1परमेश्वरा, आमचे काय झाले ते लक्षात ठेव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
1ACUÉRDATE, oh Jehová, de lo que nos ha sucedido: Ve y mira nuestro oprobio.
2आमचा देश परक्यांच्या हातात गेला आहे. आमची घरे परदेशीयांना दिली गेली आहेत.
2Nuestra heredad se ha vuelto á extraños, Nuestras casas á forasteros.
3आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.
3Huérfanos somos sin padre, Nuestras madres como viudas.
4आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. आम्ही वापरत असलेल्या लाकडाला पैसे मोजावे लागतात.
4Nuestra agua bebemos por dinero; Nuestra leña por precio compramos.
5आमच्या मानेवर सक्तीने जोखड ठेवले जाते. आम्ही दमून जातो. पण आम्हाला विश्रांती नाही.
5Persecución padecemos sobre nuestra cerviz: Nos cansamos, y no hay para nosotros reposo.
6पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्याबरोबर करार केला.
6Al Egipcio y al Asirio dimos la mano, para saciarnos de pan.
7आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत. पण त्यांच्या पापाची फळे आता आम्ही भोगत आहोत.
7Nuestros padres pecaron, y son muertos; Y nosotros llevamos sus castigos.
8गुलाम आमचे राज्यकर्ते झाले. त्यांच्यापासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही.
8Siervos se enseñorearon de nosotros; No hubo quien de su mano nos librase.
9[This verse may not be a part of this translation]
9Con peligro de nuestras vidas traíamos nuestro pan Delante del cuchillo del desierto.
10आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत. भुकेमुळे आम्हाला ताप चढला आहे.
10Nuestra piel se ennegreció como un horno A causa del ardor del hambre.
11शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.
11Violaron á las mujeres en Sión, A las vírgenes en las ciudades de Judá.
12शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली. त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.
12A los príncipes colgaron por su mano; No respetaron el rostro de los viejos.
13आमच्या तरुणांना शत्रूने गिरणीत धान्य दळायला लावले. ते तरुण लाकडाच्या ढिगाऱ्याखाली अडखळले.
13Llevaron los mozos á moler, Y los muchachos desfallecieron en la leña.
14वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
14Los ancianos cesaron de la puerta, Los mancebos de sus canciones.
15आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.
15Cesó el gozo de nuestro corazón; Nuestro corro se tornó en luto.
16आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आणि वाईट गोष्टी घडल्या.
16Cayó la corona de nuestra cabeza: Ay ahora de nosotros! porque pecamos.
17ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.
17Por esto fué entristecido nuestro corazón, Por esto se entenebrecieron nuestro ojos:
18सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत. सियोनच्या डोंगरावर कोल्हे वावरतात.
18Por el monte de Sión que está asolado; Zorras andan en él.
19पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
19Mas tú, Jehová, permanecerás para siempre: Tu trono de generación en generación.
20परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.
20¿Por qué te olvidarás para siempre de nosotros, Y nos dejarás por largos días?
21परमेश्वरा, आम्हाला तुझ्याकडे परत ने. आम्ही आनंदाने तुझ्याकडे येऊ. आमचे जीवन पूर्वीसारखे कर.
21Vuélvenos, oh Jehová, á ti, y nos volveremos: Renueva nuestros días como al principio.
22तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?
22Porque repeliendo nos has desechado; Te has airado contra nosotros en gran manera.