1नबुखदनेस्सर हा बाबेलाचा राजा होता. नबुखद्नेस्सर यरुशलेमाला आला. आपल्या सैन्याच्या मदतीने त्याने यरुशलेमला वेढा घातला. यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी हे घडले.
1EN el año tercero del reinado de Joacim rey de Judá, vino Nabucodonosor rey de Babilonia á Jerusalem, y cercóla.
2परमेशवरानेच नबुखद्नेस्सराच्याकरवी यहूदाचा राजा यहोयाकीम याचा पराभव केला. नबुखद्नेस्सरने देवाच्या मंदिरातील ताटल्या व इतर वस्तू नेल्या आणि बाबेलमधील त्याच्या मूर्तीच्या देवळात ठेवल्या.
2Y el Señor entregó en sus manos á Joacim rey de Judá, y parte de los vasos de la casa de Dios, y trájolos á tierra de Sinar, á la casa de su dios: y metió los vasos en la casa del tesoro de su dios.
3नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.
3Y dijo el rey á Aspenaz, príncipe de sus eunucos, que trajese de los hijos de Israel, del linaje real de los príncipes,
4राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.
4Muchachos en quienes no hubiese tacha alguna, y de buen parecer, y enseñados en toda sabiduría, y sabios en ciencia, y de buen entendimiento, é idóneos para estar en el palacio del rey; y que les enseñase las letras y la lengua de los Caldeos.
5राजा नबुखद्नेस्सर, त्या तरुणांना, तो स्वत: जे अन्न खाई तेच अन्न व मद्य, ठरावीक प्रमाणात रोज देत असे. इस्राएलच्या ह्या तरुणांनी तीन वर्षांत सर्व शिक्षण पूर्ण करावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते राजाच्या सेवेत रूज व्हायचे होते.
5Y señalóles el rey ración para cada día de la ración de la comida del rey, y del vino de su beber: que los criase tres años, para que al fin de ellos estuviesen delante del rey.
6दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या असे ते चौघेजण होते. ते सर्व यहूदा वंशापैकी होते.
6Y fueron entre ellos, de los hijos de Judá, Daniel, Ananías, Misael y Azarías:
7नंतर अश्पनाजने ह्या यहूदी तरुणांना बाबेलच्या लोकांच्या नावाप्रमाणे नावे दिली. ती अशी: दानीएलला बेल्टशस्सर, हनन्याला शद्रख, मीशाएलला मेशख, व अजऱ्याला अबेद्नगो.
7A los cuales el príncipe de los eunucos puso nombres: y puso á Daniel, Beltsasar; y á Ananías, Sadrach; y á Misael, Mesach; y á Azarías, Abed-nego.
8दानीएलला राजाचे ते पौष्टिक अन्न व मद्य घेऊन, स्वत:ला अपवित्र करून घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून त्याने ह्यासाठी अश्पनजची परवानगी मागितली.
8Y Daniel propuso en su corazón de no contaminarse en la ración de la comida del rey, ni en el vino de su beber: pidió por tanto al príncipe de los eunucos de no contaminarse.
9देवाने अश्पनजला दानीएलशी चांगले व दयेने वागण्याची बुध्दी दिली.
9(Y puso Dios á Daniel en gracia y en buena voluntad con el príncipe de los eunucos.)
10पण अश्पनज दानीएलला म्हणाला, मला, माझ्या स्वामी, राजाची भीती वाटते. तुम्हाला असे अन्न व पेय देण्याचा हुकूम राजाने दिला आहे. तुम्ही हे अन्न खाल्ले नाहीत तर तुम्ही अशक्त व आजारी दिसू लागाल, तुमच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्षा तुम्ही वाईट दिसु लागाल. राजाने हे पाहिले. तर तो माझ्यावर रागावेल आणि माझे डोकेसुध्दा कदाचित् उडवेल. माझ्या मृत्यूला मग तुम्हीच कारणीभुत व्हाल.
10Y dijo el príncipe de los eunucos á Daniel: Tengo temor de mi señor el rey, que señaló vuestra comida y vuestra bebida; pues luego que él habrá visto vuestros rostros más tristes que los de los muchachos que son semejantes á vosotros, condenaréis para con
11अश्पनजने दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका पहाकेऱ्याची नेमणूक केली होती. त्या पहारेकऱ्याबरोबर मग दानीएलचे बोलणे झाले.
11Entonces dijo Daniel á Melsar, que estaba puesto por el príncipe de los eunucos sobre Daniel, Ananías, Misael, y Azarías:
12दानीएल त्याला म्हणाला,”आम्हाला खाण्यास फक्त भाज्या व पिण्यास पाणी दे. असे तू दहा दिवस करून बघ.
12Prueba, te ruego, tus siervos diez días, y dennos legumbres á comer, y agua á beber.
13दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.”
13Parezcan luego delante de ti nuestros rostros, y los rostros de los muchachos que comen de la ración de la comida del rey; y según que vieres, harás con tus siervos.
14तेव्हा पहारेकरी दानीएल, हनन्या, मीशाएल, व अजऱ्या व्या यांची चाचणी घ्यायला तयार झाला.
14Consintió pues con ellos en esto, y probó con ellos diez días.
15दहा दिवसानंतर पाहिले तर दानीएल व त्याच्या मित्रांची प्रकृती राजाचे पौष्टिक अन्न खाणाऱ्या इतर तरुणांपेक्षा निरोगी होती.
15Y al cabo de los diez días pareció el rostro de ellos mejor y más nutrido de carne, que los otros muchachos que comían de la ración de comida del rey.
16मग पहारेकऱ्याने, दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्यांना राजाने दिलेल्या खास अन्नाऐवजी भाज्या देण्याचाच परिपाठ ठेवला.
16Así fué que Melsar tomaba la ración de la comida de ellos, y el vino de su beber, y dábales legumbres.
17देवाने ह्या चौघांना सुज्ञपणा व निरनिराव्व्या प्रकारचे साहित्य व विज्ञान शिकण्याची क्षमता दिली होती. दानीएलला तर सर्व प्रकारच्या दृष्टांन्ताबद्दल व स्वप्नांबद्दल समजू शके.
17Y á estos cuatro muchachos dióles Dios conocimiento é inteligencia en todas letras y ciencia: mas Daniel tuvo entendimiento en toda visión y sueños.
18सर्व तरुणांनी तीन वर्षांत शिकून तयार व्हावे, अशी राजाची इच्छा होती. राजाने ठरवून दिलेल्या कालावधीनंतर म्हणजे तीन वर्षांनंतर अश्पनजने सर्व तरुणांना नबुखद्नेस्सर राजापुढे उभे केले.
18Pasados pues los días al fin de los cuales había dicho el rey que los trajesen, el príncipe de los eunucos los trajo delante de Nabucodonosor.
19राजा त्यांच्याशी बोलल्यावर, त्याच्या लक्षात आले की दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या चौघांएवढे कोणीही बुध्दिमान नाहीत. म्हणून ह्याच चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले.
19Y el rey habló con ellos, y no fué hallado entre todos ellos otro como Daniel, Ananías, Misael, y Azarías: y así estuvieron delante del rey.
20जेव्हा जेव्हा राजाने त्यांना काही महत्वाचे विचारले, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे ज्ञान व जाण दिसून आली. त्याच्या राज्यातील ज्ञानी माणसांपेक्षा वा मांत्रिकांपेक्षा हे दहापटीने हुशार आहेत, हे राजाच्या लक्षात आले.
20Y en todo negocio de sabiduría é inteligencia que el rey les demandó, hallólos diez veces mejores que todos los magos y astrólogos que había en todo su reino.
21म्हणून दानीएलला कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत राजाच्या पदरी ठेवून घेण्यात आले.
21Y fué Daniel hasta el año primero del rey Ciro.