1परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला,
1Y ACONTECIO en el año undécimo, en el mes tercero, al primero del mes, que fué á mí palabra de Jehová, diciendo:
2“मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग: “मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
2Hijo del hombre, di á Faraón rey de Egipto, y á su pueblo: ¿A quién te comparaste en tu grandeza?
3अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
3He aquí era el Asirio cedro en el Líbano, hermoso en ramas, y umbroso con sus ramos, y de grande altura, y su copa estaba entre densas ramas.
4पाण्यामुळे वृक्ष वाढला. नदीमुळे तो उंच झाला. वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या. त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.
4Las aguas lo hicieron crecer, encumbrólo el abismo: sus ríos iban alrededor de su pie, y á todos los árboles del campo enviaba sus corrientes.
5म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता. त्यांला खूप फांद्या फुटल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने, त्याच्या फांद्या विस्तारल्या.
5Por tanto, se encumbró su altura sobre todos los árboles del campo, y multiplicáronse sus ramos, y á causa de las muchas aguas se alargaron sus ramas que había echado.
6सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये आपली घरटी बांधली. त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई. त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात.
6En sus ramas hacían nido todas las aves del cielo, y debajo de su ramaje parían todas las bestias del campo, y á su sombra habitaban muchas gentes.
7वृक्ष फारच सुंदर होता. त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने त्याचा विस्तार मोठा झाला, त्याच्या फांद्या लांब झाल्या.
7Hízose, pues, hermoso en su grandeza con la extensión de sus ramas; porque su raíz estaba junto á muchas aguas.
8देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा एवढ्या फांद्या नव्हत्या देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या, अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या. देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष, ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
8Los cedros no lo cubrieron en el huerto de Dios: las hayas no fueron semejantes á sus ramas, ni los castaños fueron semejantes á sus ramos: ningún árbol en el huerto de Dios fué semejante á él en su hermosura.
9मी त्याला खूप फांद्या देऊन सुंदर बनविले. मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.”
9Hícelo hermoso con la multitud de sus ramas; y todos los árboles de Edén, que estaban en el huerto de Dios, tuvieron de él envidia.
10मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे.
10Por tanto, así dijo el Señor Jehová: Por cuanto te encumbraste en altura, y puso su cumbre entre densas ramas, y su corazón se elevó con su altura,
11म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन.
11Yo lo entregaré en mano del fuerte de las gentes, que de cierto le manejará: por su impiedad lo he arrojado.
12राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले.
12Y le cortarán extraños, los fuertes de las gentes, y lo abandonarán: sus ramas caerán sobre los montes y por todos los valles, y por todas las arroyadas de la tierra serán quebrados sus ramos; é iránse de su sombra todos los pueblos de la tierra, y lo dej
13आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत.
13Sobre su ruina habitarán todas las aves del cielo, y sobre su ramas estarán todas las bestias del campo:
14“आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”
14Para que no se eleven en su altura los árboles todos de las aguas, ni levanten su cumbre entre las espesuras, ni en sus ramas se paren por su altura todos los que beben aguas: porque todos serán entregados á muerte, á la tierra baja, en medio de los hijos
15परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले. वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली.
15Así ha dicho el Señor Jehová: El día que descendió á la sepultura, hice hacer luto, hice cubrir por él el abismo, y detuve sus ríos, y las muchas aguas fueron detenidas: y al Líbano cubrí de tinieblas por él, y todos los árboles del campo se desmayaron.
16मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले.
16Del estruendo de su caída hice temblar las gentes, cuando les hice descender á la fosa con todos los que descienden á la sepultura; y todos los árboles de Edén escogidos, y los mejores del Líbano, todos los que beben aguas, tomaron consolación en la tierr
17हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.
17También ellos descendieron con él á la fosa, con los muertos á cuchillo, los que fueron su brazo, los que estuvieron á su sombra en medio de las gentes.
18“तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
18¿A quién te has comparado así en gloria y en grandeza entre los árboles de Edén? Pues derrribado serás con los árboles de Edén en la tierra baja: entre los incircuncisos yacerás, con los muertos á cuchillo. Este es Faraón y todo su pueblo, dice el Señor J