1“मग तुमच्या भावांना ‘तुम्ही माझे आहात’ आणि बहिणींना ‘त्याने तुमच्यावर दया केली’ असे म्हणाल.”
1DECID á vuestros hermanos, Ammi, y vuestras hermanas, Ruhama:
2“तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही व मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा.
2Pleitead con vuestra madre, pleitead; porque ella no es mi mujer, ni yo su marido; quite pues sus fornicaciones de su rostro, y sus adulterios de entre sus pechos;
3तिने जर व्यभिचार करण्याचे सोडण्यास नकार दिला तर मी तिला नग्न करीन. तिला मी तिच्या जन्माच्या वेळच्या अवस्थेप्रमाणे टाकीन. मी तिचे लोक काढून घेईन मग ती ओसाड रूक्ष वाळवंटाप्रमाणे होईल, मी तिला तहानेने मारीन.
3No sea que yo la despoje desnuda, y la haga tornar como el día en que nació, y la ponga como un desierto, y la deje como tierra seca, y la mate de sed.
4तिची मुले ही वेश्येची मुले असल्याने मला त्यांची कीव येणार नाही.
4Ni tendré misericordia de sus hijos: porque son hijos de fornicaciones.
5त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या व जैतूनेचे तेल देतील.’
5Porque su madre fornicó; la que los engendró fué avergonzada; porque dijo: Iré tras mis amantes, que me dan mi pan y mi agua, mi lana y mi lino, mi aceite y mi bebida.
6“म्हणून, मी (परमेश्वर) तुझा (इस्राएलचा) रस्ता काटे पसरवून आडवीन. मी भिंत बांधीन मग तिला मार्ग सापडू शकणार नाही.
6Por tanto, he aquí yo cerco tu camino con espinas, y la cercaré con seto, y no hallará sus caminos.
7ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’
7Y seguirá sus amantes, y no los alcanzará; buscarálos, y no los hallará. Entonces dira: Iré, y volvéreme á mi primer marido; porque mejor me iba entonces que ahora.
8“तिला धान्य, मद्य आणि तेल देणारा मीच एकमेच (परमेश्वर) आहे, हे तिला (इस्राएलला) कळले नाही. मी तिला आणखी चांदी-सोने देत राहिलो पण इस्राएली लोकांनी त्या चांदी-सोन्याचा उपयोग बआलच्या मूर्ता घडविण्याकरिता केला.
8Y ella no reconoció que yo le daba el trigo, y el vino, y el aceite, y que les multipliqué la plata y el oro con que hicieron á Baal.
9म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन.
9Por tanto yo tornaré, y tomaré mi trigo á su tiempo, y mi vino á su sazón, y quitaré mi lana y mi lino que había dado para cubrir su desnudez.
10आता मी तिला उघडी करीन. ती नग्न होईल व तिचे सर्व प्रियकर तिला पाहू शकणार नाही.
10Y ahora descubriré yo su locura delante de los ojos de sus amantes, y nadie la librará de mi mano.
11मी तिचा सर्व आनंद नष्ट करीन. तिच्या सुट्या तिच्या अमावस्येच्या मेजवान्या व विश्रांतीचे दिवस मी काढून घेईन. तिच्या खास मेजवान्या मी बंद करीन.
11Y haré cesar todo su gozo, sus fiestas, sus nuevas lunas y sus sábados, y todas sus festividades.
12मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.
12Y haré talar sus vides y sus higueras, de que ha dicho: Mi salario me son, que me han dado mis amantes. Y reducirélas á un matorral, y las comerán las bestias del campo.
13“तिने बालाची सेवा केली, म्हणून मी तिला शिक्षा करीन. तिने त्यांच्यापुढे धूप जाळला. तिने साजशृंगार केला. तिने दागदागिने व नथनी घातली मग ती तिच्या प्रियकरांकडे गेली व मला विसरली.” परमेश्वरच असे म्हणाला:
13Y visitaré sobre ella los tiempos de los Baales, á los cuales incensaba, y adornábase de sus zarcillos y de sus joyeles, é íbase tras sus amantes olvidada de mí, dice Jehová.
14“म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.
14Empero he aquí, yo la induciré, y la llevaré al desierto, y hablaré á su corazón.
15तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.”
15Y daréle sus viñas desde allí, y el valle de Achôr por puerta de esperanza; y allí cantará como en los tiempos de su juventud, y como en el día de su subida de la tierra de Egipto.
16परमेश्वरच असे म्हणतो. “त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआल असे म्हणणार नाहीस.
16Y será que en aquel tiempo, dice Jehová, me llamarás Marido mío, y nunca más me llamarás Baali.
17मी तिच्या तोंडातून बालाचे नाव काढून टाकीन. मग लोक कधीही बालाचे नाव घेणार नाहीत.
17Porque quitaré de su boca los nombres de los Baales, y nunca más serán mentados por sus nombres.
18“त्या वेळेला, मी इस्राएली लोकांसाठी रानातल्या प्राण्यांबरोबर, आकाशातील पक्ष्यांबरोबर आणि जमिनीवर सरपटणाव्या प्राण्यांबरोबर एक करार करीन. मी धनुष्य तलवार व युध्दात वापरण्यात येणारी शस्त्रे मोडून टाकीन. त्या देशात एकही शस्त्र राहणार नाही. मी देश सुरक्षित करीन, त्यामुळे इस्राएलचे लोक शांतीने झोप घेतील.
18Y haré por ellos concierto en aquel tiempo con las bestias del campo, y con las aves del cielo, y con las serpientes de la tierra: y quebraré arco, y espada, y batalla de la tierra, y harélos dormir seguros.
19आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.
19Y te desposaré conmigo para siempre; desposarte he conmigo en justicia, y juicio, y misericordia, y miseraciones.
20मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.
20Y te desposaré conmigo en fe, y conocerás á Jehová.
21मी त्या वेळेला प्रत्युत्तर देईन.” परमेश्वर असे म्हणतो. “मी आकाशाशी बोलेन व तो पृथ्वीवर पाऊस पाडील.
21Y será que en aquel tiempo responderé, dice Jehová, yo responderé á los cielos, y ellos responderán á la tierra;
22भूमी धान्य, मद्य व तेल देईल.त्यामुळे इज्रेलच्या गरजा भागतील.
22Y la tierra responderá al trigo, y al vino, y al aceite, y ellos responderán á Jezreel.
23तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज पेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
23Y sembraréla para mí en la tierra, y tendré misericordia de Lo-ruhama: y diré á Lo-ammi: Pueblo mío tú; y él dirá: Dios mío.