Marathi

Spanish: Reina Valera (1909)

Psalms

145

1देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो.
1Salmo de alabanza: de David. ENSALZARTE he, mi Dios, mi Rey; Y bendeciré tu nombre por siglo y para siempre.
2मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो.
2Cada día te bendeciré, Y alabaré tu nombre por siglo y para siempre.
3परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.
3Grande es Jehová y digno de suprema alabanza: Y su grandeza es inescrutable.
4परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील.
4Generación á generación narrará tus obras, Y anunciarán tus valentías.
5तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.
5La hermosura de la gloria de tu magnificencia, Y tus hechos maravillosos, hablaré.
6परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन.
6Y la terribilidad de tus valentías dirán los hombres; Y yo recontaré tu grandeza.
7तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
7Reproducirán la memoria de la muchedumbre de tu bondad, Y cantarán tu justicia.
8परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.
8Clemente y misericordioso es Jehová, Lento para la ira, y grande en misericordia.
9परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
9Bueno es Jehová para con todos; Y sus misericordia sobre todas sus obras.
10परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
10Alábente, oh Jehová, todas tus obras; Y tus santos te bendigan.
11तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात.
11La gloria de tu reino digan, Y hablen de tu fortaleza;
12म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते.
12Para notificar á los hijos de los hombre sus valentías, Y la gloria de la magnificencia de su reino.
13परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.
13Tu reino es reino de todos los siglos, Y tu señorío en toda generación y generación.
14जे लोक खाली पडले आहेत त्यांना परमेश्वर उचलतो. जे लोक संकटात आहेत त्यांना परमेश्वर मदत करतो.
14Sostiene Jehová á todos los que caen, Y levanta á todos los oprimidos.
15परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.
15Los ojos de todos esperan en ti, Y tú les das su comida en su tiempo.
16परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.
16Abres tu mano, Y colmas de bendición á todo viviente.
17परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते.
17Justo es Jehová en todos sus caminos, Y misericordioso en todas sus obras.
18जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.
18Cercano está Jehová á todos los que le invocan, A todos los que le invocan de veras.
19भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.
19Cumplirá el deseo de los que le temen; Oirá asimismo el clamor de ellos, y los salvará.
20जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
20Jehová guarda á todos los que le aman; Empero destruirá á todos los impíos.
21मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
21La alabanza de Jehová hablará mi boca; Y bendiga toda carne su santo nombre por siglo y para siempre.