Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Amos

7

1परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या: दुसरे पीक वाढण्यास सुरुवात व्हायच्या वेळेलाच. तो टोळ तयार करीत होता. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे दुसरे पीक होते.
1ASI me ha mostrado el Señor Jehová: y he aquí, él criaba langostas al principio que comenzaba á crecer el heno tardío; y he aquí, era el heno tardío después de las siegas del rey.
2टोळांनी देशातील सर्व गवत खाल्ले. त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही तो फारच दुबळा आहे.”
2Y acaeció que como acabó de comer la hierba de la tierra, yo dije: Señor Jehová, perdona ahora; ¿quién levantará á Jacob? porque es pequeño.
3मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
3Arrepintióse Jehová de esto: No será, dijo Jehová.
4परमेश्वराने, माझ्या प्रभूने, मला पुढील गोष्टी दाखविल्या मी पाहिले की परमेश्वर देवाने अग्नीला न्याय देण्यास बोलाविले. अग्नीने मोठा डोह नष्ट केला व त्याने भूमी गिळण्यास सुरवात केली.
4El Señor Jehová me mostró así: y he aquí, llamaba para juzgar por fuego el Señor Jehová; y consumió un gran abismo, y consumió una parte de la tierra.
5पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, मी तुझी करूणा भाकतो याकोब जगू शकणार नाही तो खूपच लहान आहे.”
5Y dije: Señor Jehová, cesa ahora; ¿quién levantará á Jacob? porque es pequeño.
6मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”
6Arrepintióse Jehová de esto: No será esto tampoco, dijo el Señor Jehová.
7परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.)
7Enseñóme así: he aquí, el Señor estaba sobre un muro hecho á plomo, y en su mano una plomada de albañil.
8परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?” मग माझा प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्या दृष्टपणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. मी वाईट डाग काढून टाकीन.
8Jehová entonces me dijo: ¿Qué ves, Amós? Y dije: Una plomada de albañil. Y el Señor dijo: He aquí, Yo pongo plomada de albañil en medio de mi pueblo Israel: No le pasaré más:
9इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
9Y los altares de Isaac serán destruidos, y los santuarios de Israel serán asolados; y levantaréme con espada sobre la casa de Jeroboam.
10बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही.
10Entonces Amasías sacerdote de Beth-el envió á decir á Jeroboam, rey de Israel: Amós se ha conjurado contra ti en medio de la casa de Israel: la tierra no puede sufrir todas sus palabras.
11आमोस म्हणाला असे आहे, यराबाम तलवारीच्या वाराने मरेल, आणि इस्राएलच्या लोकांना त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
11Porque así ha dicho Amós: Jeroboam morirá á cuchillo, é Israel pasará de su tierra en cautiverio.
12अमास्या आमोसला असेही म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात जा आणि तेथे जेव! तेथेच दे तुझे प्रवचन.
12Y Amasías dijo á Amós: Vidente, vete, y huye á tierra de Judá, y come allá tu pan, y profetiza allí:
13पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ करू नकोस. ही यराबामची पवित्र जागा आहे, हे इस्राएलचे मंदिर आहे.”
13Y no profetices más en Beth-el, porque es santuario del rey, y cabecera del reino.
14मग आमोस अमास्याला म्हणाला, “मी धंदेवाईक संदेष्टा नाही. मी संदेष्ट्यांच्या घराण्यातीलही नाही. मी गुरे राखत होतो. आणि उंबरांच्या झाडांची निगा राखत होतो.
14Entonces respondió Amós, y dijo á Amasías: No soy profeta, ni soy hijo de profeta, sino que soy boyero, y cogedor de cabrahigos:
15मी मेंढपाळ होतो मेंढ्यांच्या मागे जात असतानाच परमेश्वराने माझा स्वीकार केला. परमेश्वर मला म्हणाला, ‘जा’ माझ्या लोकांना, इस्राएलला, संदेश सांग.’
15Y Jehová me tomó de tras el ganado, y díjome Jehová: Ve, y profetiza á mi pueblo Israel.
16म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस.
16Ahora pues, oye palabra de Jehová. Tú dices: No profetices contra Israel, ni hables contra la casa de Isaac:
17पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.”‘
17Por tanto, así ha dicho Jehová: Tu mujer fornicará en la ciudad, y tus hijos y tus hijas caerán á cuchillo, y tu tierra será partida por suertes; y tú morirás en tierra inmunda, é Israel será traspasado de su tierra.