1“मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
1ESTANDO yo curando á Israel, descubrióse la iniquidad de Ephraim, y las maldades de Samaria; porque obraron engaño: y viene el ladrón, y el salteador despoja de fuera.
2मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही. त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत. मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
2Y no dicen en su corazón que tengo en la memoria toda su maldad: ahora los rodearán sus obras; delante de mí están.
3त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात. त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.
3Con su maldad alegran al rey, y á los príncipes con sus mentiras.
4रोटीवाला रोट्या बनविण्यासाठी कणीक मळतो तो रोटी भट्टीत ठेवतो रोटी फुगत असताना तो आच मोठी ठेवत नाही. पण इस्राएलचे लोक तसे नाहीत. ते त्यांची आच नेहमीच मोठी ठेवतात.
4Todos ellos adúlteros; son como horno encendido por el hornero, el cual cesará de avivar después que esté hecha la masa, hasta que esté leuda.
5आमच्या राजाच्या दिवशी, ते आच जास्त मोठी करतात. ते पेयांच्या मेजवान्या देतात. मद्याच्या गरमीने नेत्यांना मळमळते. मग राजाही परमेश्वराच्या निंदकांत सामील होतो.
5El día de nuestro rey los príncipes lo hicieron enfermar con vasos de vino: extendió su mano con los escarnecedores.
6लोक कट रचतात. त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात. त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते. आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
6Porque aplicaron su corazón, semejante á un horno, á sus artificios: toda la noche duerme su hornero; á la mañana está encendido como llama de fuego.
7ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत. त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला. त्यांचे सर्व राजे पडले पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”
7Todos ellos arden como un horno, y devoraron á sus jueces: cayeron todos sus reyes: no hay entre ellos quien á mí clame.
8“एफ्राईम राष्ट्राबरोबर मिसळतो तो दोन्हीकडून न भाजलेल्या भाकरीप्रमाणे आहे.
8Ephraim se envolvió con los pueblos; Ephraim fué torta no vuelta.
9परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात. पण एफ्राईमला ते कळत नाही. त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत. पण ते त्याला माहीत नाही.
9Comieron extraños su sustancia, y él no lo supo; y aun vejez se ha esparcido por él, y él no lo entendió.
10एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत, तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत. ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
10Y la soberbia de Israel testificará contra él en su cara: y no se tornaron á Jehová su Dios, ni lo buscaron con todo esto.
11म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे. लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली. ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
11Y fué Ephraim como paloma incauta, sin entendimiento: llamarán á Egipto, acudirán al Asirio.
12ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे, पण मी त्यांना सापळ्यात पकडीन. मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन, आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
12Cuando fueren, extenderé sobre ellos mi red, hacerlos he caer como aves del cielo; castigarélos conforme á lo que se ha oído en sus congregaciones.
13ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. त्यांनी माझा त्याग केला. त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल. मी त्या लोकांचे रक्षण केले. पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
13Ay de ellos! porque se apartaron de mí: destrucción sobre ellos, porque contra mí se rebelaron; yo los redimí, y ellos hablaron contra mí mentiras.
14मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत. हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वत:ला माझ्यापासून अलगच करतात मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
14Y no clamaron a mí con su corazón cuando aullaron sobre sus camas, para el trigo y el mosto se congregaron, rebeláronse contra mí.
15मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले. पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
15Y yo los ceñi, esforcé sus brazos, y contra mí pensaron mal.
16ते मोडक्या धनूष्याप्रमाणे आहेत. त्यांनी दिशा बदलल्या पण ते परत माझ्याकडे आले नाहीत. त्यांचे नेते त्यांच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतात. पण ते तलवारीच्या वाराने मारले जातील. मग मिसरचे लोक त्यांना हसतील.
16Tornáronse, mas no al Altísimo: fueron como arco engañoso: cayeron sus príncipes á cuchillo por la soberbia de su lengua: éste será su escarnio en la tierra de Egipto.