Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Ezekiel

25

1मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला,
1Y FUÉ á mí palabra de Jehová, diciendo:
2“मानवपुत्रा, अम्मोनच्या लोकांकडे पाहा आणि माझ्यावतीने त्यांच्याशी बोल.
2Hijo del hombre, pon tu rostro hacia los hijos de Ammón, y profetiza sobre ellos.
3त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुध्द होता.
3Y dirás á los hijos de Ammón: Oid palabra del Señor Jehová: Así ha dicho el Señor Jehová: Por cuanto dijiste ­Ea! acerca de mi santuario que fué profanado, y sobre la tierra de Israel que fué asolada, y sobre la casa de Judá, porque fueron en cautiverio;
4म्हणून मी तुम्हाला पूर्वेकडच्या लोकांच्या ताब्यात देईन. ते तुमची जमीन घेतील. तुमच्या देशात त्यांचे सैन्य तळ ठोकेल. ते तुमच्यामध्ये राहतील. ते तुमचे अन्न व दूध भक्षण करतील.
4Por tanto, he aquí, yo te entrego á los Orientales por heredad, y pondrán en ti sus apriscos, y colocarán en ti sus tiendas: ellos comerán tus sementeras, y beberán tu leche.
5“मी राब्बा शहराचे उंटासाठी कुरण करीन व अम्मोन देशाला मेंढ्यांचा कोंडवाडा करीन. मगच तुम्हाला समजेल की मीच देव आहे.
5Y pondré á Rabba por habitación de camellos, y á los hijos de Ammón por majada de ovejas; y sabréis que yo soy Jehová.
6परमेश्वर असे म्हणतो, की यरुशलेमचा नाश झाला म्हणून तुम्हाला आनंद झाला. तुम्ही टाळ्या पिटल्यात व थै थै नाचलात. इस्राएलच्या अपमानाची तुम्हाला मजा वाटली.
6Porque así ha dicho el Señor Jehová: Por cuanto tú batiste tus manos, y pateaste, y te gozaste del alma en todo tu menosprecio sobre la tierra de Israel;
7म्हणून मी तुम्हाला शिक्षा करीन. सैनिकांनी युद्धात लुटलेल्या अमूल्य वस्तूंप्रमाणे तुम्ही व्हाल. तुम्ही तुमचा वारस गमवाल. तुम्ही दूरदेशी मराल. मी तुमच्या देशाचा नाश करीन. मगच तुम्हाला मीच परमेश्वर आहे.! हे समजून येईल.”
7Por tanto, he aquí yo extenderé mi mano sobre ti, y te entregaré á las gentes para ser saqueada; y yo te cortaré de entre los pueblos, y te destruiré de entre las tierras: te raeré; y sabrás que yo soy Jehová.
8परमेश्वर, माझा प्रभू पुढीलप्रमाणे गोष्टी सांगतो: “मवाब व सेईर (अदोम) म्हणतात ‘यहूदा इतर राष्ट्रांप्रमाणेच आहे.’
8Así ha dicho el Señor Jehová: Por cuanto dijo Moab y Seir: He aquí la casa de Judá es como todas las gentes;
9मी मवाबचा खांदा कापीन. देशाला भूषणावह असलेली बेथ-यशिमोथ, बाल-मौन, किर्याथाईम ही सीमेवरची शहरे मी काढून घेईन.
9Por tanto, he aquí yo abro el lado de Moab desde las ciudades, desde sus ciudades que están en su confín, las tierras deseables de Beth-jesi-moth, y Baal-meón, y Chîriathaim,
10मग ही शहरे मी पूर्वेच्या लोकांना देईन. त्यांना तुमची भूमी मिळेल. मी त्यांना अम्मोनच्या लोकांचा नाश करु देईल. अम्मोन हे एक राष्ट्र होते, ह्याचा लोकांना विसर पडेल.
10A los hijos del oriente contra los hijos de Ammón; y entregaréla por heredad para que no haya más memoria de los hijos de Ammón entre las gentes.
11मी मवाबला शिक्षा करीन. मग त्यांना मीच परमेश्वर आहे. हे कळेल.”
11También en Moab haré juicios; y sabrán que yo soy Jehová.
12परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “अदोमचे लोक यहूदाच्या लोकांच्याविरुद्ध गेले आणि त्यांनी त्यांचा सूड घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून अदोमचे लोक अपराधी आहेत.”
12Así ha dicho el Señor Jehová: Por lo que hizo Edom tomando venganza de la casa de Judá, pues delinquieron en extremo, y se vengaron de ellos;
13म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.
13Por tanto, así ha dicho el Señor Jehová: Yo también extenderé mi mano sobre Edom, y talaré de ella hombres y bestias, y la asolaré: desde Temán y Dedán caerán á cuchillo.
14मी माझ्या लोकांच्या, इस्राएलच्या हातून, अदोमचा सूड उगवीन. अशा रीतीने, माझा अदोमवरचा राग इस्राएलचे लोक दाखवून देतील. मग मी अदोमला शिक्षा केल्याचे अदोमच्या लोकांना कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14Y pondré mi venganza en Edom por la mano de mi pueblo Israel; y harán en Edom según mi enojo y según mi ira: y conocerán mi venganza, dice el Señor Jehová.
15परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.”
15Así ha dicho el Señor Jehová: Por lo que hicieron los Palestinos con venganza, cuando se vengaron con despecho de ánimo, destruyendo por antiguas enemistades;
16म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “मी पलिष्ट्यांना शिक्षा करीन. हो! करथच्या लोकांचा मी नाश करीन. समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांचा मी संपूर्ण नाश करीन.
16Por tanto, así ha dicho Jehová: He aquí yo extiendo mi mano sobre los Palestinos, y talaré los Ceretheos, y destruiré el resto de la ribera de la mar.
17मी त्या लोकांना शिक्षा करीन. मी सूड घेईन. माझ्या रागाने मी त्यांना धडा शिकवीन. मग त्यांना ‘मीच परमेश्वर असल्याचे कळेल.”
17Y haré en ellos grandes venganzas con reprensiones de ira; y sabrán que yo soy Jehová, cuando diere mi venganza en ellos.