Marathi

Nepali

Proverbs

29

1जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला ‘तू चुकतो आहेस’ असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
1यदि एकजना मानिस जसलाई प्रायः हप्काइन्छ तर ऊ अट्टेरी गर्छ भने उसको एक्कासी विनाश हुनेछ उसको लागि आशा हुँदैन।
2राज्यकर्ता जर चांगला असेल तर सगळे लोक आनंदी असतात. पण वाईट माणूस राज्य करत असेल तर सगळेजण तक्रार करतात.
2जब धर्मी मानिसहरू सत्तामा आउँछन् राज्य खुशी बन्छन् तर जब दुष्ट मानिस शासक बन्छ तब सबै मानिसहरू दुःखीत हुन्छन्।
3जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.
3यदि कुनै मानिसले ज्ञानलाई प्रेम गर्छ भने, उसको बाबु खुशी हुन्छन, तर वेश्याहरूको साथीले आफ्नो सम्पत्ति बरबाद गर्छ।
4राजा जर न्यायी असला तर राष्ट्र बलशाली होते. पण राजा स्वार्थी असला आणि लोकांना त्यांच्या गोष्टी करुन घेण्यासाठी त्याला पैसे द्यावे लागत असले तर ते राष्ट्र कमजोर होईल.
4एकजना राजाले आफ्नो राज्यलाई न्याय द्वारा बलियो राख्छ, तर घूस लिने मानिसले यसलाई सर्वनाश पार्छ।
5जर एखादा माणूस गोड बोलून आपले काम करुन घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो स्वत:साठीच सापळा तयार करीत असतो.
5जसले आफ्नो मित्र सित तेल घस्छ भने उसले आफ्नै खुट्टामा जाल फिंजाउँछ।
6वाईट लोकांचा त्यांच्याच पापामुळे पराभव होतो पण चांगला माणूस गाणे गाऊन आनंदी राहातो.
6पापीजनहरू स्वयं आफ्नो जालमा फस्छन् तर धर्मी जनहरू गीत गाउँछन् अनि खुशी रहन्छन्।
7चांगल्या माणसांना गरीबांसाठी योग्य गोष्टी करायची इच्छा असते पण दुष्ट लोक मात्र पर्वा करीत नाहीत.
7धर्मी मानिसहरूले बुझ्छन् कि गरीबले न्याय पाउँनुपर्छ। तर दुष्ट मानिसले गरीबको विषयमा चिन्ता नै गर्दैन।
8जे लोक स्वत:ला इतर लोकांपेक्षा चांगले समजतात ते संकटे आणू शकतात. ते सगळ्या शहरांना गोंधळात टाकू शकतात. पण जे शहाणे असतात ते शांती राखतात.
8जसले आफैंलाई अरू भन्दा असल हुँ भन्ने सोच्छ त्यसले सारा शहर नै अस्त-व्यस्त पारिदिन्छ। तर बुद्धिमान मानिसहरूले जलि रहेको क्रोधालाई शान्त बनाउँछन्।
9शहाणा माणूस जर मूर्खाबरोबर त्याच्या समस्या सोडवायला लागला तर तो मूर्ख वाद घालेल व मूर्खासारख्या गोष्टी करेल आणि त्या दोघांचे कधीही एकमत होणार नाही.
9बुद्धिमान मानिस जब मूर्खसित झगडा गर्छ तब मूर्खले तर्क गर्छ र मूर्खतापूर्वक बोल्छ त्यो बहसको कहिल्यै समाधान हुने छैन।
10खुनी लोक नेहमी प्रामाणिक माणसांचा तिरस्कार करतात. त्या दुष्टांना प्रामाणिक आणि चांगल्या लोकांना ठार मारायचे असते.
10हत्यागर्ने मानिसले ईमानदारी मानिसलाई घृणा गर्छ, र उसलाई मार्न चाहान्छ।
11मूर्खाला चटकन् राग येतो पण शहाणा माणूस धीर धरतो आणि स्वत:ला काबूत ठेवतो.
11मूर्ख मानिसले आफ्नो रिस थाम्दैन। तर बुद्धिमानी मानिसले आफ्नो रिसलाई नियन्त्रणमा राख्छ।
12राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील.
12यदि एकजना शासकले झूटो कुरामा ध्यान दियो भने उसका सबै सेवकहरू भ्रष्ट हुन्छन्।
13गरीब माणूस आणि जो गरीबांची चोरी करतो तो माणूस एका दृष्टीने सारखेच आहेत. त्या दोघांना परमेश्वरानेच केले.
13गरीब मानिस र अत्याचारीले महसूस गर्नै पर्छ कि ती दुबै बराबर हुन कारण दुबैलाई परमप्रभुले नै सृष्टि गर्नुभएको हो।
14राजा जर गरीबांच्या बाबातीत न्यायी असला तर तो खूप काळ राज्य करेल.
14यदि कुनै राजाले गरीबहरूलाई न्यायपूर्वक हेरचाह गर्छन् भने, उनको शासन दीर्घकाल सुरक्षित रहनेछ।
15मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल.
15दण्ड अनि शिक्षाहरूले ज्ञानतिर डोर्याउँछ, तर एकजना छाडा छोडिएको छोरा आमाको लाज बन्छ।
16जर देशावर वाईट लोक राज्य करीत असतील, तर सगळीकडे पाप नांदेल पण शेवटी चांगल्या माणसांचा जय होईल.
16खराब मानिसले राष्ट्रलाई शासन गर्छन भने पाप र अपराध बढदो हुनेछ तर आखिरमा धर्मीले दुष्टहरूको पतन देख्नेछन् र त्यस पछि तिनीहरूले विजय प्राप्त गर्नेछन्।
17तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही.
17तिम्रो छोरालाई शिक्षा देऊ अनि उसले तिमीमा शान्ति ल्याउँछ; उसले तिम्रो आत्मामा खुशी ल्याउनेछ।
18जर देवाने देशाला मार्ग दाखवला नाही तर त्या देशात शांतता नांदणार नाही. पण जर देशाने देवाचे कायदे पाळले तर तो सुखी होईल.
18जब दर्शन-प्रकाश हुँदैन मानिसहरू मनमानि गर्छन जो न्यायोचित भइरहन्छ उसले आशिष पाउँछ।
19जर तुम्ही फक्त सेवकाशी बोललात तर तो त्याचा धडा शिकणार नाही. तो सेवक तुमचे शब्द समजू शकेल पण तो ते पाळणार नाही.
19कुराले मात्र नोकरलाई सुधार्न सकिँदैन, कुरा बुझिहाले पनि उसले त्यसलाई स्वीकार्दैन।
20जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर त्याच्या बाबतीत आशेला जागा नाही. जो विचार न करता बोलतो त्याच्यापेक्षा मूर्खाच्या बाबतीत आशेला अधिक जागा आहे.
20नसोची बोल्ने कुनै मानिसलाई तिमी चिन्दछौ? त्यस्तो मानिस भन्दा मूर्खको धेरै आशा गर्न सकिन्छ।
21जर तुम्ही तुमच्या सेवकाला तो जे जे मागेल ते ते सर्व दिले तर शेवटी तो चांगला सेवक होणार नाही.
21यदि तिमीले आफ्नो दासले जो माग्छ सो सधैं दिने गर्यो भने एकदिन यस्तो हुन्छ त्यो तिम्रो दास भएर रहँदैन।
22रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.
22क्रोधी मानिसले धेरै विवाद उठाउछ अनि क्रोध धेरै हुने मानिस धेरै पापहरूको अपराधी हुन्छ।
23माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरापेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.
23मानिसलाई अहंकारले होच्याउँछ, तर नम्र आत्मा भएको मानिसले सम्मान पाउँछ।
24बरोबर काम करणारे दोन चोर एकमेकांचे शत्रू असतात. एक चोर दुसऱ्याला धमकी देईल त्यामुळे जर त्याला जबरदस्तीने कोर्टात खरे बोलावे लागले तर तो बोलायाला खूपच घाबरेल.
24चोरको साथी ऊ आफ्नै शत्रु हो, जब उसले शपथ खानु पर्छ तब ऊ साक्षी बस्न धेरै डराउँछ।
25भीती ही सापळ्यासारखी असते. पण जर तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर तुम्ही सुरक्षित असाल.
25अरू मानिसहरूसँगको डर एउटा पासो झैं हो, यदि तिमीले परमप्रभुमाथि भरोसा गर्छौ भने, तिमी सुरक्षित रहनेछौ।
26खूप लोकांना राज्यकर्त्यांशी मैत्री करायची असते. पण फक्त परमेश्वरच लोकांना योग्य न्याय करतो.
26धेरै मानिसहरूले न्याय पाउनको लागि शासकलाई हेर्न खोज्छन्, तर मानिसको इन्साफ परमप्रभुबाट मात्र आउँछ।
27चांगले लोक प्रामाणिक नसलेल्यांचा तिरस्कार करतात. आणि दुष्ट लोक प्रामाणिक असलेल्यांचा तिरस्कार करतात.
27धर्मी मानिसहरूले बेईमानहरूलाई घृणा गर्छन्, फेरि बेईमान मानिसहरूले ईमानदार मानिसलाई घृणा गर्छन्।