1परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस. असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
1Боже од освете, Господе, Боже од освете, покажи се!
2तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस. गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.
2Подигни се, судијо земаљски, подај заслугу охолима.
3परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत? परमेश्वरा किती काळ?
3Докле ће се безбожници, Господе, докле ће се безбожници хвалити?
4आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत?
4Руже и охоло говоре, величају се сви који чине безакоње.
5परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात. त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
5Газе народ Твој, Господе, и достојање Твоје муче.
6ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात. ते अनाथ मुलांचा खून करतात.
6Удовицу и дошљака убијају, и сироте море.
7आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही. ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.
7И говоре: Неће видети Господ, и неће дознати Бог Јаковљев.
8तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात. तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार? तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात! तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
8Оразумите се, прелуди људи! Будале! Кад ћете бити паметни?
9देवानेच आपले कान केलेत तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो. देवानेच आपले डोळे केलेत. तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
9Који је створио ухо, зар не чује? И који је око начинио, зар не види?
10देव त्या लोकांना शिस्त लावेल. देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
10Зар неће обличити који народе уразумљује, који учи човека да зна?
11लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते. लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.
11Господ зна мисли људима како су ништаве.
12परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल. देव त्या माणसाल जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
12Благо човеку кога Ти, Господе, уразумљујеш, и законом својим учиш;
13देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील. तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील.
13Да би му дао мир у зле дане, док се ископа јама безбожнику.
14परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही. तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
14Јер неће одбацити Господ народ свој, и достојање своје неће оставити.
15न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.
15Јер ће се суд вратити на правду, у њега ће наћи сви правог срца.
16वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही. वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
16Ко ће устати за мене супрот злима? Ко ће стати за мене супрот онима који чине безакоње?
17आणि जर परमेश्वराने मला मदत केली नसतीतर मी मेलो असतो.
17Кад ми Господ не би био помоћник, брзо би се душа моја преселила онамо где се ћути.
18मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे, पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.
18Кад кажем: Дрхће ми нога, милост Твоја, Господе, прихвата ме.
19मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो. परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस.
19Кад се умноже бриге у срцу мом, утехе Твоје разговарају душу моју.
20देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस. ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
20Еда ли ће се близу Тебе стати престо крвнички, и онај који намишља насиље насупрот закону?
21ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात. ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
21Спремају се на душу праведникову, и крв праву окривљују.
22परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे. देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
22Али је Господ моје пристаниште, и Бог је мој тврдо уточиште моје.
23देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल. त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल. परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.
23Он ће им вратити за безакоње њихово, за њихову злоћу истребиће их, истребиће их Господ, Бог наш.