Marathi

Syriac: NT

1 John

2

1माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तर पित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे.
1ܒܢܝ ܗܠܝܢ ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܕܠܐ ܬܚܛܘܢ ܘܐܢ ܐܢܫ ܢܚܛܐ ܐܝܬ ܠܢ ܦܪܩܠܛܐ ܠܘܬ ܐܒܐ ܝܫܘܥ ܡܫܝܚܐ ܙܕܝܩܐ ܀
2तो अर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.
2ܗܘܝܘ ܓܝܪ ܚܘܤܝܐ ܕܥܠ ܐܦܝ ܚܛܗܝܢ ܘܠܘ ܚܠܦܝܢ ܕܝܠܢ ܒܠܚܘܕ ܐܠܐ ܐܦ ܚܠܦ ܟܠܗ ܥܠܡܐ ܀
3जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर हाच मार्ग आहे ज्याविषयी आम्हाला खात्री आहे की, आम्ही देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे.
3ܘܒܗܕܐ ܡܪܓܫܝܢܢ ܕܝܕܥܢܝܗܝ ܐܢ ܢܛܪܝܢܢ ܦܘܩܕܢܘܗܝ ܀
4जो असे म्हणतो की, “मी देवाला ओळखतो!” आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो लबाड आहे; आणि त्याच्यामध्ये सत्य नाही.
4ܗܘ ܓܝܪ ܕܐܡܪ ܕܝܕܥܬܗ ܘܦܘܩܕܢܘܗܝ ܠܐ ܢܛܪ ܕܓܠܐ ܗܘ ܘܫܪܪܐ ܠܝܬ ܒܗ ܀
5पण जर कोणी देवाची शिकवण पाळतो, तर देवाविषयीचे त्याचे प्रेम त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. हाच मार्ग आहे ज्याद्वारे आम्ही खात्री बाळगू शकतो की, आम्ही देवामध्ये आहोत.
5ܗܘ ܕܝܢ ܕܢܛܪ ܡܠܬܗ ܒܗܢܐ ܡܫܠܡ ܫܪܝܪܐܝܬ ܚܘܒܗ ܕܐܠܗܐ ܒܗܕܐ ܓܝܪ ܝܕܥܝܢܢ ܕܒܗ ܚܢܢ ܀
6मी देवामध्ये राहतो असे जो म्हणतो, त्याने जसा येशू जगला तसे जगले पाहिजे.
6ܗܘ ܕܐܡܪ ܕܒܗ ܐܝܬܝ ܘܠܐ ܠܗ ܕܐܝܟ ܗܠܟܬܗ ܕܝܠܗ ܢܗܠܟ ܀
7प्रिय मित्रांनो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही तर जुनीच आज्ञा लिहीत आहे, जी तुम्हांला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती.
7ܚܒܝܒܝ ܠܘ ܦܘܩܕܢܐ ܚܕܬܐ ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܐܠܐ ܦܘܩܕܢܐ ܥܬܝܩܐ ܗܘ ܕܐܝܬ ܗܘܐ ܠܟܘܢ ܡܢ ܒܪܫܝܬ ܦܘܩܕܢܐ ܕܝܢ ܥܬܝܩܐ ܐܝܬܘܗܝ ܡܠܬܐ ܗܝ ܕܫܡܥܬܘܢ ܀
8ती जुनी आज्ञा म्हणजे जो संदेश तुम्ही ऐकला आहे तीच आज्ञा आहे. शिवाय नवीन आज्ञेप्रमाणे मी तिजविषयी लिहीतो कारण या गोष्टीविषयीचे सत्य ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनामध्ये दर्शविण्यात आली. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे.
8ܬܘܒ ܦܘܩܕܢܐ ܚܕܬܐ ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܗܘ ܕܐܝܬܘܗܝ ܫܪܝܪܐ ܒܗ ܘܒܟܘܢ ܕܚܫܘܟܐ ܥܒܪ ܠܗ ܘܢܘܗܪܐ ܫܪܝܪܐ ܫܪܝ ܡܬܚܙܐ ܀
9जो असे म्हणतो की तो प्रकाशात आहे आणि तरीही आपल्या भावाचा द्वेष करतो तो अजूनसुद्धा अंधारात आहे.
9ܡܢ ܕܐܡܪ ܗܟܝܠ ܕܐܝܬܘܗܝ ܒܢܘܗܪܐ ܘܤܢܐ ܠܐܚܘܗܝ ܒܚܫܘܟܐ ܐܝܬܘܗܝ ܥܕܡܐ ܠܗܫܐ ܀
10जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशाता राहतो, आणि त्याच्या जीवनामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसते, जी एखाद्याला पापात पडण्यास भाग पाडते.
10ܗܘ ܕܝܢ ܕܡܚܒ ܠܐܚܘܗܝ ܒܢܘܗܪܐ ܡܟܬܪ ܘܟܫܠܐ ܠܝܬ ܒܗ ܀
11पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्याला कळत नाही. कारण अंधारामुळे तो आंधळा झालेला आहे.
11ܗܘ ܕܝܢ ܕܤܢܐ ܠܐܚܘܗܝ ܒܚܫܘܟܐ ܐܝܬܘܗܝ ܘܒܚܫܘܟܐ ܡܗܠܟ ܘܠܐ ܝܕܥ ܠܐܝܟܐ ܐܙܠ ܡܛܠ ܕܚܫܘܟܐ ܤܡܝ ܐܢܝܢ ܥܝܢܘܗܝ ܀
12प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
12ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܒܢܝܐ ܕܐܫܬܒܩܘ ܠܟܘܢ ܚܛܗܝܟܘܢ ܡܛܠ ܫܡܗ ܀
13वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
13ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܐܒܗܐ ܕܝܕܥܬܘܢܝܗܝ ܠܗܘ ܕܐܝܬܘܗܝ ܗܘܐ ܡܢ ܒܪܫܝܬ ܟܬܒ ܐܢܐ ܠܟܘܢ ܥܠܝܡܐ ܕܙܟܝܬܘܢܝܗܝ ܠܒܝܫܐ ܟܬܒܬ ܠܟܘܢ ܛܠܝܐ ܕܝܕܥܬܘܢ ܠܐܒܐ ܀
14मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे, कारण तुम्हांला पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. त्याची तुम्हांला ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले, कारण तुम्ही सशक्त आहात; देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते, कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.
14ܟܬܒܬ ܠܟܘܢ ܐܒܗܐ ܕܝܕܥܬܘܢ ܠܗܘ ܕܡܢ ܒܪܫܝܬ ܟܬܒܬ ܠܟܘܢ ܥܠܝܡܐ ܕܚܝܠܬܢܐ ܐܢܬܘܢ ܘܡܠܬܗ ܕܐܠܗܐ ܫܪܝܐ ܒܟܘܢ ܘܙܟܝܬܘܢܝܗܝ ܠܒܝܫܐ ܀
15जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंत:करणात प्रेम नाही.
15ܠܐ ܬܪܚܡܘܢ ܠܥܠܡܐ ܘܠܐ ܠܡܕܡ ܕܐܝܬ ܒܗ ܡܢ ܓܝܪ ܕܪܚܡ ܠܥܠܡܐ ܚܘܒܗ ܕܐܒܐ ܠܝܬ ܒܗ ܀
16कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.
16ܟܠ ܡܕܡ ܓܝܪ ܕܐܝܬ ܒܗ ܒܥܠܡܐ ܪܓܬܐ ܗܘ ܕܦܓܪܐ ܘܪܓܬܐ ܕܥܝܢܐ ܘܫܘܒܗܪܐ ܕܥܠܡܐ ܗܠܝܢ ܕܠܐ ܗܘܝ ܡܢ ܐܒܐ ܐܠܐ ܡܢܗ ܐܢܝܢ ܡܢ ܥܠܡܐ ܀
17जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.
17ܘܥܒܪ ܥܠܡܐ ܗܘ ܘܪܓܬܗ ܗܘ ܕܝܢ ܕܥܒܕ ܨܒܝܢܗ ܕܐܠܗܐ ܡܩܘܐ ܠܥܠܡ ܀
18माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे.
18ܒܢܝ ܙܒܢܐ ܗܘ ܐܚܪܝܐ ܘܐܝܟ ܡܕܡ ܕܫܡܥܬܘܢ ܕܐܬܐ ܡܫܝܚܐ ܕܓܠܐ ܘܗܫܐ ܗܘܘ ܠܗܘܢ ܤܓܝܐܐ ܡܫܝܚܐ ܕܓܠܐ ܘܡܢ ܗܕܐ ܝܕܥܝܢܢ ܕܙܒܢܐ ܗܘ ܐܚܪܝܐ ܀
19ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.
19ܡܢܢ ܢܦܩܘ ܐܠܐ ܠܘ ܡܢܢ ܗܘܘ ܐܠܘ ܓܝܪ ܡܢܢ ܗܘܘ ܠܘܬܢ ܡܟܬܪܝܢ ܗܘܘ ܐܠܐ ܢܦܩܘ ܡܢܢ ܕܬܬܝܕܥ ܕܠܘ ܡܢܢ ܗܘܘ ܀
20पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे.
20ܘܐܢܬܘܢ ܡܫܝܚܘܬܐ ܐܝܬ ܠܟܘܢ ܡܢ ܩܕܝܫܐ ܘܦܪܫܝܢ ܐܢܬܘܢ ܗܘ ܠܟܠ ܐܢܫ ܀
21मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.
21ܠܐ ܟܬܒܬ ܠܟܘܢ ܕܠܐ ܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܠܗ ܠܫܪܪܐ ܐܠܐ ܕܝܕܥܝܢ ܐܢܬܘܢ ܠܗ ܘܕܟܠܗ ܕܓܠܘܬܐ ܠܐ ܗܘܬ ܡܢܗ ܡܢ ܫܪܪܐ ܀
22येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो.
22ܡܢܘ ܕܓܠܐ ܐܠܐ ܐܢ ܐܝܢܐ ܕܟܦܪ ܕܝܫܘܥ ܠܐ ܗܘܐ ܡܫܝܚܐ ܗܢܐ ܗܘ ܡܫܝܚܐ ܕܓܠܐ ܗܘ ܕܟܦܪ ܒܐܒܐ ܟܦܪ ܐܦ ܒܒܪܐ ܀
23जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.
23ܘܗܘ ܕܟܦܪ ܒܒܪܐ ܐܦܠܐ ܒܐܒܐ ܡܗܝܡܢ ܡܢ ܕܡܘܕܐ ܒܒܪܐ ܐܦ ܒܐܒܐ ܡܘܕܐ ܀
24तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल.
24ܘܐܢܬܘܢ ܡܕܡ ܕܫܡܥܬܘܢ ܡܢ ܩܕܝܡ ܢܩܘܐ ܠܘܬܟܘܢ ܐܢ ܓܝܪ ܡܩܘܐ ܠܘܬܟܘܢ ܡܕܡ ܕܫܡܥܬܘܢ ܡܢ ܩܕܝܡ ܐܦ ܐܢܬܘܢ ܡܩܘܝܢ ܐܢܬܘܢ ܒܐܒܐ ܘܒܒܪܐ ܀
25आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.
25ܘܗܢܘ ܫܘܘܕܝܐ ܕܐܫܬܘܕܝ ܠܢ ܚܝܐ ܕܠܥܠܡ ܀
26जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे.
26ܗܠܝܢ ܕܝܢ ܟܬܒܬ ܠܟܘܢ ܡܛܠ ܐܝܠܝܢ ܕܡܛܥܝܢ ܠܟܘܢ ܀
27पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणून दुसऱ्रा़ कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून) झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.
27ܘܐܦ ܐܢܬܘܢ ܐܢ ܬܩܘܐ ܠܘܬܟܘܢ ܡܫܝܚܘܬܐ ܕܩܒܠܬܘܢ ܡܢܗ ܠܐ ܤܢܝܩܝܢ ܐܢܬܘܢ ܕܐܢܫ ܢܠܦܟܘܢ ܐܠܐ ܐܝܟ ܡܫܝܚܘܬܐ ܕܐܝܬܝܗ ܡܢ ܐܠܗܐ ܗܝ ܡܠܦܐ ܠܟܘܢ ܥܠ ܟܠܡܕܡ ܘܫܪܝܪܐ ܗܝ ܘܠܝܬ ܒܗ ܕܓܠܘܬܐ ܘܐܝܟ ܕܐܠܦܟܘܢ ܩܘܘ ܒܗ ܀
28म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
28ܘܗܫܐ ܒܢܝ ܩܘܘ ܒܗ ܕܡܐ ܕܡܬܓܠܐ ܠܐ ܢܒܗܬ ܡܢܗ ܐܠܐ ܬܗܘܐ ܠܢ ܓܠܝܘܬ ܐܦܐ ܒܡܐܬܝܬܗ ܀
29जर तुम्हांला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.
29ܐܢ ܝܕܥܬܘܢ ܕܙܕܝܩ ܗܘ ܕܥܘ ܕܐܦ ܟܠ ܕܥܒܕ ܙܕܝܩܘܬܐ ܡܢܗ ܐܝܬܘܗܝ ܀