1बलशाली नगरी, आता तुझे सैनिक गोळा कर. ते आपल्यावर हल्ला करण्यासाठी सभोवती जमा होत आहेत. ते आपल्या काठीने इस्राएलच्या न्यायाधीशाच्या गालावर प्रहार करतील.
1REUNETE ahora en bandas, oh hija de bandas: nos han sitiado: con vara herirán sobre la quijada al juez de Israel.
2बेथलहेम एफ्राथा, तू यहूदातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे. पण “इस्राएलचा राज्याकर्ता” माझ्यासाठी तुझ्यातून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून, झाला आहे.
2Mas tú, Beth-lehem Ephrata, pequeña para ser en los millares de Judá, de ti me saldrá el que será Señor en Israel; y sus salidas son desde el principio, desde los días del siglo.
3परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल. स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत. मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
3Empero los dejará hasta el tiempo que para la que ha de parir; y el resto de sus hermanos se tornará con los hijos de Israel.
4त्यानंतर इस्राएलचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील. त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारीक नांवाल उभा राहील आणि कळपाला चारील. ते शांतीने राहातील. का? कारण त्या वेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल.
4Y estará, y apacentará con fortaleza de Jehová, con grandeza del nombre de Jehová su Dios: y asentarán; porque ahora será engrandecido hasta los fines de la tierra.
5मग शांती नांदेल. हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल. आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील. पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ आणि आठ नेते निवडील.
5Y éste será nuestra paz. Cuando Assur viniere á nuestra tierra, y cuando pisare nuestros palacios, entonces levantaremos contra él siete pastores, y ocho hombres principales;
6ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील. निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील. ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील. पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील. ते लोक आमच्या देशात येतील व आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.
6Y comerán la tierra de Assur á cuchillo, y la tierra de Nimrod con sus espadas: y nos librará del Asirio, cuando viniere contra nuestra tierra y hollare nuestros términos.
7मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील. कोणासाठी पण न थांबणाऱ्या गवतावरच्या सरीप्रमाणे ते असतील.
7Y será el residuo de Jacob en medio de muchos pueblos, como el rocío de Jehová, como las lluvias sobre la hierba, las cuales no esperan varón, ni aguardan á hijos de hombres.
8पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील. मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला, तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो. त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही. वाचलेले लोक असेच असतील.
8Asimismo será el resto de Jacob entre las gentes, en medio de muchos pueblos, como el león entre las bestias de la montaña, como el cachorro del león entre las manadas de las ovejas, el cual si pasare, y hollare, y arrebatare, no hay quien escape.
9तुम्ही तुमच्या शत्रूंवर हात उचलाल आणि त्यांचा नाश कराल.
9Tu mano se alzará sobre tus enemigos, y todos tus adversarios serán talados.
10परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, मी तुमचे घोडे काढून घेईन. तुमचे रथ नष्ट करीन.
10Y acontecerá en aquel día, dice Jehová, que haré matar tus caballos de en medio de ti, y haré destruir tus carros.
11तुमच्या देशातील गावांचा मी नाश करीन. तुमचे सर्व किल्ले मी पाडून टाकीन.
11Haré también destruir las ciudades de tu tierra, y arruinaré todas tus fortalezas.
12तुम्ही यापुढे जादूटोणा करण्याचा प्रयत्न करणार नाही. तुमच्यात यापुढे भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणारे नसतील.
12Asimismo destruiré de tu mano las hechicerías, y no se hallarán en ti agoreros.
13मी तुमच्या खोट्या देवाच्या मूर्ती नष्ट करीन. त्या खोट्या देवांचे स्मारकस्तंभ मी पाडून टाकीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
13Y haré destruir tus esculturas y tus imágenes de en medio de ti, y nunca más te inclinarás á la obra de tus manos;
14अशेराच्या पूजास्तंभांचा मी नाश करीन. मी तुमच्या खोट्या देवांचा नाश करीन.
14Y arrancaré tus bosques de en medio de ti, y destruiré tus ciudades.
15काही लोक माझे ऐकणार नाहीत. पण मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करीन. मी त्यांचे उट्टे काढीन.”
15Y con ira y con furor haré venganza en las gentes que no escucharon.