Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Daniel

4

1नबुखद्नेस्सर राजाने पुष्कळ राष्ट्रांना निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि जगात वेगवेगव्व्या ठिकाणी राहणाव्या लोकांना पुढील पत्र लिहिले: अभिवादन,
1NABUCODONOSOR rey, á todos los pueblos, naciones, y lenguas, que moran en toda la tierra: Paz os sea multiplicada:
2परात्पर देवाने माझ्यासाठी केलेले चमत्कार व विस्मयड्ढारक गोष्टी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे.
2Las señales y milagros que el alto Dios ha hecho conmigo, conviene que yo las publique.
3देवाने आश्चर्यकारक चमत्कार केले आहेत. क्ष्याने प्रभावी चमत्कार केले आहेत. देवाचे राज्य चिरंतन आहे. आणि त्याचे प्रभत्व पिढ्यान्पिढ्या राहील.
3Cuán grandes son sus señales, y cuán potentes sus maravillas! Su reino, reino sempiterno, y su señorío hasta generación y generación.
4मी नबुखद्नेस्सर माझ्या राजवाड्यात सुखात होतो. मी यशस्वी जीवन जगत होतो.
4Yo Nabucodonosor estaba quieto en mi casa, y floreciente en mi palacio.
5पण मला पडलेल्या स्वप्नाने मी भयभीत झालो. मी झोपलो असताना मला काही प्रतिमा दिसल्या, काही दृष्टान्त झाले त्यामुळे मी फार घाबरलो.
5Vi un sueño que me espantó, y las imaginaciones y visiones de mi cabeza me turbaron en mi cama.
6म्हणून बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना बोलावून आणण्याचा हुकूम दिला. का? कारण तेच मला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले असते.
6Por lo cual yo puse mandamiento para hacer venir delante de mí todos los sabios de Babilonia, que me mostrasen la declaración del sueño.
7मांत्रिक व खास्दी ह्यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले पण ते त्याचा अर्थ सांगू शकले नाहीत.
7Y vinieron magos, astrólogos, Caldeos, y adivinos: y dije el sueño delante de ellos, mas nunca me mostraron su declaración;
8अखेर, दानीएलने येऊन मला स्वप्नाबद्दल सांगितले, (मी दानीएलला माझ्या दैवताबद्दलची भक्तिभावना व्यक्त करण्यासाठी बेल्टशस्सर असे नाव दिले आहे. पवित्र दैवतांचा आत्मा त्यांच्या अंगात आहे.)
8Hasta tanto que entró delante de mí Daniel, cuyo nombre es Beltsasar, como el nombre de mi dios, y en el cual hay espíritu de los dioses santos, y dije el sueño delante de él, diciendo:
9मी म्हणालो, “बेलटशस्सर तू सर्व मांत्रिकांत श्रेष्ठ आहेस. तुझ्या अंगात पवित्र दैवतांचे आत्मे येतात हे मला ठाऊक आहे. तुला समजण्यास असे रहस्य कोणतेच नाहि,हेही मला माहित आहे.मला पडलेल्या ह्या स्वप्नाचा अर्थ तू मला सांग.
9Beltsasar, príncipe de los magos, ya que he entendido que hay en ti espíritu de los dioses santos, y que ningún misterio se te esconde, exprésame las visiones de mi sueño que he visto, y su declaración.
10मी झोपलो असताना मला पुढील दृष्टान्त झाले मी पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष पाहिला. तो खूप उंच होता.
10Aquestas las visiones de mi cabeza en mi cama: Parecíame que veía un árbol en medio de la tierra, cuya altura era grande.
11तो खूप वाढला व मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशाला भिडला. पृथ्वीच्या पाठीवरून तो कोठूनही दिसू शकत असे.
11Crecía este árbol, y hacíase fuerte, y su altura llegaba hasta el cielo, y su vista hasta el cabo de toda la tierra.
12त्या वृक्षाची पाने सुंदर होती. त्याला पुष्कळ चांगली फळे आली होती. त्या वृक्षापासून प्रत्येकाला भरपूर अन्न मिळत होते. वन्य प्राण्यांना त्या वृक्षाच्या छायेत आसरा मिळत होता, तर पक्षी फांद्यांवर राहात होते. प्रत्येकाला वृक्षापासून भक्ष्य मिळत होते.
12Su copa era hermosa, y su fruto en abundancia, y para todos había en él mantenimiento. Debajo de él se ponían á la sombra las bestias del campo, y en sus ramas hacían morada las aves del cielo, y manteníase de él toda carne.
13मी झोपलो असताना, दृष्टान्तात हे सर्व पाहात होतो. मग मी पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिले.
13Veía en las visiones de mi cabeza en mi cama, y he aquí que un vigilante y santo descendía del cielo.
14तो खूप मोठ्याने बोलला, तो म्हणाला, वृक्ष तोडा, त्यांच्या फांद्या छाटा, पाने ओरबाडून काढा. त्याची फळे भोवताली विखरून टाका. मग वृक्षाखाली राहाणारे प्राणी दूर पळून जातील, फांद्यांवर राहाणारे पक्षी दूर उडून जातील.
14Y clamaba fuertemente y decía así: Cortad el árbol, y desmochad sus ramas, derribad su copa, y derramad su fruto: váyanse las bestias que están debajo de él, y las aves de sus ramas.
15पण खोड व मुळे जमिनीत तशीच; राहू द्यात. त्याभोवती लोखंड व कोसे यांची जाळी लावा. खोड व मुळे तेथेच राहातील. त्यांच्याभोवती गवत कढेल ते खोड व ती मुळे तेथेच झाडा-झुडुपांमध्ये वन्य पशूंबरोबर राहातील, व दवाने भिजतील.
15Mas la cepa de sus raíces dejaréis en la tierra, y con atadura de hierro y de metal entre la hierba del campo; y sea mojado con el rocío del cielo, y su parte con las bestias en la hierba de la tierra.
16तो वृक्ष ह्यापुढे माणसाप्रमाणे विचार करणार नाही. मानव-हदयाऐवची त्याला पशुहदय मिळेल अशा रीतीने त्याला सात पावसाळे (सात वर्षे) काढावे लागतील.
16Su corazón sea mudado de corazón de hombre, y séale dado corazón de bestia, y pasen sobre él siete tiempos.
17त्या पवित्र देवदूतांनी अशी शिक्षा मोठ्याने सुनावली. का? कारण परात्पर देवाचेच प्रभुत्व मानवांच्या सर्व राज्यांवर आहे हे पृथ्वीवरील सर्व लेकांना कळावे, देव त्याच्या इच्छेप्रमाणे ही राज्ये त्याला वाटेल त्या माणसांच्या हाती सोपवितो.त्या राज्यांवर राज्य करण्यासाठी तो नम्र लोकांची निवड करतो.
17La sentencia es por decreto de los vigilantes, y por dicho de los santos la demanda: para que conozcan los vivientes que el Altísimo se enseñorea del reino de los hombres, y que á quien él quiere lo da, y constituye sobre él al más bajo de los hombres.
18माझे, नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न असे होते. आता, बेल्टशस्सर (दानीएल) मला त्याचा अर्थ सांग. माझ्या राज्यातला कोणीही ज्ञानी माणूस मला ह्याचा अर्थ सांगू शकणार नाही. पण बेल्टशस्सर तुझ्या अंगात देवाच आत्मा (वास करीत) असल्याने, तू ह्या स्वप्नाचा अर्थ लावू शकतोस.
18Yo el rey Nabucodonosor he visto este sueño. Tú pues, Beltsasar, dirás la declaración de él, porque todos los sabios de mi reino nunca pudieron mostrarme su interpretación: mas tú puedes, porque hay en ti espíritu de los dioses santos.
19मग काही काळापर्यंत दानीएल (म्हणजे बेल्टशस्सर) एकदम गप्प झाला. तो या गोष्टीचा त्याच्या मनात विचार करीत राहिला ते पाहून राजा म्हणाला,”बेल्टशस्सर (दानीएल) मला स्वप्नचा अर्थ सांगताना घाबरू नकोस. मग बेल्टशस्सर (दानीएल) राजाला म्हणाला,”हे स्वामी इडापिडा टळो! हे स्वप्न तुझ्या शत्रूंच्या संदर्भात असायला हवे होते. आणि त्या स्वप्नाचा अर्थ तुझ्या विरोधात असणाऱ्यांच्या संदर्भात असायला हवा होता.
19Entonces Daniel, cuyo nombre era Beltsasar, estuvo callando casi una hora, y sus pensamientos lo espantaban: El rey habló, y dijo: Beltsasar, el sueño ni su declaración no te espante. Respondió Beltsasar, y dijo: Señor mío, el sueño sea para tus enemigos,
20[This verse may not be a part of this translation]
20El árbol que viste, que crecía y se hacía fuerte, y que su altura llegaba hasta el cielo, y su vista por toda la tierra;
21[This verse may not be a part of this translation]
21Y cuya copa era hermosa, y su fruto en abundancia, y que para todos había mantenimiento en él; debajo del cual moraban las bestias del campo, y en sus ramas habitaban las aves del cielo,
22राजा, तूच तो वृक्ष आहेस, तू महान व सामर्थ्यशाली झाला आहेस आकाशाला भिडणाऱ्या उंच वृक्षाप्रमाणे तू आहेस आणि तुझी सत्ता पृथ्वीच्या टोकापर्यंत पसरली आहे.
22Tú mismo eres, oh rey, que creciste, y te hiciste fuerte, pues creció tu grandeza, y ha llegado hasta el cielo, y tu señorío hasta el cabo de la tierra.
23राजा तू पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिलेस.तो देवदूत म्हणाला, वृक्ष तोडून टाका. क्ष्याचा नाश करा.पण खोड व मुळे राहू द्या. त्याभोवती लोखंड व कासे यांची जाळी बसवा त्याला गवतात राहू द्या तो दवात भिजेल. तो वन्य पशूंप्रमाणे राहील. सात पावसाळे (सात वर्ष) असे काढावे लागतील.
23Y cuanto á lo que vió el rey, un vigilante y santo que descendía del cielo, y decía: Cortad el árbol y destruidlo: mas la cepa de sus raíces dejaréis en la tierra, y con atadura de hierro y de metal en la hierba del campo; y sea mojado con el rocío del ci
24हे राजा, ह्याचा अर्थ परात्पर देवाने ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडवून आणण्याची आज्ञा दिली आहे.
24Esta es la declaración, oh rey, y la sentencia del Altísimo, que ha venido sobre el rey mi señor:
25नबुखद्नेस्सर राजा तुला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागेल. तू वन्य पशूंमध्ये राहाशील, गुरांप्रमाणे तुला गवत खावे लागले.तू दवात भिजशील, सात पावसाव्व्यानंतर (सात वर्षानंतर) तू धडा शिकशील. परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यावर प्रभुत्व असते हे तुला कळेल. देव त्याला पाहिजे त्यांच्याच हातात राज्ये सोपवितो.
25Que te echarán de entre los hombres, y con las bestias del campo será tu morada, y con hierba del campo te apacentarán como á los bueyes, y con rocío del cielo serás bañado; y siete tiempos pasarán sobre ti, hasta que entiendas que el Altísimo se enseñore
26“वृक्षाचा बुंधा व मुळे जमिनीत राहू देण्याची देवाची आज्ञा आहे. ह्याचा अर्थ तुला तुझे राज्य परत मिळेल. पण त्याआधी तुला राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व आहे हे कळायला हवे.
26Y lo que dijeron, que dejasen en la tierra la cepa de las raíces del mismo árbol, significa que tu reino se te quedará firme, luego que entiendas que el señorío es en los cielos.
27तेव्हा राजा, माझे ऐक पाप करण्याचे सोडून दे. योग्य त्याच गोष्टी कर. वाईट कृत्ये करू नकोस गरिबांवर दया कर. मग कदाचित तुला यशच मिळेल.
27Por tanto, oh rey, aprueba mi consejo, y redime tus pecados con justicia, y tus iniquidades con misericordias para con los pobres; que tal vez será eso una prolongación de tu tranquilidad.
28नबुखद्नेस्सरच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडल्या.
28Todo aquesto vino sobre el rey Nabucodonosor.
29[This verse may not be a part of this translation]
29A cabo de doce meses, andándose paseando sobre el palacio del reino de Babilonia,
30[This verse may not be a part of this translation]
30Habló el rey, y dijo: ¿No es ésta la gran Babilonia, que yo edifiqué para casa del reino, con la fuerza de mi poder, y para gloria de mi grandeza?
31त्याचे शब्द त्याच्या तोंडातच होते की स्वर्गातून आवाज आला,”राजा नबुखद्नेस्सर, पुढे तुझे काय होणार आहे ते पाहा: राजा म्हणून तुला असलेली सत्ता तुझ्यापासून हिरावून घेतली जाईल.
31Aun estaba la palabra en la boca del rey, cuando cae una voz del cielo: A ti dicen, rey Nabucodonosor; el reino es traspasado de ti:
32तुला सक्तीने लोेकांपासून दूर नेले जाईल. तू वन्य पशूंबरोबर राहाशील. गाईप्रमाणे तू गवत खाशील तुला धडा शिकायला सात पावसाळे (सात वर्षे) जावे लागतील. मग तुला समजून चुकेल की परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यांवर प्रभत्व असते व तो त्याच्या इच्छेनुसार त्या त्या माणसांच्या हाती राज्ये सोपवितो!”
32Y de entre los hombres te echan, y con las bestias del campo será tu morada, y como á los bueyes te apacentarán: y siete tiempos pasarán sobre ti, hasta que conozcas que el Altísimo se enseñorea en el reino de los hombres, y á quien él quisiere lo da.
33ह्या गोष्टी ताबडतोब घडल्या नबुखद्नेस्सरला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले. त्यायाला गुरांप्रमाणे गवत खावे लागले. तो दवात भिजला. त्याचे केस गरूडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले,व नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली.
33En la misma hora se cumplió la palabra sobre Nabucodonosor, y fué echado de entre los hombres; y comía hierba como los bueyes, y su cuerpo se bañaba con el rocío del cielo, hasta que su pelo creció como de águila, y sus uñas como de aves.
34ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले. देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.
34Mas al fin del tiempo yo Nabucodonosor alcé mis ojos al cielo, y mi sentido me fué vuelto; y bendije al Altísimo, y alabé y glorifiqué al que vive para siempre; porque su señorío es sempiterno, y su reino por todas las edades.
35पृथ्वीवरचा मनुष्यप्राणी खरच महत्वाचा नाही. स्वर्गीय सामर्थ्यांत व पृथ्वीवरच्या माणसांत देवाच्याच इच्छेने सर्व काही घडते त्याच्या सामर्थ्यशाली हाताला कोणी अडवू शकत नाही. त्याच्या कृत्यांबद्दल कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही.
35Y todos los moradores de la tierra por nada son contados: y en el ejército del cielo, y en los habitantes de la tierra, hace según su voluntad: ni hay quien estorbe su mano, y le diga: ¿Qué haces?
36अशारीतीने, त्या वेळी, देवाने माझे मन ताव्व्यावर आणले. राजा म्हणून माझा सन्मान व सत्ता मला त्याने परत दिली. माझे सल्लागार व राजवंशातील लोेक पुन्हा मला विचारू लागले. मी पुन्हा राजा झालो. आणि पूर्वोपेक्षा मी महान व अधिक सामर्थ्यशाली झालो.
36En el mismo tiempo mi sentido me fué vuelto, y la majestad de mi reino, mi dignidad y mi grandeza volvieron á mí, y mis gobernadores y mis grandes me buscaron; y fuí restituído á mi reino, y mayor grandeza me fué añadida.
37आता मी नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गातो, त्याचा गौरव करतो, त्याचे उपकार मानतो. तो करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच; असते तो नेहमीच न्याय मार्ग स्वीकारतो आणि गर्विष्ठांना तो नम्र करतो.
37Ahora yo Nabucodonosor alabo, engrandezco y glorifico al Rey del cielo, porque todas sus obras son verdad, y sus caminos juicio; y humillar puede á los que andan con soberbia.