1प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
1मेरी प्रेमीका, तिमी अत्यन्तै सुन्दरी छौ। आहा! तिमी सुन्दरी छौ। घुम्टोभित्र लुकेका ती तिम्रा आँखाहरू ढुकुरका जस्तै छन् तिम्रा ती लामा केश गिलाद पाहाडबाट ओह्रालो नाच्दै झरिरहेको बाख्राको बगाल झैं छन्।
2तुझे दात तुकतीच आंघोळ करुन आलेल्या बकऱ्या सारखे आहेत. त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही.
2तिम्रो दाँतहरू भेडा झैं सेता छन् जसलाई भर्खरै नुहाइएको र कत्रनु तयारी बनाएको छ। तिनीहरू सबैले जुम्ल्याहा पाठा जन्माउँछन् र तिनीहरूको एउटै थुमा पनि हराएको छैन।
3तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत.
3तिम्रो ओठहरू रेशमको धागो जस्तै राता छन्। तिम्रो मुख अति सुन्दर छ, तिम्रो घुम्टोभित्रका गालाहरू एउटा दारीमका दुई फ्याकहरू जस्तै छन्।
4तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक आणि लांब आहे. त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली सैनिकांच्या एक हजार ढालींनी शोभिंवंत केल्या होत्या.
4तिम्रो घाँटी दाऊदको किल्ला झैं लामो अनि पातलो छ, त्यो किल्ला सजाउनको निम्ति बनाएका हजारौं ढालहरू यसको भित्ताहरूमा शक्तिशाली सेनाहरूसँग छन्।
5तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत.
5तिम्रो स्तनहरू एक जोडी पाठाहरू जस्तै छन्, हरिणको जुम्ल्याहा पाठा जस्तै लिली फूलहरू विच चरिरहन्छ।
6दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन.
6म त्यो गन्धरसको पर्वत माथि जानेछु, र सुगन्धितको पहाडमा जानेछु, जब मैले आफ्नो अन्तिम सास लिनेछु अनि छायाँहरू लामो भई लुक्नेछन्।
7प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
7मेरी प्रेमी, तिमी सबैभन्दा सुन्दरी छौ, तिमीमा कुनै प्रकारको दाग छैन।
8लबोनान मधून माझ्या वधू, तू माझ्याबरोबर ये. लबानोनमधून माझ्याबरोबर ये. अमानाच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये, सनीर व हर्मोन यांच्या शिखरावरुन माझ्याबरोबर ये. सिंहाच्या गुहेतून, चित्यांच्या पर्वतावरुन माझ्याबरोबर ये.
8हे मेरी दुलही, तिमी मेरो निम्ति लेबनोनबाट आऊ। म भएकोमा आऊ तिमी मसित अमानाको चुचुरोबाट, सनीरको उचाईबाट, सिंहको गुफाबाट अनि चितुवाको पाहाडबाट आऊ।
9माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस.
9मेरी प्रेमिका, मेरी दुलही तिमीले मलाई उत्तेजित गराउछ्यौ। तिम्रो आखाँको एक झलकले तिम्रो गलामा लगाइएको मोतीको हारका एउटै दानाले, मेरो हृदय चोरेकी छौ।
10माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.
10हे मेरी साथी, हे मेरी दुलही। तिम्रो माया कति सुन्दर छ। तिमीले गाँसेको माया दाखरस भन्दा धेरै राम्रो छ, तिम्रो अत्तरको सुगन्ध अन्य कुनै पनि सुगन्ध भन्दा असल छ।
11माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे.
11मेरी दुलही! तिम्रो ओठबाट मह टप्किन्छ, दूध र मह तिम्रो जिब्रो मुनि छ, तिम्रा वस्त्रहरूबाट मिठो अत्तरको वासना आँउछ।
12माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस. तू बंदिस्त तळ्यासारखी, कारंज्यासारखी आहेस.
12मेरी प्रेमिका, मेरी दुलही! ताल्चा लगाएको बगैंचा जस्तै शुद्ध छौ। बन्द गरेको ताल जस्तै शुद्ध छौ। त्यो बन्द गरेको फोहरा जस्तै शुद्ध छौ।
13तुझे अवयव डाळिंबाने आणि इतर फळांनी सर्व प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी, मेंदी,
13[This verse may not be a part of this translation]
14जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत.
14[This verse may not be a part of this translation]
15तू बागेतल्या कारंज्यासाखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस.
15तिमी बग्ने पानीको स्रोत जस्तै छौ। एउटा लेबानोनबाट बग्दै आएको पानीको मूल।
16उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.
16उत्तरी हावा, तिमी उठ। दक्षिणी हावा, तिमी आऊ! मेरो बगैंचामा बह अनि आफ्नो सुगन्ध छर्क। मेरा प्रेमी आफ्नो बगैंचाभित्र पसुन् अनि त्यहाँका मिठा फलहरू खाऊन्।