1इस्राएलच्या लोकांनो, संदेश ऐका! परमेश्वराने तुमच्याबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या मी मिसरमधून ज्या घराण्यांना (इस्राएलला) आणले, त्यांच्याबद्दल हा संदेश आहे.
1OID esta palabra que ha hablado Jehová contra vosotros, hijos de Israel, contra toda la familia que hice subir de la tierra de Egipto. Dice así:
2“पृथ्वीच्या पाठीवर पुष्कळ घराणी आहेत पण मी फक्त तुमच्याच घराण्याला खास संबंध ठेवण्यासाठी निवडले पण तुम्ही माझ्याविरुध्द गेलात. म्हणून तुमच्या सर्व पापांसाठी मी तुम्हाला शिक्षा करीन.”
2A vosotros solamente he conocido de todas las familias de la tierra; por tanto visitaré contra vosotros todas vuestras maldades.
3दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.
3¿Andarán dos juntos, si no estuvieren de concierto?
4शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
4¿Bramará el león en el monte sin hacer presa? ¿dará el leoncillo su bramido desde su morada, si no prendiere?
5जाळ्यात दाणे नसतील तर, पक्षी जाळ्यात जाणार नाही आणि सापळ्याचे दार बंद झाले, तर तो सापळा पक्ष्याला पकडणारच.
5¿Caerá el ave en el lazo en la tierra, sin haber armador? ¿alzaráse el lazo de la tierra, si no se ha prendido algo?
6जर इषाऱ्याची रणशिंगे फुंकली गेली, तर लोक भीतीने थरथर कापणारच. जेव्हा नगरीवर संकट येते, तेव्हा परमेश्वर त्याला कारणीभूत असतो.
6¿Tocaráse la trompeta en la ciudad, y no se alborotará el pueblo? ¿habrá algún mal en la ciudad, el cual Jehová no haya hecho?
7प्रभू माझा परमेश्वर कदाचित् काही करायचे निश्चित करील, पण तसे करण्यापूर्वी, तो, आपला बेत त्याच्या सेवकांना म्हणजेच संदेष्ट्यांना सागेल.
7Porque no hará nada el Señor Jehová, sin que revele su secreto á sus siervos los profetas.
8सिंहाने डरकाळी फोडल्यास लोक भयभीत होतील व परमेश्वर बोलताच, संदेष्टे संदेश देतील.
8Bramando el león, ¿quién no temerá? hablando el Señor Jehová, ¿quién no porfetizará?
9[This verse may not be a part of this translation]
9Haced pregonar sobre los palacios de Azoto, y sobre los palacios de tierra de Egipto, y decid: Reuníos sobre los montes de Samaria, y ved muchas opresiones en medio de ella, y violencias en medio de ella.
10[This verse may not be a part of this translation]
10Y no saben hacer lo recto, dice Jehová, atesorando rapiñas y despojos en sus palacios.
11म्हणून परमेशवर म्हणतो, “त्या देशावर शत्रू चालून येईल तो तुमचे सामर्थ्य हिरावून घेईल. तुम्ही तुमच्या उंच मनोऱ्यांमध्ये लपविलेल्या वस्तू तो घेईल.”
11Por tanto, el Señor Jehová ha dicho así: Un enemigo habrá aún por todos lados de la tierra, y derribará de ti tu fortaleza, y tus palacios serán saqueados.
12परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”
12Así ha dicho Jehová: De la manera que el pastor libra de la boca del león dos piernas, ó la punta de una oreja, así escaparán los hijos de Israel que moran en Samaria en el rincón de la cama, y al canto del lecho.
13माझा प्रभू सर्वशक्तिमान परमेश्वर देव पुढील गोष्टी सांगतो: “याकोबच्या वंशजांना (इस्राएलला) ह्या गोष्टींबद्दल ताकीद द्या.
13Oid y protestad en la casa de Jacob, ha dicho Jehová Dios de los ejércitos:
14इस्राएलने पाप केले व त्याबद्दल त्यांना शिक्षा करीन. मी बेथेलच्या वेदी नष्ट करीन. वेदीची शिगे तोडली जातील व ती मातीत पडतील.
14Que el día que visitaré las rebeliones de Israel sobre él, visitaré también sobre los altares de Beth-el; y serán cortados los cuernos del altar, y caerán á tierra.
15हिवाळी महाल उन्हाव्व्यातील महालाबरोबर मी नष्ट करीन. हस्तिदंती घरांचा आणि इतर पूष्कळ घरांचा नाश केला जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
15Y heriré la casa del invierno con la casa del verano, y las casas de marfil perecerán; y muchas casas serán arruinadas, dice Jehová.