Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Lamentations

3

1खूप संकटे पाहिलेला मी एक माणूस आहे. परमेश्वराने आम्हाला काठीने मारताना मी प्रत्यक्ष पाहिले.
1YO soy el hombre que ha visto aflicción en la vara de su enojo.
2परमेश्वराने मला प्रकाशाकडे न नेता, अंधाराकडे नेले.
2Guióme y llevóme en tinieblas, mas no en luz.
3परमेश्वराने त्याचा हात माझ्याविरुध्द केला. दिवसभर, त्याने आपला हात, पुन्हा पुन्हा, माझ्याविरुद्ध चालविला.
3Ciertamente contra mí volvió y revolvió su mano todo el día.
4त्यांने माझी त्वचा आणि मांस नष्ट केले आणि माझी हाडे मोडली.
4Hizo envejecer mi carne y mi piel; quebrantó mis huesos.
5परमेश्वराने माझ्याभोवती दु:ख व त्रास ह्यांच्या भिंती उभारल्या. त्यांने दु:ख व त्रास माझ्याभोवती उभे केले.
5Edificó contra mí, y cercóme de tósigo y de trabajo.
6त्याने मला अंधकारात बसायला लावले. माझी स्थिती एखाद्या मृताप्रमाणे केली.
6Asentóme en oscuridades, como los ya muertos de mucho tiempo.
7परमेश्वराने मला बंदिवान केल्यामुळे मी बाहेर येऊ शकलो नाही. त्याने मला मोठमोठ्या बेड्या घातल्या.
7Cercóme por todos lados, y no puedo salir; agravó mis grillos.
8मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो, तेव्हासुध्दा परमेश्वर माझा धावा ऐकत नाही.
8Aun cuando clamé y dí voces, cerro los oídos a mi oración.
9त्याने दगडधोड्यांनी माझ्या रस्त्यात अडथळा निर्माण केला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.
9Cercó mis caminos con piedra tajada, torció mis senderos.
10परमेश्वर, माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या, अस्वलासारखा आहे. लपून बसलेल्या सिंहासारखा तो आहे.
10Como oso que acecha fué para mí, como león en escondrijos.
11परमेश्वराने मला माझ्या मार्गावरुन दूर केले. माझे तुकडे तुकडे केले. माझा नाश केला.
11Torció mis caminos, y depedazóme; tornóme asolado.
12त्याने त्याचे धनुष्य सज्ज केले. त्याने मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले.
12Su arco entesó, y púsome como blanco a la saeta.
13त्याने माझ्या पोटात बाणाने मारले.
13Hizo entrar en mis riñones las saetas de su aljaba.
14मी माझ्या माणसांमध्ये चेष्टेचा विषय झालो. सर्व दिवसभर, ते मला उद्देशून गाणी गातात व माझी टर्र उडवितात.
14Fuí escarnio á todo mi pueblo, canción de ellos todos los días.
15परमेश्वराने मला हे विष (शिक्षा) प्यायला दिले. हे कडू पेय त्याने मला भरपूर पाजले.
15Hartóme de amarguras, embriagóme de ajenjos.
16परमेश्वराने मला दाताने खडे फोडायला लावले. मला धुळीत लोटले.
16Quebróme los dientes con cascajo, cubrióme de ceniza.
17मला पुन्हा कधीही शांती मिळणार नाही, असे मला वाटले. मी चांगल्या गोष्टी तर विसरलो.
17Y mi alma se alejó de la paz, olvidéme del bien.
18मी मनाशी म्हणालो, “परमेश्वराच्या कृपेची मला मुळीच आशा नाही.”
18Y dije: Pereció mi fortaleza, y mi esperanza de Jehová.
19परमेश्वरा, लक्षात ठेव. मी फार दु:खी आहे, व मला घर नाही. तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
19Acuérdate de mi aflicción y de mi abatimiento, del ajenjo y de la hiel.
20मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी दु:खी आहे.
20Tendrálo aún en memoria mi alma, porque en mí está humillada.
21पण मी पुढील काही गोष्टींचा विचार केला की मला आशा वाटते.
21Esto reduciré á mi corazón, por lo cual esperaré.
22परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे.
22Es por la misericordia de Jehová que no somos consumidos, porque nunca decayeron sus misericordias.
23ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
23Nuevas son cada mañana; grande es tu fidelidad.
24मी मनाशी म्हणतो, “परमेश्वर माझा देव आहे. म्हणूनच मला आशा वाटेल.”
24Mi parte es Jehová, dijo mi alma; por tanto en él esperaré.
25परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.
25Bueno es Jehová á los que en él esperan, al alma que le buscare.
26परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
26Bueno es esperar callando en la salud de Jehová.
27परमेश्वराचे जोखड वाहणे केव्हाही बरेच. ते तरूणपणापासून वाहणे तर फारच चांगले.
27Bueno es al hombre, si llevare el yugo desde su mocedad.
28परमेश्वर त्याचे जोखड मानेवर ठेवत असताना माणसाने मुकाट्याने एकटे बसावे.
28Sentaráse solo, y callará, porque lo llevó sobre sí.
29माणसाने परमेश्वरापुढे नतमस्तक व्हावे. कोणी सांगावे, अजूनही आशा असेल.
29Pondrá su boca en el polvo, por si quizá hay esperanza.
30जो मणुष्य मारत असेल त्याला खुशाल गालात मारू द्यावे व तो अपमान सहन करूण घ्यावा.
30Dará la mejilla al que le hiriere; hartaráse de afrenta.
31परमेश्वर लोकांकडे कायमची पाठ फिरवित नाही, हे माणसाने लक्षात ठेवावे.
31Porque el Señor no desechará para siempre:
32परमेश्वर जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा तो दया पण दाखवितो. हा त्याचा दयाळूपणा त्याच्या जवळील महान प्रेम व थोर करुणा ह्यामुळे आहे.
32Antes si afligiere, también se compadecerá según la multitud de sus misericordias.
33लोकांना शिक्षा करण्याची देवाची इच्छा नसते. लोकांना दु:ख द्यायला त्याला आवडत नाही.
33Porque no aflige ni congoja de su corazón á los hijos de los hombres.
34परमेश्वराला ह्या गोष्टी पसंत नाहीत. पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना कोणीतरी पायाखाली तुडविणे, त्याला आवडत नाही.
34Desmenuzar bajo de sus pies todos los encarcelados de la tierra,
35एका माणसाने दुसऱ्याशी अन्यायाने वागणे त्याला पसंत नाही. पण काही लोक अशा वाईट गोष्टी सर्वश्रेष्ठ ईश्वारासमक्ष करतात.
35Hacer apartar el derecho del hombre ante la presencia del Altísimo,
36एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिला फसविणे परमेश्वराला आवडत नाही. ह्या अशा गोष्टी परमेश्वराला अजिबात पसंत नाहीत.
36Trastornar al hombre en su causa, el Señor no lo sabe.
37परमेश्वराच्या आज्ञेशिवाय, कोणी काहीही बोलावे आणि ते घडून यावे असे होऊ शकत नाही.
37¿Quién será aquel que diga, que vino algo que el Señor no mandó?
38सर्वश्रेष्ठ देवच इष्ट वा अनिष्ट घडण्याची आज्ञा देतो.
38¿De la boca del Altísimo no saldrá malo y bueno?
39एखाद्याच्या पापांबद्दल परमेश्वराने त्याला शिक्षा केल्यास तो माणूस तक्रार करू शकत नाही.
39¿Por qué murmura el hombre viviente, el hombre en su pecado?
40आपण आपली कर्मे पाहू या आणि तपासू या व नंतर परमेश्वराकडे परत जाऊ या.
40Escudriñemos nuestros caminos, y busquemos, y volvámonos a Jehová.
41स्वर्गातील परमेश्वराकडे आपण आपले हृदय व हात उंचावू या.
41Levantemos nuestros corazones con las manos a Dios en los cielos.
42आपण त्याला म्हणू या, “आम्ही पाप केले, आम्ही हट्टीपणा केला. म्हणूनच तू आम्हाला क्षमा केली नाहीस.
42Nosotros nos hemos rebelado, y fuimos desleales; tú no perdonaste.
43तू क्रोधाविष्ट झालास आमचा पाठलाग केलास आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.
43Desplegaste la ira, y nos perseguiste; mataste, no perdonaste.
44कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वत:ला अभ्रांनी वेढून घेतलेस.
44Te cubriste de nube, porque no pasase la oración nuestra.
45दुसऱ्या राष्ट्रांसमोर तू आम्हाला कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.
45Raedura y abominación nos tornaste en medio de los pueblos.
46आमचे सर्व शत्रू आम्हाला रागाने बोलतात.
46Todos nuestros enemigos abrieron sobre nosotros su boca.
47आम्ही घाबरलो आहोत. आम्ही गर्तेत पडलो आहोत. आम्ही अतिशय जखमी झालो आहोत. आम्ही मोडून पडलो आहोत.”
47Temor y lazo fué para nosotros, asolamiento y quebrantamiento.
48माझ्या लोकांचा झालेला नाश पाहून मी रडते. माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.
48Ríos de aguas echan mis ojos, por el quebrantamiento de la hija de mi pueblo.
49माझे डोळे गळतच राहतील, मी रडतच राहीन.
49Mis ojos destilan, y no cesan, porque no hay alivio,
50परमेश्वरा, तू आपली नजर खाली वळवून आमच्याकडे पाही पर्यंत मी रडतच राहीन. तू स्वर्गातून आमच्याकडे लक्ष देईपर्यंत मी शोक करीन.
50Hasta que Jehová mire y vea desde los cielos.
51माझ्या नगरातील सर्व मुलींची स्थिती पाहून माझे डोळे मला दु:खी करतात.
51Mis ojos contristaron mi alma, por todas las hijas de mi ciudad.
52निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखी माझी शिकार केली आहे.
52Mis enemigos me dieron caza como á ave, sin por qué.
53मी जिवंत असताना त्यांनी मला खड्ड्यात लोटले आणि माझ्यावर दगड टाकले.
53Ataron mi vida en mazmorra, pusieron piedra sobre mí.
54माझ्या डोक्यावरुन पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता सर्व संपले.”
54Aguas de avenida vinieron sobre mi cabeza; yo dije: Muerto soy.
55परमेश्रा मी तुझ्या नांवाने हाक मारली परमेश्वरा, खड्ड्यातून तुझ्या नांवाचा धावा केला.
55Invoqué tu nombre, oh Jehová, desde la cárcel profunda.
56तू माझा आवाज ऐकलास. तू तुझ्या कानावर हात ठेवले नाहीस. माझी सुटका करण्याचे तू नाकारले नाहीस.
56Oiste mi voz; no escondas tu oído á mi clamor, para mi respiro
57मी धावा करताच तू आलास. तू मला म्हणालास, “घाबरू नकोस.”
57Acercástete el día que te invoqué: dijiste: No temas.
58परमेश्वरा, तू माझे रक्षण केलेस तू मला पुनर्जीवन दिलेस.
58Abogaste, Señor, la causa de mi alma; redimiste mi vida.
59परमेश्वरा, तू माझा त्रास पाहिला आहेस. आता मला न्याय दे.
59Tú has visto, oh Jehová, mi agravio; defiende mi causa.
60माझ्या शत्रूंनी मला कसे दुखविले आणि माझ्याविरुद्ध कसे कट रचले ते तू पाहिले आहेस.
60Tú has visto toda su venganza; todos sus pensamientos contra mí.
61त्या शत्रूंनी केलेला माझा अपमान आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत तू. परमेश्वरा, ऐकले आहेस.
61Tú has oído el oprobio de ellos, oh Jehová, todas sus maquinaciones contra mí;
62सर्व काळ, शंत्रूचे बोलणे व विचार माझ्या विरुध्द आहेत.
62Los dichos de los que contra mí se levantaron, y su designio contra mí todo el día.
63परमेश्वरा, बसता उठता ते माझी कशी खिल्ली उडवितातत ते पाहा.
63Su sentarse, y su levantarse mira: yo soy su canción.
64परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परत फेड कर.
64Dales el pago, oh Jehová, según la obra de sus manos.
65त्यांचे मन कठोर कर. नंतर त्यांना शाप दे.
65Dales ansia de corazón, tu maldición á ellos.
66क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर. ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.
66Persíguelos en tu furor, y quebrántalos de debajo de los cielos, oh Jehová.