराने त्याच चिखलाचा उपयोग करुन दुसरे भांडे बनविले. आपल्या हाताने त्याला पाहिजे तसा आकार दिला.
4उसले नरम माटोबाट एउटा हाँडी बनाउँदैथ्यो। तर हाँडीमा केही भूल रह्यो। यसर्थ उसले त्यो विगार्यो अनि उसलाई जुन माटो सही लाग्यो त्यसैबाट अर्को एउटा हाँडी बनायो।
5मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला:
5तब परमेश्वरको सन्देश मकहाँ आयो
6“इस्राएलच्या कुंटुंबीयांनो, मी (देव) अगदी असेच तुमच्या बाबतीत करु शकतो. तुम्ही जणू काही कुंभाराच्या हातातील चिखल आहात आणि मी कुंभार आहे.
6“इस्राएलका घराना, तिमीहरू जान्दछौ कि म, परमेश्वर तिमीहरूसँग पनि त्यस्तै काम गर्न सक्छु। तिमीहरू कुमालेको हातको माटो जस्तै छौं। अनि म कुमाले जस्तो हुँ।
7मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन.
7एक समयमा एउटा जाति अथवा एउटा राज्यको बारेमा बोल्न सक्नेछु अनि भन्नेछु कि म यसलाई तान्नेछु र ध्वंस पार्नेछु।
8पण त्या राष्ट्रातील लोकांचे हृदयपरिवर्तन झाल्यास ते जगतील. त्या राष्ट्रातील लोक दुष्कृत्ये करण्याचे कदाचित थांबवतील. मग माझे मतपरिवर्तन होईल. त्या राष्ट्राचा नाश करण्याचा बेत मी अंमलात आणणार नाही.
8तर त्यस राज्यका मानिसहरूले आफ्ना हृदय र जीवन शैली परिवर्तन गर्न सक्छन्। तिमीहरूले अधर्म कामहरू गर्न छाड्लान्। तब म पनि मेरो मन बदलनु सकौला। अनि ध्वंस पार्ने मेरो प्रस्ताव नलिउँला।
9मी राष्ट्राबद्दल बोलण्याची आणखी एकदा वेळ, कदाचित् येईल. मी ते राष्ट्र उभारीन आणि वसवेन असे मी म्हणेन.
9अर्को एक समय आउन सक्ला जब म एउटा राज्य अथवा जातिको बारेमा यसलाई खडा र स्थापित गराउँछु।
10पण ते राष्ट्र पापे करीत आहे आणि माझी आज्ञा पाळत नाही, असेही मला दिसण्याचा संभव आहे. मग मात्र त्या राष्ट्राच्या भल्यासाठी योजलेल्या योजनांचा मला फेरविचार करावा लागले.
10तर यस्तो हुन सक्छ कि त्यो राज्यका मानिसहरूले नराम्रा कर्महरू गर्न सक्छन अनि मेरा आज्ञाहरू उल्लंघन गर्न सक्छन। तब राम्रा कामहरू जो मैले गर्न योजना गरको थिएँ त्यस विषयमा मेरो मन परिवर्तन गर्नेछु।
11“म्हणून, यिर्मया, यरुशलेम आणि यहूदा येथे राहणाऱ्या लोकांना सांग की परमेश्वर असे म्हणतो: ‘आताच्या आता तुमच्यावर संकटे आणण्याची मी तयारी करीत आहे. मी तुमच्याविरुद्ध बेत आखत आहे. तेव्हा तुम्ही पापे करण्याचे थांबवा. प्रत्येकाने बदलावे व सत्कृत्ये करावीत.”
11“यसकारण यर्मिया, अब यहूदाका मानिसहरू र यरूशलेममा बस्ने मानिसहरूलाई भन ‘यही नै परमेश्वर भन्नुहुन्छ म तिनीहरूको लागि सकष्टहरू तैयार पारिरहेछु अनि तिनीहरूका विरूद्ध योजनाहरू बनाइरहेछु। यसकारण तिनीहरूले अनिष्ट कामहरू गर्नु वन्द गरोस्। प्रत्येक मानिस परिर्वतन होऊ र असल कुराहरू गर।’
12पण यहूदातील लोक म्हणतील, ‘असा प्रयत्न करुन काही भले होणार नाही. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करीत राहू आमच्यातील प्रत्येकाच्या हट्ठी आणि दुष्ट मनाला वाटेल तेच आम्ही करु.”
12तर यहूदाका मानिसहरूले जवाफ दिन्छन्। ‘निर्थक हो प्रयास गर्नु हामी जे चाहन्छौं त्यही गर्नेछौ। हामी अट्टेरी अनि दुष्ट हृदयले जे सुझाव दिन्छ त्यही गर्छौ।”‘
13परमेश्वर सांगत असलेल्या गोष्टी ऐका: “दुसऱ्या राष्ट्रांना हा प्रश्न विचारा. ‘इस्राएलने केलेल्या पापाप्रमाणे, पापे आणखी कोणी केल्याचे तुम्ही ऐकले आहे का?’ आणि इस्राएल तर देवाच्या दृष्टीने विशेष आहे. ती देवाच्या वधूप्रमाणे आहे.
13यसकारण परमप्रभु भन्नुहुन्छ, “अन्य जातिहरूलाई यो सोध, ‘के तिमीहरू कसैले कन्या छोरी इस्राएलले गरे झैं दुष्ट कर्महरू गरेको सुनेका छौ?’ अनि इस्राएल परमेश्वरको लागि अति प्रिय हो। इस्राएल परमेश्वरको लागि नववधु जतिकै हो।
14तुम्हाला हेही माहीत आहे की लबानोनमधील पर्वतांवरचे बर्फ कधीच वितळत नाही व थंड व सतत वाहणारे झरे कधीच सुकत नाहीत.
14तिमीहरू जान्दछौ कि लबानोन पर्वतहरूबाट हिऊँ कहिल्यै अल्पिदैन अनि बगिरहने चिसो पानी कहिल्यै सुक्दैन।
15पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात. ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे, माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी, आडवळणाने व वाईट मार्गाने जाणे पसंत करतील.
15तर मेरा मानिसहरूले मलाई बिर्सिए। तिनीहरूले अन्य देवताहरूलाई बलिहरू चढाए। तिनीहरू पूरानो पथबाट पल्टिए। अहिले तिनीहरू राम्रा सडकहरू छाडेर किनाराका पथहरू पछ्याउँछन्।
16म्हणून यहूदाचा देश म्हणजे एक निर्जन वाळवंट होईल. ह्या देशाच्या जवळून जाताना, प्रत्येकवेळी लोक धक्क्याने मान हलवून नि:श्वास सोडतील. ह्या देशाचा, अशा रीतीने, नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
16तिनीहरूको भूमि जन शून्य एक निन्दाको वस्तु हुनेछ। त्यहाँबाट जाने पथिकहरू दुखित हुन्छन् अनि तिनीहरू आफ्नो टाउको हल्लाउँनेछन्।
17मी यहूदाच्या लोकांची फाटाफूट करीन. ते त्यांच्या शत्रूंपासून पळ काढतील. पूर्वेकडचा वारा ज्याप्रमाणे सर्व वस्तू दूर उडवून देतो, त्याप्रमाणे मी यहूदातील लोकांना दूर पसरवून देईन. मी त्या लोकांचा नाश करीन. मी त्यांच्या मदतीला येत आहे, असे त्यांना दिसण्याऐवजी, मी त्यांना सोडून जाताना दिसेन.”
17पूर्वबाट बतासले उडाएको चीजहरू जस्तै म यहूदाका मानिसहरूलाई छरपष्ट पारिदिनेछु। तिनीहरूले मलाई मुद्दत गर्न गएको देख्ने छैनन् तर मैले तिनीहरूलाई छाडेर गएको देख्नेछन्।”
18नंतर यिर्मयाचे शत्रू म्हणाले, “या आपण यिर्मयाविरुध्द कट करु या. नियमांची शिकवण याजकंाकडून नक्कीच विसरली जाणार नाही. सुज्ञांचा सल्ला अजूनही आमच्याजवळ असेल. आमच्यापाशी संदेष्ट्याचे शब्द असतील. म्हणून त्याच्याबद्दल खोटे सांगू या. त्यामुळे त्याचा नाश होईल. तो सांगत असलेल्या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे नाही.”
18तब यर्मियाका शत्रुहरूले भने, “यर्मियाको विरूद्ध योजनाहरू तैयार गरौं। पूजाहारीले दिएको व्यवस्था अथवा ज्ञानीबाट पाइएको सल्लाह अथवा अगमवक्ताको सन्देश नाश हुनेछैन। यसकारण उसको बारेमा झूटा कुराहरू प्रचार गरौं ताकि ऊ नाश होस्। उसले भनेको कुराहरू प्रति ध्यान नदिऊँ।”
19परमेश्वरा, माझे ऐक! माझे म्हणणे ऐकून घे आणि कोण बरोबर आहे ते ठरव.
19हे परमप्रभु ध्यान दिनुहोस् अनि सुन्नुहोस् मेरा शत्रुहरू के भन्दैछन्।
20चांगल्याची परतफेड लोकांनी दुष्टाव्याने करावी का? नाही! देवा, मी केलेल्या गोष्टी तुला आठवतात का? मी तुझ्यासमोर उभा राहिलो आणि ह्या लोकांना तू शिक्षा करु नये म्हणून त्यांच्याविषयी चांगल्या गोष्टी मी तुला सांगितल्या. पण ते मला सापळ्यात पकडून ठार मारायला बघत आहेत.
20के मानिसहरूले असलको सट्टामा खराब फर्काउनु पर्छ? अँह सम्झना गर, म तपाईं समक्ष उभिएँ अनि तिनीहरूका निम्ति तिमीमा भएको क्रोध हटाउँन तपाईंसित वकालत गरें। तर तिनीहरूले मलाई जालमा फसाउँन प्रयास गरिरहेकाछन्।
21म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.
21यसकारण तिनीहरूका नानीहरू भोक भोकै मरून्। शत्रुका तरवारहरूले तिनीहरू परास्त हउन। तिनीहरूका पत्नीहरू छोरा-छोरी बिहीन होऊन्। यहूदाका मानिसहरू मृत्यु तिर धकेलिउन्। तिनीहरूका पत्नीहरू विधवाहरू होऊन्। यहूदाका मानिसहरू मृत्यु तिर धकेलिउन्। जवानहरू युद्ध-भूमिमा मारिउन्।
22त्यांच्या घरांत शोककळा पसरु देत. शत्रूला, अचानक, त्यांच्यावर आक्रमण करायला लावून त्यांना रडव. माझ्या शत्रूंनी मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सर्व घडू देत. मी सापळ्यात अडकावे म्हणून त्यांनी आपला सापळा लपवून ठेवला आहे.
22जब हटात तिमी तिनीहरूका विरूद्ध शत्रुहरू ल्याउँछौ तिनीहरूको घरमा ठूलो चित्कार होस्। यी आपदहरू आइलागुन् किनभने तिनीहरूले मलाई फसाउनु खाडल खने अनि मेरो खुट्टा समात्न पासो लुकाए।
23परमेश्वरा, मला मारण्यासाठी त्यांनी रचलेले बेत तुला माहीत आहेतच. त्यांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करु नकोस. त्यांची पापे पुसून टाकू नकोस. माझ्या शत्रूंचा नाश कर. तू रागावला असतानाच त्या लोकांना शिक्षा कर.
23हे परमप्रभु, मलाई मार्ने तिनीहरूका योजनाहरू तपाईं जान्नुहुन्छ। तिनीहरूका अपराधहरू क्षमा नगर्नु होस्। तिनीहरूका पापहरू नमेटिदिनो होस्। मेरा शत्रुहरूलाई ध्वंस गर्नु होस्। जब तपाईं क्रोधित हुनुहुन्छ। ती मानिसहरूलाई दण्ड दिनु होस्।