1मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
1Y FUÉ á mí palabra de Jehová, diciendo:
2“मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन 1बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता.
2Hijo del hombre, hubo dos mujeres, hijas de una madre,
3त्या अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, मिसरमध्ये, वेश्या झाल्या. मिसरमध्ये, त्यांनी प्रथम प्रियाराधन केले आणि पुरुषांना स्तनाग्रांना स्पर्श करु दिला व आपली स्तने त्यांच्या हाती दिली.
3Las cuales fornicaron en Egipto; en sus mocedades fornicaron. Allí fueron apretados sus pechos, y allí fueron estrujados los pechos de su virginidad.
4त्यातील थोरल्या बहिणीचे नाव अहला व धाकटीचे अहलीबा असे होते. त्या व वाहिणी माझ्या पत्नी झाल्या आम्हाला मुले झाली. (खरे म्हणजे अहला म्हणजेच शोमरोन व अहलीबा म्हणजे यरुशलेम होय.)
4Y llamábanse, la mayor, Aholah, y su hermana, Aholibah; las cuales fueron mías, y parieron hijos é hijas. Y llamáronse, Samaria, Aholah; y Jerusalem, Aholibah.
5“मग अहलाने माझा विश्वासघात केला - ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. ‘तिने अश्शूरच्या सैनिकांना
5Y Aholah cometió fornicación en mi poder: y prendóse de sus amantes, los Asirios sus vecinos,
6निळ्या गणवेषांत पाहिले. ते सर्व तरुण, हवेसे वाटणारे. घोडेस्वार होते. ते नेते व अधिकारी होते.
6Vestidos de cárdeno, capitanes y príncipes, mancebos todos de codiciar, caballeros que andaban á caballo.
7अहलाने स्वत:त्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली.
7Y puso sus fornicaciones con ellos, con todos los más escogidos de los hijos de los Asirios, y con todos aquellos de quienes se enamoró: contaminóse con todos los ídolos de ellos.
8ह्या व्यतिरिक्त, तिने आपले मिसरबरोबरचे प्रेम प्रकाश चालूच ठेवले. ती अगदी तरुण असतानाच मिसरने तिच्याबरोबर प्रियाराधन केले होते. तिच्या कोवळ्या स्तनांना स्पर्श करणारा पहिला प्रियकर मिसरच होय. मिसरने आपले खोटे प्रेम तिच्यावर ओतले.
8Y no dejó sus fornicaciones de Egipto: porque con ella se echaron en su mocedad, y ellos comprimieron los pechos de su virginidad, y derramaron sobre ella su fornicación.
9मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले.
9Por lo cual la entregué en mano de sus amantes, en mano de los hijos de los Asirios, de quienes se había enamorado.
10त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिची मुले घेतली. आणि तलवारीने तिला ठार केले. त्यांनी तिला शिक्षा केली. तिचे नाव सर्व स्त्रियांच्या तोंडी अजूनही आहे.
10Ellos descubrieron sus vergüenzas, tomaron sus hijos y sus hijas, y á ella mataron á cuchillo: y vino á ser de nombre entre las mujeres, pues en ella hicieron juicios.
11“तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती.
11Y viólo su hermana Aholibah, y estragó su amor más que ella; y sus fornicaciones, más que las fornicaciones de su hermana.
12तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते.
12Enamoróse de los hijos de los Asirios, sus vecinos, capitanes y príncipes, vestidos en perfección, caballeros que andaban á caballo, todos ellos mancebos de codiciar.
13सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वत:च्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.
13Y vi que se había contaminado: un camino era el de ambas.
14“अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती.
14Y aumentó sus fornicaciones: pues cuando vió hombres pintados en la pared, imágenes de Caldeos pintadas de color,
15त्यांनी कमरेला पट्टे बांधले होते आणि डोक्याला लांब फेटे बांधले होते. ते सर्व अतीरथीप्रमाणे दिसत होते. ते सर्व मूळच्या खास्द्यांप्रमाणे दिसत होते.
15Ceñidos de talabartes por sus lomos, y tiaras pintadas en sus cabezas, teniendo todos ellos parecer de capitanes, á la manera de los hombres de Babilonia, nacidos en tierra de Caldeos,
16अहलीबा त्यांच्यावर आसक्त झाली.
16Enamoróse de ellos en viéndolos, y envióles mensajeros á la tierra de los Caldeos.
17म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली.
17Y entraron á ella los hombres de Babilonia á la cama de los amores, y contamináronla con su fornicación; y ella también se contaminó con ellos, y su deseo se hartó de ellos.
18“अहलीबाने आपली बेईमानी सर्वांना पाहू दिली. तिने आपल्या नग्न शरीराशी अनेक पुरुषांना मौज करु दिली. त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे मला तिचीही अतिशय घृणा वाटू लागली.
18Así hizo patentes sus fornicaciones, y descubrió sus vergüenzas: por lo cual mi alma se hartó de ella, como se había ya hartado mi alma de su hermana.
19तिने पुन्हा पुन्हा माझा विश्वासघात केला. मग तिला मिसर बोररच्या तिच्या ऐन तारुण्यातील प्रेम प्रकरणाची आठवण झाली.
19Aun multiplicó sus fornicaciones trayendo en memoria los días de su mocedad, en los cuales había fornicado en la tierra de Egipto.
20गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली.
20Y enamoróse de sus rufianes, cuya carne es como carne de asnos, y cuyo flujo como flujo de caballos.
21“अहलीबा, तू तरुण होतीस तेव्हा तुझा प्रियकर तुझ्या स्तनाग्रांना स्पर्श करी व तुझे स्तन हातात धरी, त्याची तुला स्वप्ने पडू लागली.
21Así tornaste á la memoria la suciedad de tu mocedad, cuando comprimieron tus pechos en Egipto por los pechos de tu mocedad.
22म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील.
22Por tanto, Aholibah, así ha dicho el Señor Jehová: He aquí que yo despierto tus amantes contra ti, de los cuales se hartó tu deseo, y yo les haré venir contra ti en derredor;
23बाबेलच्या पुरुषांना विशेषत: खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना व निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन.
23Los de Babilonia, y todos los Caldeos, mayordomos, y príncipes, y capitanes, todos los de Asiria con ellos: mancebos todos ellos de codiciar, capitanes y príncipes, nobles y principales, que montan á caballo todos ellos.
24ह्या लोकांचा जथा तुझ्याकडे येईल. ते घोड्यांवर स्वार होऊन वा रथांतून तुझ्याकडे येतील. ते पुष्कळजण असतील. त्यांच्याजवळ भाले, ढाली, शिरस्त्राणे असतील, ते तुझ्याभोवती जमतील. तू माझ्याशी कसे वागलीस, हे मी त्यांना सांगीन. मग ते त्यांच्या परीने तुला शिक्षा करतील.
24Y vendrán sobre ti carros, carretas, y ruedas, y multitud de pueblos. Escudos, y paveses, y capacetes pondrán contra ti en derredor; y yo daré el juicio delante de ellos, y por sus leyes te juzgarán.
25मी किती इर्ष्यावान आहे, ते मी तुला दाखवीन. ते सर्व खूप संतापून तुझा समाचार घेतील. ते तुझे नाक, कान कापतील. तलवारीने तुला ठार करतील. ते तुझी मुले घेतील आणि तुझे असेल नसेल ते सर्व ते जाळतील.
25Y pondré mi celo contra ti, y obrarán contigo con furor; quitarte han tu nariz y tus orejas; y lo que te quedare caerá á cuchillo. Ellos tomarán tus hijos y tus hijas, y tu residuo será consumido por el fuego.
26ते तुझी उंची वस्त्रे व दागिने घेतील.
26Y te desnudarán de tus vestidos, y tomarán los vasos de tu gloria.
27मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.”
27Y haré cesar de ti tu suciedad, y tu fornicación de la tierra de Egipto: ni más levantarás á ellos tus ojos, ni nunca más te acordarás de Egipto.
28परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे.
28Porque así ha dicho el Señor Jehová: He aquí, yo te entrego en mano de aquellos que tú aborreciste, en mano de aquellos de los cuales se hartó tu deseo:
29ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल.
29Los cuales obrarán contigo con odio, y tomarán todo lo que tú trabajaste, y te dejarán desnuda y descubierta: y descubriráse la torpeza de tus fornicaciones, y tu suciedad, y tus fornicaciones.
30दुसऱ्या राष्ट्रांच्या मागे लागून तू माझा त्याग केलास आणि ह्या वाईट गोष्टी केल्यास. त्या अमंगळ मूर्तींना पूजायाला तू सुरवात केलीस तेव्हाच ही दुष्कृत्ये तू केलीस.
30Estas cosas se harán contigo, porque fornicaste en pos de las gentes, con las cuales te contaminaste en sus ídolos.
31तू तुझ्या बहिणीमागून गेलीस आणि तिच्याप्रमाणे वागलीस. तू तिचा विषाचा प्याला स्वत:च्या हातात घेतलास, तूच तुझ्या शिक्षेल कारणीभूत आहेस.”
31En el camino de tu hermana anduviste: yo pues pondré su cáliz en tu mano.
32परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. “तुझ्या बहिणीचा विषाचा पेला तू पिशील. तो पेला खूप मोठा आहे. त्यात खूप विष (शिक्षा) मावते. लोक तुला हसतील व तुझी चेष्टा करतील.
32Así ha dicho el Señor Jehová: Beberás el hondo y ancho cáliz de tu hermana; de ti se mofarán las gentes, y te escarnecerán: de grande cabida es.
33तू दारुड्याप्रमाणे झोकांड्या खाशील. तू खूप दु:खी होशील. तो विद्ध्वंस व नाश यांनी भरलेला पेला आहे. तुझ्या बहिणीने प्यायला, तसाच हा पेला (शिक्षा) आहे.
33Serás llena de embriaguez y de dolor por el cáliz de soledad y de asolamiento, por el cáliz de tu hermana Samaria.
34तू त्या पेल्यातील विष पिशील. तू शेवटचा थेंबसुद्धा पिशील. तू पेला फेकून देशील व त्याचे तुकडे तुकडे होतील. तू वेदनेने स्वत:चेच स्तन उपटून काढशील. असेच घडेल कारण मी परमेश्वर व प्रभू आहे आणि मीच ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
34Lo beberás pues, y lo agotarás, y quebrarás sus tiestos; y tus pechos arrancarás; porque yo he hablado, dice el Señor Jehová.
35“म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.”
35Por tanto, así ha dicho el Señor Jehová: Por cuanto te has olvidado de mí, y me has echado tras tus espaldas, por eso, lleva tú también tu suciedad y tus fornicaciones.
36परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा करशील का? मग त्यांनी केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल त्यांना सांग.
36Y díjome Jehová: Hijo del hombre, ¿no juzgarás tú á Aholah, y á Aholibah, y les denunciarás sus abominaciones?
37त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले.
37Porque han adulterado, y hay sangre en sus manos, y han fornicado con sus ídolos; y aun sus hijos que me habían engendrado, hicieron pasar por el fuego, quemándolos.
38त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले.
38Aun esto más me hicieron: contaminaron mi santuario en aquel día, y profanaron mis sábados;
39त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
39Pues habiendo sacrificado sus hijos á sus ídolos, entrábanse en mi santuario el mismo día para contaminarlo: y he aquí, así hicieron en medio de mi casa.
40“निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले.
40Y cuanto más, que enviaron por hombres que vienen de lejos, á los cuales había sido enviado mensajero: y he aquí vinieron; y por amor de ellos te lavaste, y alcoholaste tus ojos, y te ataviaste con adornos:
41तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत.
41Y te sentaste sobre suntuoso estrado, y fué adornada mesa delante de él, y sobre ella pusiste mi perfume y mi óleo.
42“पुष्कळ लोकांची मेजवानी सुरु असल्याप्रमाणे यरुशलेममधून आवाज आला. मेजवानीस खूप लोक जमले. वाळवंटाकडून येणारे आधीपासूनच मद्य प्राशन करीत होते. त्यांनी स्त्रियांना बांगड्या व मुकुट दिले.
42Y oyóse en ella voz de compañía en holganza: y con los varones fueron traídos de la gente común los Sabeos del desierto; y pusieron manillas sobre sus manos, y coronas de gloria sobre sus cabezas.
43तेव्हा व्यभिचाराच्या पापाने कंटाळलेल्या एका स्त्रीशी मी बोललो. मी तिला विचारले, ‘ते तुझ्याशी व तू त्यांच्याशी असेच व्यभिचाराचे पाप करीत राहणार का?’
43Y dije á la envejecida en adulterios: Sus prostituciones cumplirán ellos ahora, y ella con ellos:
44पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले.
44Porque han venido á ella como quien viene á mujer ramera: así vinieron á Aholah y á Aholibah, mujeres depravadas.
45“पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार व खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला व अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
45Por tanto, hombres justos las juzgarán por la ley de las adúlteras, y por la ley de las que derraman sangre: porque son adúlteras, y sangre hay en sus manos.
46परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “लोकांना एकत्र करा. मग त्या लोकानाच अहला व अहलीबा यांना शिक्षा करु द्या. लोकांचा जमाव त्यांना शिक्षा करील व त्या दोघींची चेष्टा करील.
46Por lo que así ha dicho el Señor Jehová: Yo haré subir contra ellas compañías, las entregaré á turbación y á rapiña:
47मग जमाव त्यांना दगडाने ठेचून मारील. मग तलवारीने तो त्यांचे तुकडे तुकडे करील त्यांच्या मुलांनाही जमाव मारील व त्यांची घरे जाळील.
47Y la compañía de gentes las apedreará con piedras, y las acuchillará con sus espadas: matarán á sus hijos y á sus hijas, y sus casas consumirán con fuego.
48अशा रीतीने, ह्या देशावरचा कलंक मी घालवतो. तुमच्यासारख्या लज्जास्पद गोष्टी न करण्याचा इशारा इतर स्त्रियांना मिळेल.
48Y haré cesar la depravación de la tierra, y escarmentarán todas las mujeres, y no harán según vuestra torpeza.
49तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमच्या अमंगळ मूर्तींची पूजा केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. मग तुम्हाला मीच परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.”
49Y sobre vosotras pondrán vuestra obscenidad, y llevaréis los pecados de vuestros ídolos; y sabréis que yo soy el Señor Jehová.